Agripedia

सध्या रब्बी हंगामाची लगबग सुरू आहे.रब्बी हंगामाचा विचार केला तर रब्बी हंगामात पेरणी केलेले पिके हे सर्वस्वीविहिरीचा किंवा बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असतात.त्यामुळे सहाजिकच कृषी पंपाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो.त्यामुळे रब्बी हंगामात पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी आपल्या कृषिपंपाची काळजी घेणे नितांत गरजेचे असते

Updated on 15 November, 2021 12:01 PM IST

सध्या रब्बी हंगामाची लगबग सुरू आहे.रब्बी हंगामाचा विचार केला तर रब्बी हंगामात पेरणी केलेले पिके हे सर्वस्वीविहिरीचा किंवा बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असतात.त्यामुळे सहाजिकच कृषी पंपाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो.त्यामुळे रब्बी हंगामात पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी आपल्या कृषिपंपाची काळजी घेणे नितांत गरजेचे असते

साधारणपणे आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी कृषी पंपांना ऑटो स्विच कनेक्ट केलेले असतात.परंतु यामुळे रोहित्रा वरील भार वाढल्याने रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे शेतकरी बंधुंनी कृषी पंपांना ऑटो स्विच जोडणे आयोजित कॅपॅसिटर बसवले तर त्याचा फायदा खूप प्रमाणात होतो.रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंपाचा वापर वाढतो.तसेच विजेचा लपंडाव नेहमीच सुरू असतो.त्यामुळे शेतकरी बंधू बऱ्याचदा कृषी पंप ऑटोमॅटिक सुरू व्हावेत यासाठी कृषी पंपांना ऑटो स्विच बसवतात.या ऑटो स्विच मुळेशेतकऱ्यांचा वेळ तर वाचतो मात्र त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात.

ऑटो स्विच चे धोके

आता सर्रासपणे ऑटो स्विच चा वापर वाढताना दिसत आहे.विजेच्या लपंडावामुळे वैतागलेल्या शेतकरी लाईट आल्यावर ऑटोमॅटिक कृषी पंप चालूव्हावात्यासाठी कृषी पंपाला ऑटो स्विच बसवतात.पण या ऑटो स्विचमुळे रोहित्रा वरील भार वाढत असून रोहित्र जळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

यामध्ये पुन्हा रोहित्र उपलब्ध करून देणे यामध्ये बराच वेळ लागत असल्याने शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते.त्यामुळे थोडा वेळ खर्च केला तरी चालेल पण ऑटो स्विच मुळे होणारे नुकसान टाळणे गरजेचे आहे.

 कृषीपंपाला कॅपॅसिटर बसवण्याचे फायदे

कृषी पंपाच्या क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसवल्यास रोहित्र जळण्याचे किंवा खराब होण्याचा धोका कमी होतो.कॅपॅसिटर च्या वापरामुळे कमी दाबाचा वीजपुरवठा,रोहित्र जळाल्यासकिंवा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधी खंडित वीजपुरवठाया समस्या सोडवण्यास मदत होते. कॅपॅसिटर हे एक स्वीचअसून पुरवठा होणाऱ्या विजेवर त्यामुळे नियंत्रण ठेवण्यास मदत होते. यामुळे नुकसान तर टळणार  आहेच पण शेतकऱ्यांच्या वेळेचीही बचत होणार आहे.

 

यावर्षी असलेल्या मुबलक पाणी साठ्याचा उपयोग करणे महत्त्वाचे

 या वर्षी जास्त झालेल्या पावसामुळे सगळीकडेप्रकल्प तुडुंब भरले आहेत. त्यामुळे कृषी पंपाचा वापर करून रब्बी हंगामातील पिकांची जोपासना करणे फार महत्त्वाचे आहे.रब्बी हंगाम सुरू झाला की कृषी विद्युत पंपांचा  वापर वाढतो.त्यामुळे कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवणे गरजेचे आहे. शिवाय ऑटोस्विच शेतकऱ्यांचे नुकसान आहे. उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर करून घेण्यासाठी कृषी पंपांना कॅपॅसिटर बसण्याचे आवाहन लातूर विभागाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.

(संदर्भ- हॅलो कृषी)

English Summary: capasitor is very safe for the electric pump not connect autoswitch
Published on: 15 November 2021, 12:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)