Agripedia

आपण वेगवेगळी खते पिकांना देत असतो, पण आपल्याला बऱ्याच खतांचे पिकावर कोण कोणते परिणाम होतात त्यांचे कार्य काय याची माहिती नसते.

Updated on 22 February, 2022 11:37 AM IST

आपण वेगवेगळी खते पिकांना देत असतो, पण आपल्याला बऱ्याच खतांचे पिकावर कोण कोणते परिणाम होतात त्यांचे कार्य काय याची माहिती नसते. म्हणून आज आपण जाणून घेऊ

फवारणी द्वारे वापरली जाणारी काही खते व त्यांचे कार्य ( पिकावरील परिणाम )

विद्राव्य खते व त्यांचे कार्य.

१९:१९:१९, १८:१८:१८

या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात. या मध्ये नत्र अमाईड, अमोनिकल, आणि नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो.

या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो.

१२:६१:००

या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात. यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असते.

तर पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो.

०:५२:३४

या खतास मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणतात. यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्य भरपूर आहेत. फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेकरिता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते.

१३:००:४५

या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात. यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते. फुलोऱ्यानंतर च्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते. अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे. या खतामुळे पाणी कमी असताना पिके तग धरू शकतात.

०:०:५०

या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात. पालाश बरोबरच या खतामध्ये उपलब्ध सल्फेट भुरी सारख्या रोगाचेही नियंत्रण होऊ शकते. पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते. हे खत फवारले जावूशकते. या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते.

१३:४०:१३

पात्या , फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते. व अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.

 

कॅल्शियम नायट्रेट

कॅल्शियम नायट्रेट हे फुलांची संख्या वाढवणे तसेच फुलगळ न होणे फळे पिवळी पडून जी गळ होते ती होवू न देणे आणि फळांना क्रेक जावू न देणे आणि फळांची सेटिंग यासाठी वापर होतो.

NPK

घटक :- नत्र - स्फुरद-पालाश

19:19:19

कार्य :- पिकाच्या जोमदार वाढीसाठी

12:61:00

कार्य :- फुटवा जास्त येण्यासाठी

18:46:00

कार्य :- पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी

12:32:16

कार्य :- फुलकळी जास्त येण्यासाठी, फळधारणा जास्त होण्यासाठी

10:26:26

कार्य :- फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी

00:52:34

कार्य :- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी

00:00:50

कार्य :- फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी, फळांचे वजन वाढवण्यासाठी, साईज वाढवण्यासाठी, चांगला रंग येण्यासाठी, टिकाऊपणा वाढवण्यासाठी.

 

मिलिंद गोदे

अचलपूर जैविक शेतकरी

English Summary: Chemical fertilizers effect and work
Published on: 22 February 2022, 11:37 IST