Agripedia

मूग,उडीद,चवळी:- उडीद व मूग ही दोन्ही पिके कमी कालावधीत काढणीस येतात.त्यामुळे त्यावर येणाऱ्या किडीवर सुद्धा लवकर लक्ष देणे गरजेचे असते.

Updated on 07 October, 2021 8:20 AM IST

महत्वाच्या किडी:- 1.केसाळ अळी,शेंगा पोखरणारी अळी,मावा,पांढरी माशी,तुडतुडे,ढालकिडे.

 

एकात्मिक व्यवस्थापण:-

पारंपरिक पद्धती:

१.उन्हाळ्यामध्ये शेताची उभी आडवी खोल नांगरट करणे.त्यामुळे किडीच्या इतर अवस्था जसे कोष,अंडी बाहेर पडून पक्ष्यांचे नैसर्गिक भक्ष बनतात.

२.लागवडी नंतर दिसणाऱ्या किडीच्या अवस्था जसे अळी,अंडीपुंज दिसताच एकत्र करून पिकाबाहेर नष्ट करावे.

३.पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे लावावे.

 

जैविक पद्धती:-

१.मावा,पांढरी माशी अशा मऊ शरीराच्या कीटकांचा फडशा पडणाऱ्या मित्रकिडी जसे लेडी बर्ड बिटल(चित्रांग भुंगा,किंवा टपरी भुंगा),सिरफीड माशी तसेच लेसविंग या मित्र कीटकांचा वापर करावा.त्यांची संख्या नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी लसूण गवताची पिकाच्या एका कडेने लागवड करावी.

२.किडींच्या अळी अवस्था नियंत्रित करण्यासाठी मेटरझियम किंवा बवेरिया यांसारख्या जैविक कीटकनाशकांचा वापर करू शकता.

3.पहिली फवारणी निम तेलाची केल्यास कीड पिकापासून दूर जाते.

यांत्रिक पद्धती:-

१.पिकाच्या सुरवाती पासूनच घाटेअळीसाठी एकरी 10 ते 12 कामगंध सापळे लावावेत.

२.रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी एकरी 30 ते 40 पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत.

 

रासायनिक पद्धती:-

या पद्धतीचा वापर जर कीड आर्थिक उंबरठा पातळीच्या वर गेल्यावरच किंवा कीड नुकसान पातळीवर गाठतेय अस जाणवल्यास करावा.

१.केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस 25% EC

  2 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारावे.

२.पिवळा विषाणू रोग हा पांढरी माशीच्या मदतीने प्रसारित होतो.त्यामुळे पांढऱ्या माशी व इतर रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी इमिडोक्लोप्रीड17.8EC या कीटकनाशकांचा 2 ml प्रति लिटर या प्रमाणात वापर करावा.

३.तसेच नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा. खतांमध्ये सिलिकॉनचा वापर करावा. त्यामुळे पानांच्या पेशी भित्तिका जाड होऊन रसशोषक किडीच्या शोषण प्रक्रियेत अडथळा होऊन त्या निष्क्रीय होतील.

४.शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी क्लोरांट्रीनीलीप्रोल 18.5%EC 2 मिली प्रति 10 लिटर या प्रमाणात वापरू शकतो.

५.भुरी रोगाच्या नियंत्रनासाठी पाण्यात मिसळणारे गंधक(100-120ग्राम) किंवा कार्बेन्टीझिम(10ग्राम) 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारू शकतो.

 

 एकाच पद्धती वर अवलंबून न राहता या सर्व पद्धतींची व्यवस्थित सांगड घालून आपण किडींना आर्थिक नुकसान पातळी ओलांडण्यापासून रोखू शकतो.

 

    स्रोत:-महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी 

 संकलन -,IPM school

 

English Summary: Chawli, Moog Urad are some of the important pests of cereals
Published on: 07 October 2021, 08:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)