पण जपानने लढाई चालू ठेवली. अमेरिकेने ६ व ९ ऑगस्ट,१९४५ रोजी दोन अणुबॉम्ब हिरोशिमा आणि नागासाकी ह्या दोन शहरांवर वापरले आणि हजारो लाखो लोक होरपळून मेली. मानवतेचा इतिहास अंधकाराने भरलेला आहे. ह्या घटनेनंतर जपाननेही आपली शरणागती स्वीकारली. अमेरिकेला आपण केलेल्या भयानक व निर्दयी कृत्याची जाणीव झाली. त्यांनी ह्याचे प्रायश्चित म्हणून जपान बरोबर एक शांती करारावर स्वाक्षरी केली. त्यानुसार जपानला येत्या काळात आपल्या सैन्यावर भर देता येणार नव्हते. अमेरिकेने जपानचा संरक्षणाची जबाबदारी उचलली होती. अमेरिकेने प्रायश्चित म्हणून जपानला उभे करण्यासाठी मिळेल ती मदद करण्याची इच्छाशक्ती दाखवली. त्यांनी आपले अनुभवी तज्ज्ञांचा संघ जपानला पाठवला. त्यांच्यावर जपानचे औद्योगिकरण करण्याची जबाबदारी दिली. जपाननेही आपल्या सैन्यात असलेले शिस्तप्रिय अधिकाऱ्यांना ह्या औद्योगिक कामाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी दिली
कोणतेही कार्य करत असताना त्याला जर शिस्तीचा भक्कम पाया मिळाला तर ते कार्य सहजरित्या सफल होते आणि झाले ही तसेच. बघता बघता जपानने औद्योगिक प्रगती केली. कालांतराने जपानचे त्यांनी निर्मित केलेल्या दर्जेदार उत्पादनासाठी जगभर नाव होऊ लागले. जपानी लोक वस्तूचा दर्जेला खूप महत्व देतात. हा दर्जा टिकवण्यासाठी ते वेगवेगळ्या व्यस्थापणाचे पध्दतीचा अवलंब करीत असत. त्यातील कायजन ही सर्वात सोपी पद्धत. आपण आपल्याला शेती मध्येही ह्याचा वापर आपण करू शकतो.
एखाद्या कृतीमध्ये सातत्याने चांगले बदल घडवून आणणे जेणेकरून त्या कृतीतून प्राप्त होणारे परिणाम चांगले मिळतील. ह्याला इंग्रजीमध्ये कंन्टीन्युअस इंपृमेंट म्हणतात. उदाहरणात मागील काही वर्षांत आम्ही जीवामृत वापरण्याचा पद्धतीमध्ये मोठे बदल केले आहेत. सर्वप्रथम आम्ही पारंपरीक जीवामृत तयार करण्याचे समिकरण वापरून बघितले. त्यामध्ये १०किलो शेण १०लिटर गौमुत्र मूठभर वडाचा झाड खालची माती १किलो गुळ व १ किलो बेसन.परिणाम मिळत होता पण ह्यामध्ये आणखी सुधारणा करणे आवश्यक वाटत होते. जीवामृताची ताकत वाढवण्यासाठी आम्ही त्यामध्ये शेणाचे प्रमाण वाढवले.१०किलोचा ऐवजी २०किलो शेण वापरले. त्याचे परिणाम चांगले दिसून आले. ह्या समीकरणाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आम्ही गुळ व बेसनाचे प्रमाण बद्दलले. पूर्वी आम्ही १किलो गुळ व १किलो बेसनचा वापर करीत असे.
आज आम्ही त्या द्रावनामधील कर्ब नत्र गुंणोत्तर सुधारण्यासाठी आम्ही १किलो गुळ व फक्त पाव किलो बेसनचा वापर केला. ह्या प्रयोगामुळे जीवामृत मधील जिवाणूंची वाढ खुप चांगली झाली व एक किलोचा ऐवजी पाव किलो मध्ये नत्राची पूर्तता झाली. सध्या आम्ही जीवामृत पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने बनवतो. आम्ही जीवामृत मध्ये असलेला जिवाणू युक्त जे घटक आहेत त्या प्रत्येकाला वेगवेगळ्या टाकीमध्ये घालतो व प्रत्येकाला स्वतंत्र गुळ व बेसनची मात्रा देतो. त्यामुळे प्रत्येक टाकीमध्ये जिवाणू स्वतंत्र वाढतात आता पूर्वीसारखी अन्नासाठी स्पर्धा होत नाही. ह्याचे परिणाम खूपच चांगले मिळाले.
हेही वाचा अशाप्रकारे द्या गव्हाला संरक्षित पाणी
कालांतराने आम्ही आणखी एक बदल केला. पूर्वी जिवामृताचा वापर आम्ही महिन्यातून एकदा वापर करायचो. आज आम्ही दर तीन दिवसाला जीवामृताचा वापर करतो. ह्याचा खुप चांगला परिणाम मिळाला.जीवामृत ह्या ऐका गोष्टी वर आम्ही मागचा काही दिवसात चार मोठे बदल केले. प्रत्येक बदलामुळे त्याची ताकत वाढत जाते. त्यामुळे उत्पादन ही वाढते व आपल्या जमिनीचा पोत टिकून राहतो.अशे रोज नवनवीन प्रयोग जर आपण आपल्या शेती मध्ये करू शकलो तर आपले उत्पादन वाढेल, शिवाय आपला अनुभव व शेती कडे पाहण्याचा दृष्टिकोन ही बदलून जाईल. जपान मध्ये एखाद्या संस्थे मधील मोठ्या हुद्द्यावरील अधिकारी ते संस्थेमधील सफाई कर्मचारी ह्यांना रोज आपल्या कामांमध्ये नवनवीन प्रयोग करणे बंधनकारक आहे.अधिकाऱ्याचा कार्याची कक्षा रुंद असतात पण एखादा सफाई कर्मचारी रोज तेचते काम करत असतो. पण त्याला रोज कामात एखादा प्रयोग करून बदल करावाच लागतो. त्यांना दिवसाचा शेवटी आज केलेला नवीन प्रयोग हा एका कागदावर लिहून वरिष्ठांना सुपूर्द करणे बंधनकारक आहे.संस्थेतील प्रत्येक व्यक्ती रोज एखादा नवीन प्रयोग करतो. हे न केल्यास त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली जाते.
संस्थेमधील प्रत्येक कर्मचारी जर आपल्या कामामध्ये फक्त एक बदल घडवत असेल तर ऐका दिवसात त्या संस्थेने खुप मोठा बदल केलेला असतो. रोज आपण एक प्रयोग करू शकलो एखाद्या पिकाचा लागणी पासून काढणीपश्चात ज्या कृती असतील जर आपण त्यामध्ये रोज एखादा प्रयोग केला तर वर्षाअखेर ३६५ प्रयोग होतात. प्रत्येक प्रयोगामधून जर आपले १% उत्पादन वाढत असेल तर वर्षाअखेर आपले उत्पादन तिप्पट वाढते. हे सगळे प्रयोग शेतीमध्येच व्हावेत असा कोणताही बंधन नाही. ह्याचा वापर शेतकरी आपले स्वास्थ, आपला आहार किंवा आपली नाती सांभाळायला ही करू शकतो. आपल्या आहारात काही सकारात्मक बदल करणे किंवा आपल्या नात्यांची गाठ घट्ट करण्यासाठीचे प्रयोग असतील असे रोज प्रयोग करणे महत्वाचे आहे. शेतकऱ्याचा शेती मध्ये व वयक्तिक आयुष्या मध्येही प्रगती होणे गरजेचे आहे. प्रयोग सफल होईल किंवा असफल हे आपल्या हातात नाही पण प्रयत्न करणे निश्चितच आपल्या हातात आहे.
विवेक पाटील,सांगली
०९३२५८९३३१९
Published on: 15 October 2021, 06:31 IST