Agripedia

कारली हे वेलवर्गीय पीक असल्याने वेलींना आधार दिला असता त्यांची वाढ चांगली होते. नवीन फुटीला सतत चांगला वाव राहतो आणि त्यामुळे फळधारणा चांगली होते.

Updated on 25 October, 2021 10:45 PM IST

दर्जेदार, प्रमाणात उत्पादन मिळण्याकरिता वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीच्या आधाराने वाढवणे फायदेशीर दिसून आले आहे वेलवर्गीय भाज्या मंडप, ताटी, आधाराशिवाय चांगल्या येत नाहीत. जमिनीवर लागवड केली असता काही मर्यादित फुटवे आल्यानंतर नवीन फुटवे येत नाहीत, वेली केवळ एकदाच फळे देतात मंडपावर वेली ६ ते ७ महिने चांगल्या राहतात,, तर जमिनीवर केवळ ३ ते ४ महिनेच चांगल्या राहतात, त्यामुळे लागवडीसाठी मंडप किंवा ताटी पद्धतीचा वापर करावा.

मंडप केल्याने फळे जमिनीपासून ५ ते ६ फूट उंचीवर वाढतात, त्यामुळे पान, फळे यांचा जमिनीशी संपर्क न आल्यामुळे ओलावा लागून ती सडत नाहीत, कीड व रोगांचे प्रमाण कमी राहते फळे लोंबकळती राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते हवा, सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि चांगला राहतो.

वेल मंडपावर पोचेपर्यंत दीड ते दोन महिने कालावधी जातो, यामुळे पिकामध्ये पालेभाज्यांसारखी मिश्रपिके घेता येतात.

अशी करा लागवड

लागवडीसाठी फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी या सुधारित जातींची निवड करावी. हेक्‍टरी दोन ते अडीच किलो बियाणे लागते लागवड १.५ ×१ मीटर अंतरावर करावी माती परीक्षणानुसार २० टन शेणखत व १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाशची मात्रा द्यावी

८ ते १० दिवसांच्या अंतराने हंगाम व गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात १५ ते २० दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करावी लागवडीनंतर एक महिन्यांनी वरखतांची मात्रा द्यावी.

- प्रवीण सरवदे, कराड

English Summary: Carley planting information
Published on: 25 October 2021, 10:45 IST