Agripedia

ज्या ठिकाणी ड्रीप आणि मल्चिंग चा वापर करणार आहे

Updated on 30 August, 2022 7:32 PM IST
AddThis Website Tools

ज्या ठिकाणी ड्रीप आणि मल्चिंग चा वापर करणार आहे तिथे रोपांची अथवा बियाण्याची लागवड करण्यापूर्वी शेताची पूर्णपणे मशागत करून बेड मध्ये खतांची मात्रा देऊन बेड पूर्णपणे तयार करून घ्यावे.

त्यानंतर त्यावर ड्रीप संचाची मांडणी करून 10 ते 15 मिनिटे पाणी सोडून एकदा ड्रीप संच तपासून घ्यावा त्यानंतर मल्चिंग पेपर टाकावा.Check the drip set once and then apply the mulching paper.मल्चिंग पेपर टाकल्यानंतर लगेच होल न पाडता एक दिवस पेपर पूर्णपणे उन्हात तापून द्यावा व दुसऱ्या

दिवशी ठिबक मधून पाणी सोडावे.पाणी सोडल्यानंतर पेपर ला होल नसल्यामुळे आतमध्ये वाफ तयार होऊन जमिनीतील कीड व रोग नियंत्रणास मदत होते.त्यनंतर तिसऱ्या दिवशी पेपर ला होल पाडून पुन्हा

पाणी सोडावे जेणेकरून आतील वाफ बाहेर पडली जाईल व त्यांनतर चौथ्या दिवशी जमिनीत वापसा असताना रोपांची लागवड करावी.असे केल्यामुळे जमिनीतील उष्णता कमी होऊन रोपांची मर होणार नाही.

 

लेख संकलित आहे.

English Summary: Care to be taken while planting crops if there is mulching paper!
Published on: 30 August 2022, 07:32 IST