मागे सांगितलेल्या काहींश्या उघडीपीनंतर बुधवार दि.७ पासुन पुन्हा पुढील ८ दिवस म्हणजे बुधवार दि.१४ सप्टेंबर पर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात वीजा व गडगडाटीसह मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.कदाचित आज रात्रीपासूनही पावसाला सुरवात होवु शकते. मात्र पावसाचा जोर तीन दिवस म्हणजे दि.८,९,१०(गुरुवार ते शनिवार) गणपती विसर्जन दरम्यान अधिकच असु शकतो, असे वाटते. सिंचन विभागालाही ह्या ३ दिवसात जागरूक रहावे लागणार, असे दिसते.
महाराष्ट्रात मुंबई सह संपूर्ण कोकणातील (४ जिल्ह्यात) व पूर्व विदर्भातील गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेच दक्षिण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड अश्या १५ जिल्ह्यात विशेषतःजोरदार ते अति पावसाचीही शक्यता जाणवते.अर्थात नाशिक खान्देशसह उर्वरित जिल्ह्यानमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता ही आहेच.There is also a possibility of heavy rain in the rest of the districts.तापमान- मध्य महाराष्ट्रातील खान्देश पासुन कोल्हापूर सोलापूर पर्यन्त पुढील काही दिवस दुपार ३
वाजेचे कमाल व पहाटे ५ चे किमान असे दोन्हीही तापमाने त्या त्या दिवसांच्या त्यांच्या सरासरी तापमानापेक्षा दोन ते अडीच डिग्रीने अधिक जाणवेल.त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील अधिकची जाणवणारी ही उष्णता अधिक आर्द्रता निर्मिती करून स्थानिक पातळीवर उर्धवगमनाच्या वहनातुन घडणाऱ्या वातावरणीय चलनवळणामुळे सध्याच्या जोरदार पावसासाठी अधिक पूरक ठरु शकते.कोकण, विदर्भ व मराठवाड्यात मात्र हे दोन्हीही तापमाने मात्र सरासरीइतकेच जाणवतील.आज अमरावतीला सगळ्यात कमी किमान तापमान २१.७ डिग्री नोंदवले गेले.
परतीच्या पावसासाठीचे सुरवात झालेले अनुकूल वातावरणीय वेध सध्या स्थिरवल्यासारखे जाणवतात. त्यामुळे माघारी फिरणारा मोसमी पाऊस कदाचित वेळ घेण्याची शक्यताही नाकरता येत नाही.कश्यामुळे होवु शकतो? हा पाऊस (i) बं. उपसागरात थायलंडच्या पश्चिम कि.पट्टीसमोर साधारण १४ डिग्री उत्तर अक्षवृत्तदरम्यान बुधवार दि.७ सप्टेंबरला निर्माण होण्याऱ्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे व त्याच्या परिणामामुळेच दोन दिवसानंतर म्हणजे शुक्रवार दि.९ सप्टेंबरच्या दरम्यान बं.उपसागरातच परंतु भारताच्या पूर्व कि.पट्टीसमोर आंध्रप्रदेशात नेल्लोर व
मच्छलीपटनम ह्या दोन शहरादरम्यान तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे व नंतर त्याचे वायव्येदिशेकडे देशाच्याभू-भागावर होणाऱ्या मार्गक्रमणामुळे व तसेच (ii) देशात सध्य:स्थित मोसमी पावसाचा आस (Monsoon Trough) हा उत्तर दिशे(हिमालयाच्या पायथ्या)कडून पुन्हा नकळत देशात त्याच्या मूळ (वायव्य ते आग्नेय दिशेदरम्यानच्या)सरासरी जागेवर दक्षिण दिशेकडे सरकून स्थिरावण्याच्या शक्यतेमुळे अश्या दोन मुख्य
कारणांमुळे हा पाऊस इतर दक्षिणेकडील राज्यांबरोबर महाराष्ट्रातही होण्याची शक्यता जाणवते.बघू या काय घडते ते!तसाच वातावरणात काही बदल झाल्यास मात्र लगेचच कळवले जाईल.वरील क्रं.५ मधील माहिती केवळ हवामान साक्षरतेच्या प्रबोधनासाठीच समजावी, ही विनंती.आज एव्हढेच!
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.), IMD Pune.
ह. मु. वडांगळी ता. सिन्नर, जि. नाशिक.
Published on: 07 September 2022, 08:28 IST