Agripedia

आजकालचे नोकरीच्या शोधात तरुण जास्त करून नोकरीच्या शोधात असतात किंवा काही तरुणांना नोकरी मिळालेली असते परंतु त्यांच्या इच्छेप्रमाणे नोकरीचे स्वरूप नसते त्यामुळे बऱ्याच जणांना नोकरीचा कंटाळा येतो. त्यासोबतच काही तरुणांना शेती करण्याची देखील हौस असते.

Updated on 02 July, 2022 12:44 PM IST

 आजकालचेनोकरीच्या शोधात तरुण जास्त करून नोकरीच्या शोधात असतात किंवा काही तरुणांना नोकरी मिळालेली असते परंतु त्यांच्या इच्छेप्रमाणे नोकरीचे स्वरूप नसते त्यामुळे बऱ्याच जणांना नोकरीचा कंटाळा येतो. त्यासोबतच काही तरुणांना शेती करण्याची देखील हौस असते.

परंतु तरुणांना कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर शेतीबद्दल पुरेशी माहिती नसते किंवा असली तरी ती जुजबी नसते. बरेच तरुण मंडळी उच्च शिक्षण घेऊन शेतीकडे वळत आहेत.

अशा तरुणांनी जर शेतीत पदार्पण करताना स्वतः सगळे नियोजन हातात घेतले तर मिरची लागवडी पासून सुरुवात करणे योग्य ठरू शकते. कारण मिरची लागवड करून नऊ ते दहा महिन्याच्या आत चांगला नफा मिळवता येणे शक्य आहे.

यामागे कारण असे की मिरची लागवड केली तर हा फायदेशीर व्यवहार ठरण्याची शक्यता जास्त असते. कारण दैनंदिन वापरामध्ये मिरची जास्त वापरली जाते आणि असा कुठलाही हंगाम नाही की मिरची विकली जात नाही. अगदी कुठल्याही हंगामामध्ये मिरचीला चांगला भाव मिळतो.

नक्की वाचा:करियर वाटा: 'हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट' एक विद्यार्थ्यांसाठी ठरू शकतो फायदेशीर करिअरचा मार्ग, जाणून घ्या सविस्तर माहिती

 मिरची लागवड ठरेल फायद्याचा व्यवहार

 भारतामध्ये हिरव्या मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महत्त्वाचे म्हणजे मिरची लागवडीसाठी कुठल्याही हंगामाची आवश्यकता नसून अगदी कुठल्याही हंगामात तुम्ही मिरची उत्पादन घेऊ शकता. आपल्या भारताचा विचार केला तर प्रमुख मिरची निर्यातदार देशांपैकी एक भारताचे नाव आहे.

मिरची लागवड आधी तरुणांना मिरची लागवडी विषयी तपशीलवार माहिती असणे खूप गरजेचे आहे. अगदी सुरुवातीला काही गोष्टींची काळजी घेतली तर मिरची लागवडीतून चांगला नफा मिळवता येणे शक्य आहे.

यामध्ये व्यवस्थित जमिनीची निवड तसेच पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन या गोष्टी ची काळजी घेतली तर चांगले उत्पन्न मिळणे अशक्य नाही.

नक्की वाचा:फवारणी केल्यानंतर पाऊस आला तर पुनर्फवारणी ही खालील घटकांवर अवलंबून असते

लागणारी गुंतवणूक

 जर अभ्यासानुसार विचार केला तर एका हेक्टर करिता सुमारे सात ते आठ किलो मिरचीचे बियाणे आवश्‍यक असते. ते जास्तीत जास्त 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत मिळू शकते. यामध्ये संकरित बियाण्यांची किंमत जास्त जाऊ शकते.

संकरित जातींमध्ये मगधीरा नावाचे बियाणे लावल्यास त्याची किंमत सुमारे 40 हजार रुपये पर्यंत जाईल. तसेच व्यवस्थापनामध्ये तुम्हाला मल्चिंग पेपर,

खत व्यवस्थापन, सिंचन व्यवस्था, व्यवस्थित कीटकनाशकांचा वापर, योग्य वेळी काढणी या आणि तिची मार्केटिंग या सर्व गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतील.

अंदाजे जर विचार केला तर एका हेक्‍टर मिरची साठी जवळजवळ एक ते दीड लाख खर्च येणे अपेक्षित असते.

नक्की वाचा:Capsicum chilli:70 ते 80 दिवसांत शिमला मिरचीच्या 'या' जाती येथील बक्कळ उत्पादन आणि नफा, वाचा आणि घ्या माहिती

 इतके मिळू शकते उत्पन्न

 जर आपण मगधीरा संकरित मिरचीचा विचार केला तर एका हेक्टर मध्ये 250 ते 300 क्विंटलपर्यंत उत्पादन देऊ शकते.जर आपण मिरचीच्या बाजारपेठेचा विचार केला तर  मिरचीचे दर हे वेगवेगळ्या वेळी हे 30 ते 80 रुपये किलो पर्यंत असू शकतो.

जर आपण पकडले की मिरची 50 रुपये किलोने विकली जाईल तर अशा स्थितीत  एका हेक्‍टरमध्ये जर 300 क्विंटल मिरचीचे उत्पादन झाले तर तिची किंमत 50 रुपये प्रति किलो या दराने 15 लाख रुपये असेल

आणि एक हेक्‍टर मिरची लागवड आणि व्यवस्थापन त्यांचा सर्व एकत्रित खर्च जर आपण तीन लाख जरी पकडला तरी बारा लाख रुपयांचा नफा यांमध्ये मिळू शकतो. त्यामुळे अगदी पदार्पणात मिरची लागवडी पासून सुरुवात करणे फायद्याचे ठरू शकते.

English Summary: chilli cultivation is so profitable and give more income to farmer
Published on: 02 July 2022, 12:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)