बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्केपर्यंत खाली आल्यावर साठवण करावी. ज्या ठिकाणी सोयाबीनची साठवण करावयाची आहे ती जागा ओलसर नसावी. साठवलेल्या बियाण्यावर कोणत्याही प्रकारचा दाब पडणार नाही याची दक्षता घ्यावी. पोत्याची साठवण पार उंचीपर्यंत न करता जास्तीत जास्त पाच पोत्यांची थप्पी मारावी. मळणी केलेले बियाणे प्लास्टिकच्या पोत्यामध्ये साठवणूक करू नये.पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता चाचणीसाठी शेतकऱ्यांनी स्वत:कडे असलेले बियाणेची चाळणी करुन त्यामधील काडी कचरा, खडे, लहान, खुरटलेले बियाणे वेगळे करावे.
चाळणीनंतर स्वच्छ झालेले एका आकाराचे बियाणे चाचणीसाठी निवडावे. कागद घेऊन त्या लाचार घडया पाडाव्यात यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी १० बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवुन त्याची गुंडाळी करावी. अशा रितीने १०० बियांच्या १० गुंडाळया पॉलीथीन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात.जर ती संख्या ५० असेल तर उगवण क्षमता ५० टक्के आहे, असे समजले जाते. जर ती संख्या ८० असेल तर उगवण क्षमता ८० टक्के आहे असे समजावे. अशा पद्धतीने उगवण क्षमतेचाअंदाज घेता येतो.
सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चांगली म्हणजेच ७० ते ५ टक्के असेल तर शिफारस केलेल्या मात्रे नुसार प्रती हेक्टरी ७५ किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. उगवण क्षमता ७० टक्के पेक्षा कमी असल्यास त्याचे प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीकरीता वापरावे. रायाझोबियम व पीएसबी या जीवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रती १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करुन असे बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी. ७५ ते १०० मी. मी पाऊस झाल्यानंतरच सोयाबिनची पेरणी करावी.बियाण्याची पेरणी ३ ते ४ से.मी. खोलीपर्यंत करावी.पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बिजप्रक्रीया करावी.
Published on: 30 May 2022, 04:50 IST