Agripedia

चेरी टोमॅटो दिसायला रंगीबेरंगी आणि खायला रसाळ असल्याने याची बाजारात कायमच मोठी मागणी बघायला मिळत असते. विशेष म्हणजे चेरी टोमॅटोची शेती करणे तुलनेने खूपच सोपे आहे. पिकवायला सोपे असल्याने शेतकरी बांधवांना याची लागवड विशेष आकृष्ट करत आहे. असे अनेक लोक आहेत ज्यांना चेरी टोमॅटोची शेती करायची आहे. त्यामुळे आज आपण चेरी टोमॅटोच्या लागवडीबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Updated on 22 March, 2022 12:32 PM IST

चेरी टोमॅटो दिसायला रंगीबेरंगी आणि खायला रसाळ असल्याने याची बाजारात कायमच मोठी मागणी बघायला मिळत असते. विशेष म्हणजे चेरी टोमॅटोची शेती करणे तुलनेने खूपच सोपे आहे. पिकवायला सोपे असल्याने शेतकरी बांधवांना याची लागवड विशेष आकृष्ट करत आहे. असे अनेक लोक आहेत ज्यांना चेरी टोमॅटोची शेती करायची आहे.  त्यामुळे आज आपण चेरी टोमॅटोच्या लागवडीबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

मित्रांनो चेरी टोमॅटो खाण्यासाठी रुचकर असून यामध्ये असलेले औषधी गुणधर्म मानवी आरोग्याला विशेष फायदेशीर ठरत आहेत, यामुळे दिवसेंदिवस चेरी टोमॅटोची मागणी बाजारात वाढलेली बघायला मिळत आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया चेरी टोमॅटोच्या शेती विषयी सविस्तर.

चेरी टोमॅटो या पिकाची लागवड चांगल्या पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी अशी शिफारस केली जाते.

मित्रांनो तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की हे टोमॅटो वसंत ऋतूच्या सुरवातीला लावले जातात.

या टोमॅटोचे रोप तयार करण्यासाठी, बियाणे ट्रे मातीने भरा.

ट्रेच्या बियाणे टाकण्याच्या ठिकाणी सुमारे 1⁄2 सेमी खोल खड्डा किंवा छिद्र करा.

नंतर त्यामध्ये बिया पेरून नंतर बियाणे मातीने झाकून टाका.

या टोमॅटोची अंकुरण प्रक्रिया 5 ते 7 दिवसात सुरू होतं असते.

रोप तयार झाल्यानंतर ते ट्रेमधून काढून घ्या आणि जमिनीत लावा.

चेरी टोमॅटोला दिवसा 6 ते 8 तास सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे यामुळे पिकाची वाढ चांगली होते.

टोमॅटोला सहा तास पूर्ण सूर्यप्रकाश, निवारा, हवेशीर परिस्थिती आणि कंपोस्ट खताची आवश्यकता असते, यामुळे चेरी टोमॅटो पिकापासून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते.

जेव्हा चेरी टोमॅटोची झाडे झपाट्याने वाढू लागतात तेव्हा झाडे पडण्यापासून रोखण्यासाठी बांबूच्या साहाय्याने त्यांना आधार द्यावा लागतो.

संतुलित NPK खते चेरी टोमॅटोला लावण्याची शिफारस केली जाते.

जमिनीत ओलसर कायम असायला हवी म्हणजे जमीन खूप कोरडी राहू नका द्या कारण याचा फळांवर नकारात्मक परिणाम होतो ज्यामुळे फळाला तडे जाऊ शकतात किंवा कुजतात.

प्रत्यारोपणानंतर, 65 ते 70 दिवसांत चेरी झाडाला फळे यायला सुरुवात होते.

पूर्ण पिकलेला टोमॅटो मोठ्या टोमॅटोपेक्षा मऊ असतो.

चेरी टोमॅटोच्या अनिश्चित जातीला जोपर्यंत पाणी आणि खत मिळत राहील तोपर्यंत ते फळ देत राहतात.

चेरी टोमॅटोच्या जाती 

ब्लॅक चेरी

चेरी रोमा

टोमॅटो टो

करंट 

येलो पियर 

संबंधित बातम्या:-

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे महागाई 15 टक्क्यांनी वाढणार; स्वयंपाक घरातील बजेट कोलमडण्याची चिन्हे

शॉर्टसर्किटमुळे झालं होत्याचं नव्हतं! 50 एकर क्षेत्रावरील उस जळून खाक, लाखोंचे नुकसान; नुकसान भरपाईची मागणी

….. जर या पद्धतीने बाष्पीभवन होत राहिले तर जायकवाडी धरण होईल रिकामं; मराठवाड्यासाठी चिंतेची बाब

English Summary: cherry tomato farming is very benificial
Published on: 22 March 2022, 12:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)