Agripedia

सेंद्रिय शेतीची कास धरू आरोग्याची हानी टाळू आणि ह्या अनमोल जीवनाचे काही क्षण वाढवू.

Updated on 30 December, 2021 3:45 PM IST

चला तर आधुनिक शेतीकडे वाटचाल आताच्या शेतकऱ्यांनी करायला हवी.

आपले आजोबा पंजोबा सेंद्रीय शेती करत होते त्या पद्धतीने हल्लीचे शेतकरी बंधू नवीन नवीन टेक्नॉलॉजी व ट्रॅक्टरद्वारे शेती करत चालले आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतीवर खर्च करत आहे आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करायला हवी मोठ्या प्रमाणात पैशाची बचत होते व रासायनिक खतांचा वापर कमी करावा व तसेच तन नाशक कीटकनाशक असे वेगवेगळ्या कंपनीचे फर्टीलायझर मोठ्या प्रमाणावर हल्लीचा शेतकरी वापर करत आहे आणि शेती नापीक करत आहे.

 या रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीचे किती दुष्परिणाम दिसून येत आहे हे तर पंजाब हरियाणा येथील शेतकरी सांगू शकतात कारण पंजाब हरियाणा येथील शेतकऱ्यांनी आपल्या अगोदर मोठ्या प्रमाणे रासायनिक खतांचा वापर त्यांच्या शेती मध्ये केलेला आहे त्यांची संपूर्ण जमीन आता नापिक झालेली आहे म्हणून रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीची वाटचाल करावी सेंद्रिय शेती शेतकऱ्यांनी केली तर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदाच आहे कारण शेतीला लागणारे खत व कीटकनाशक तन नाशक हे सर्व शेतकरी आपल्या घरी तयार करू शकतो

जसे की शेणखत गांडूळ खत व पिकावर मावा तुडतुडे यांचा अटॅक झाला असता त्यावर लागणारे औषधे म्हणजेच दशपर्णी अर्क निंबोळी अर्क व जीवामृत असे अनेक औषधी व खते शेतकरी स्वतःच्या घरी बनवू शकतो की कंपोस्ट खत याने शेतकरी शेतीला लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो व आपल्याला कोणत्याही सावकाराकडून व बँक कडून कर्ज काढायचे काम पडणार नाही केव्हा जेव्हा तुम्ही सेंद्रिय शेती करतान तेव्हा आणि सेंद्रिय शेती केल्याने निरोगी आरोग्य राहते जसे की रासायनिक खतांच्या वापरामुळे व किटकनाशकांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे म्हणून सेंद्रिय शेती केल्याने पैशाची बचत व भरघोस उत्पन्न आणि निरोगी आयुष्य नक्कीच मिळेल, बऱ्याच शेतकऱ्यांचा कल अता सेंद्रीय शेतीकडे वाढत चालला आहे.

व येणाऱ्या पिढीचे  उज्वल भविष्य होते  व आधुनिक पद्धतीचा वापर सेंद्रिय शेतीमध्ये दिसून येतो . P आणि आता तर वेगवेगळ्या रासायनिक निविष्ठांच्या कंपन्या सुद्धा सेंद्रिय निविष्ठा तयार करत  आहेत व याबाबत सरकारसुद्धा महत्त्वाचे निर्णय घेत आहेत.

  

गोपाल उगले

 कृषी महाविद्यालय अकोला

  मो-9503537577

 

English Summary: Chemical fertilizers take back side and does Organic farming
Published on: 30 December 2021, 03:45 IST