Agripedia

रसायनशास्त्र विषयाच्या पदवी व पदवीत्तर शिक्षणानंतर करिअरच्या औद्योगिक क्षेत्रात विपुल प्रमाणात संधी आहेत” असे आवाहन डॉ नाजिया ए रसिदी यांनी केले.

Updated on 11 February, 2022 4:00 PM IST

बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात, रसायनशास्त्र विभागाच्यावतीने आजादी का अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधुन रसायनशास्त्र विषयाच्या पदवी व पदवीत्तर शिक्षणानंतर करिअरच्या संधी या विषयावर एक दिवसीय राज्य स्तरीय आँनलाईन सेमीनार चे आयोजन दिनांक ०५ फेब्रुवारी २०२२ गुरूवारी सकाळी ११:०० वाजता करण्यात आले.हे सेमीनार किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून तसेच

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर यांच्या सहकार्यातून घेण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड हे होते.

सेमीनार चे मुख्य मार्गदर्शक डॉ. नाजिया ए.रसीदी ह्या होत्या त्यांनी आपल्या भाषणात बोलतांना म्हनाले रसायनशास्त्र हा विषय अत्यंत म्हत्वाचा विषय आहे. पदवी व पदवीत्तर शिक्षनानंतर औद्योगिक क्षेत्रात विपुल प्रमाणात नौकरी च्या संधी आहेत आसे ते म्हनाले तर बीज भाषक मार्गदर्शक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ रसायनशास्त्र मंडळ अध्यक्ष प्रोफेसर डाँ. बी.एस.दवणे, डॉ. संतोष देवसरकर यांनी रसायनशास्त्र विषयाचे संशोधन क्षेत्रात किती महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी संशोधन कार्यास गती द्यावी आसे म्हनाले। डॉ. हंगरगे हे रामटेक येथून आँनलाईन चर्चसत्रात सहभागी झाले होते

त्यांच्या प्रग्लभ ज्ञानाचा फायदा निश्चितच होईल. त्यांनी रसायनशास्त्र विषयाच्या सुक्ष्म संकल्पना सहज सरळ भाषेत विद्यार्थ्यांना सांगितल्या व

रसायनशास्त्र विषयाची पदवी व पदवीत्तर विषयाच्या करिअर च्या संधी या विषयावर मौलिक व सखोल मार्गदर्शन केले. सेमीनार चा अध्यक्षीय समारोप किनवट शिक्षण संस्थेचे संस्था समन्वयक प्रा.राजकुमार नेम्मानीवार यांनी केला.या सेमीनार ला बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सहभाग नोदवला.चर्चा सत्राचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ. ए.पी.भालेराव यांनी केले. राज्यस्तरीय सेमीनार साठी प्रमुख उपस्थिती प्राचार्य डाँ.एस.के.बेंबरेकर उपप्राचार्य डॉ. जी.एस.वानखेडे, संस्था समन्वयक प्रा.राजकुमार नेम्मानीवार,डॉ. जी.बी.लांब, डॉ. योगेश सोमवंशी,

डॉ. आनंद भालेराव,डॉ. सुरेन्द्र शिंदे,कार्यालयीन अधिक्षक राजेंद्र धात्रक, प्रा.किशन मिराशे,रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा.शेषराव माने, प्रा.ममता जोनपेल्लीवार,ग्रंथपाल एम.एस.राठोड, डॉ.शुभांगी दिवे ,प्रा.आम्रपाली हाटकर, डॉ.पी.डी.घोडवाडीकर, प्रा.सुलोचना जाधव ,प्रर्यवेक्षक प्रा.अनिल पाटील, प्रा.पुरूषोत्तम यरडलावार, प्रा.डी.टी.चाटे, प्रा.संदिप राठोड, प्रा.सुनिल राठोड, प्रा.सुशील मुनेश्वर

डॉ रचना हिपळगावकर,डॉ स्वाती कुरमे, मिलिंद लोकडे,नारायण पवार काशिनाथ पिंपरे,सुधीर पाटील यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. चर्चा सत्राचे सुत्रसंचलन प्रा.डॉ आनंद भालेराव यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.संदिप राठोड यांनी केले.

English Summary: Career Opportunities after Degree and Post Graduate Studies in Chemistry - Dr. Nazia A rasidi
Published on: 11 February 2022, 04:00 IST