Agripedia

पाने पिवळी पडण्याचे नेमके कारण काय ते पाहून खालील प्रमाणे योग्य ती उपाय योजना करावी. शेतातील साठलेले सर्व पाणी काढून टाकावे.

Updated on 27 September, 2021 8:24 PM IST

करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्यास, मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड ३० ग्रॅम किंवा क्‍लोरोथॅलोनील २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी अधिक स्टिकर १० मि.लि. या प्रमाणात १०-१५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

सुक्ष्म अन्नद्रव्य ३ लिटर प्रती २०० लीटर पाणी प्रती एकर किंवा विपूल किंवा मल्टीप्लेक्स १० मिली प्रती १० लीटर पाणी किंवा झिंक फेरस ०.५ टक्के + बोरँक्स ०.२ टक्के ची १५ दिवसाच्या अंतराने २ फवारण्या कराव्या.

फुलकिडे आणि इतर किडींच्या नियंत्रणासाठी मेथील डीमेटॉन १० मिली किंवा मँलेथिऑन १० मीली कींवा रोगर २० मिली किंवा नुवान १२ मिली यापैकी एक कीटकनाशक निवडून प्रती १० लीटर पाणी याप्रमाणे आलटून पालटून १ ते २ फवारण्या कराव्यात.

पिकावर किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दोन रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीमध्ये  निंबोळीअर्क ५ टक्के किंवा करंज बियांच्याअर्क ५ टक्के प्रमाणे प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

जर झाडे मुळकुज खोडकूज, सालकूज इ. रोगामुळे पिवळी पडत असतील तर अशा झाडांना बोर्डोमिश्रण ०.५ टक्के जमिनीतून रींग पध्दतीने प्रती झाड अर्धा ते १ लिटर द्रावण ओतावे.

मॅग्नेशियम कमतरतेसाठी मॅग्नेशियम सल्फेट १० ते १५ किलो प्रती एकर व बेनसल्फ १० किलो प्रती एकर द्यावे.

(प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते.

शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत: च्या जबाबदारीवर करावा)

 

संकलन - प्रवीण सरवदे कराड

प्रतिनिधी - गोपाल उगले

 

English Summary: causes and control of yellowing of leaves
Published on: 27 September 2021, 08:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)