Cauliflower Farming: फुलकोबी हे महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. खरं पाहता फुलकोबी हे खाण्यासाठी चविष्ट असल्याने तसेच यामध्ये अनेक पोषक घटक असल्याने फुलकोबीची भाजी सर्वांनाच आवडते. फुलकोबी थंड वातावरणात सहज उपलब्ध होते. पण उन्हाळ्यात आणि पावसात फुलकोबी बाजारात सहसा दिसत नाही. या परिस्थितीत पावसाळ्यात फुलकोबी लागवड केल्यास त्यातून चांगला नफा शेतकऱ्यांना मिळू शकतो.
आता फुलकोबीच्या अशा अनेक जाती आल्या आहेत ज्यांची लागवड उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यात शक्य आहे. मित्रांनो पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात अजूनही फुलकोबी कमी प्रमाणात उत्पादित केले जाते.
अशा परिस्थितीत पावसाळ्यात फुल कोबीची लागवड केल्यास त्याला अधिक बाजार भाव मिळतो. यामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होते. कृषी शास्त्रज्ञांनी फुलकोबीच्या काही सुधारित जाती विकसित केल्या आहेत. ज्याची लागवड जुलैमध्ये करता येते. हे वाण ऑक्टोबरमध्ये उत्पादन देण्यास तयार होतात.
Almond Benifits: बदाम आहे आरोग्यासाठी रामबाण, रोज 6 बदाम खाल्ल्याने होतात हे फायदे
अशा जातींना अर्ली फुलकोबी म्हणतात. म्हणजे या फुल कोबीची लागवड आगात करता येते. हे पीक पावसाळ्यात घेतले जाते. त्यामुळे शेतात जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. तसेच कोबी लागवडीपूर्वी शेतात चांगली नांगरणी करावी व शेणखतही टाकावे.
किती खर्च येईल? :- फुलकोबीची आगात लागवड केल्यास रोपे 45 दिवसांत पिक तयार होते. फुलकोबीच्या सुधारित जातीचे बियाणे 15,000 ते 20,000 रुपयांना सुमारे 100 ग्रॅम उपलब्ध असेल. एवढे बियाणे एक एकरात पेरणी करता येते.
Cow Rearing: गाईची या देशी जातीचे पालन शेतकऱ्यांना बनवणार मालामाल, 80 लिटर दूध उत्पादनक्षमता
याशिवाय लावणी, तण काढणे, कीटकनाशके, खते मजुरीवर खर्च करावा लागेल. या सर्व गोष्टींचा खर्च 25,000 ते 30,000 रुपये असू शकतो. म्हणजेच एकूण सुमारे 50 हजार रुपये खर्च होणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की फुलकोबीची लागवड अतिशय नाजूक आहे.
पूर्ण काळजी घेतली नाही तर छोटीशी चूकही मोठे नुकसान करू शकते. अतिशीत होण्यापूर्वी कोबीची किंमत खूप जास्त असते. किरकोळ बाजारात ते 30 ते 40 रुपये किलोपर्यंत विकले जाते.
Monsoon Update: आज राज्यात कोसळधारा..! या ठिकाणी बरसणार धो-धो, वाचा IMDचा अलर्ट
अशा परिस्थितीत मंडईत तुमची कोबी 20-25 रुपये किलोने सहज विकली जाईल. म्हणजेच एक एकर आगात फुलकोबीच्या लागवडीपासून तुम्हाला 2-2.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल. यातील 50,000 रुपये शेतीवरील खर्च काढून टाकल्यास, तरीही तुम्हाला 2 लाख रुपये निव्वळ नफा मिळेल. म्हणजेच 4 महिन्यांत 2 लाख रुपये मिळतील.
Published on: 06 July 2022, 01:45 IST