पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांना स्वस्तात इंधन मिळावे, यासाठी केंद्र सरकारने जैव इंधनावर लक्ष्य केंद्रीत केलंय. त्यासाठी देशभर इथेनॉल प्लँट सुरु केले जाणार आहे.
देशात 199 इथेनॉल प्लँट केंद्र सरकार देशात 199 इथेनॉल प्लँट सुरु करणार आहे.199 Ethanol Plants in the country Central Government is going to start 199 ethanol plants in the country.
आता शेतीची विज कापता येणार नाही, अन्न आयोगाने दिला आदेश
त्यातील काही प्रकल्पांचे काम वेगात सुरु आहे. अनेक राज्यात इथेनॉल प्रकल्प सुरु केले जाणार असून, पेट्रोल-डिझेलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करुन त्यावर गाड्या चालविता येणार आहेत.
शेतकऱ्यांचाही फायदा होणार ऊस, मका, तांदळासह इतर धान्यांच्या साहाय्याने इथेनॉलचे उत्पादन घेतले जाते. इथेनाॅलचा वापर वाढल्यास कृषी क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. इथेनॉलचे फायदे लक्षात घेता, सरकार या पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, सध्या पेट्रोल-डिझेलमध्ये 10 टक्के इथेनाॅलचा वापर केला जात आहे. 2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
Published on: 31 October 2022, 08:04 IST