Agripedia

शेतकरी बांधवांनो (Farmer) जर आपणास कमी कालावधीत अधिक उत्पन्न कमवायचे (Farmer Income) असेल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. काळाच्या ओघात भारतीय शेतीत (Farming) मोठा बदल बघायला मिळत आहे विशेषता शेतकरी बांधव आता पीकपद्धतीत मोठा बदल करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नात भरीव वाढ देखील होत आहे.

Updated on 21 May, 2022 11:29 PM IST

शेतकरी बांधवांनो (Farmer) जर आपणास कमी कालावधीत अधिक उत्पन्न कमवायचे (Farmer Income) असेल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. काळाच्या ओघात भारतीय शेतीत (Farming) मोठा बदल बघायला मिळत आहे विशेषता शेतकरी बांधव आता पीकपद्धतीत मोठा बदल करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नात भरीव वाढ देखील होत आहे.

आज आपण देखील शेतकरी बांधवांसाठी काजू शेती विषयी अवगत करणार आहोत. शेतकरी बांधवांनो काजू हे बारामही मागणी मध्ये असलेले उत्पादन आहे. यामुळे याची शेती निश्चितच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणारी आहे. मित्रांनो काजूला पावसाळा हिवाळा उन्हाळा तिन्ही ऋतूमध्ये मोठी मागणी असते. यामुळे याची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

Health Tips: कच्च दुध पित असाल तर सावधान! आरोग्यावर होतात ‘हे’ घातक परिणाम

काजु शेती आहे खूप फायदेशीर 

गेल्या काही वर्षांत सरकारने शेतकऱ्यांना असे शेतीचे पर्याय स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. तर काजू लागवडीचा पर्याय देखील खूप फायदेशीर मानला जातो. काजू लागवडीत तुम्ही काजू बाजारात विकून लाखो रुपयांचा नफा मिळवू शकता. याशिवाय तुम्ही हे काजूचे बोन्ड बाजारात विकू शकता.

Pm Kisan Yojana: मोठी बातमी! कृषीमंत्र्यानी सांगितलं 'या' दिवशी मिळणार शेतकऱ्यांना दोन हजार

एक पीक वाढण्यास 3 वर्षे लागतात

मित्रांनो कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, काजूचे पीक तयार होण्यासाठी 3 वर्षे लागतात. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, काजूच्या झाडाची लांबी सुमारे 14 ते 15 मीटर असते. काजूच्या बोन्डचा वापर पेंट्स आणि वंगण बनवण्यासाठी केला जातो. या वनस्पतीची खास गोष्ट म्हणजे ती उष्ण हवामानात चांगली वाढते. तुम्हीही काजूची शेती करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या या शेतीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

Success: नोकरीला राम दिला आणि सुरु केला डेरी फार्मिंगचा व्यवसाय; आज करतोय लाखोंची कमाई

काजूची लागवड कुठे केली जाते?

देशातील काजूच्या एकूण वापरापैकी 25% उत्पादन भारतातच होते. काजु प्रामुख्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक इ. राज्यात उत्पादित केला जातो. त्याच वेळी, काजूची काही लागवड उत्तर प्रदेशात आहे, म्हणजे U.P. आणि झारखंडच्या काही भागात आढळते.

काजू शेतीतुन बंपर कमाई होईल

या काजू लागवड व्यवसायाची खास गोष्ट म्हणजे त्याची रोपे लागवड केल्यानंतर बरीच वर्ष पुन्हा लागवड करण्याची गरज नाही, म्हणजे पुनर्लावणी करण्याची गरज नाही. एक हेक्टर जमिनीवर तुम्ही 500 झाडे लावू शकता.

एका झाडापासून सुमारे 20 किलो काजू तयार होऊ शकतो. त्याचबरोबर एक हेक्टर जमिनीतून सुमारे 10 टन काजूचे उत्पादन घेतले जाते. त्याची संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर, तुम्ही ते सुमारे 1200 रुपये किलोप्रमाणे विकू शकता. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की अशा परिस्थितीत तुम्ही काही दिवसात लाखो रुपये कमवू शकता.

हवेत बटाटा लागवड करा आणि दहापट अधिक नफा कमवा; जाणुन घ्या 'या' टेक्निकविषयी

English Summary: Cashew farming will make farmers rich! Read some important tips about cashew farming
Published on: 21 May 2022, 11:29 IST