Agripedia

विविध पिकांची लागवड करताना वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करावा लागतो.

Updated on 17 March, 2022 1:27 PM IST

विविध पिकांची लागवड करताना वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करावा लागतो. एखाद्या पिकाची लागवड केल्यानंतर कशाप्रकारे व्यवस्थापन केले जाते यावर फायदा किंवा नफा अवलंबून असतो शेतीमध्ये व्यवस्थापनाचे विविध पैलू असतात. खतांचे व्यवस्थापन हा यापैकी एक महत्वाचा पैलू कारण कोणत्याही पिकाला जर योग्य खत योग्य प्रमाणात दिले गेले तर त्याचा फायदा निश्चितच दिसून येतो. मिरची व टोमॅटो या पिकांसाठी खत व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेऊया.

मिरची खत व्यवस्थापन :

लागवडीसाठी वाफे तयार करण्यापूर्वी २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी जमिनीत मिसळावे.

मिरची पिकासाठी १००:५०:५० किलो नत्र: स्फुरद : पालाश प्रति हेक्टरी द्यावे.

लागवडीच्या वेळी संपूर्ण स्फुरद, पालाश व अर्धा नत्राचा हफ्ता लागवडीनंतर ४ ते ६ आठवड्यांनी म्हणजे फलधारणेच्या वेळी द्यावा.

लागवडीच्या वेळी २० ते २५ किलो फेरस सल्फेट व झिंक सल्फेट पर हेक्टर द्यावे.

निंबोलीपेन्ड ८ ते १० बॅग प्रती हेक्टर द्यावे.

वरील सर्व खते म्हणजे NPK, मिक्रोनुट्रिएन्ट व निंबोलीपेन्ड हे बेड मध्ये भरावे व मातीने झाकावे.

खतांची मात्रा दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे व नंतर मिरचीचे रोप लावावे.

“टोमॅटो” खतांचे व्यवस्थापन:

टोमॅटो हे पीक रासायनिक तसेच जैविक खतांचा चांगला प्रतिसाद देते.

लागवडीसाठी क्षेत्र तयार करताना चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी २० टन शेतामध्ये मिसळावे.

रासायनिक खतांमध्ये सरळ जातीसाठी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १५० किलो पालाश.

संकरित वाणासाठी ३००:१५०:१५० किलो नत्र: स्फुरद : पालाश प्रति हेक्टरी वापरावे.

त्या रासायनिक खतांपैकी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या अगोदर वाफ्यात टाकावे तर उरलेल्या निम्म्या नत्राच्या ३ ते ४ समान मात्रा २० दिवसाच्या अंतराने द्याव्यात.

लागवडीच्या वेळी 20 ते 25 किलो फेरस सुल्फेट व झिंक सुल्फेट पर हेक्टर द्यावे.

निंबोलीपेन्ड 8 ते 10 बॅग पर हेक्टर द्यावे.

वरील सर्व खते म्हणजे NPK, मायक्रोन्युट्रिएन्ट (सुक्ष्म अन्नद्रव्ये ) व निंबोलीपेन्ड हे बेड मध्ये भरावे व मातीने झाकावे.

खते टाकल्यावर ताबडतोब पाणी देणे जरुरीचे आहे. रोपांची लागवड वरंब्याच्या बगलेत वाफ्यांना अगोदर पाणी देऊन करावी. त्यावेळी रोपांची मुळे सरळ खाली राहतील याची काळजी घ्यावी.

“मिरची व टोमॅटो” साठी फवारणी व ड्रीप द्वारे खत व्यवस्थापन

१९ : १९ : १९ लागवडीनंतर १५ व २५ दिवसांनी फवारणीतून ५ ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून २ किलो प्रती एकर असे दोन वेळेस द्यावे.

मायक्रोन्युट्रिएन्ट लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी फवारणीद्वारे ५ मि. ली प्रती लिटर किंवा ड्रीप मधून १ लिटर प्रती एकर द्यावे.

फुलोरा अवस्थेत १३ : ४० : १३ व १२ : ६१ : १० दिवसाच्या आंतराने फवारणीद्वारे ७ ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून ३ किलो प्रती एकर द्यावे.

मायक्रोन्युट्रिएन्ट लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी फवारणीद्वारे ५ मि. ली प्रती लिटर किंवा ड्रीप मधून १. ५ लिटर प्रती एकर द्यावे.

फळ धारण होत असतांना 00 : ५२ :३४ दोन वेळा १० दिवसांच्या आंतराने फवारणीद्वारे १० ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून ५ किलो प्रती एकर द्यावे.

फळ पोसत असतांना १३ : 00 : ४५ व 00 : 00 :५०, १० दिवसांच्या आंतराने फवारणीद्वारे १० ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून ५ किलो प्रती एकर द्यावा.

English Summary: Chilli and Timato all Fertilizer management
Published on: 17 March 2022, 01:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)