Agripedia

अधुन मधून वाटर सोलुबल च्या भेसळी बाबत बातम्या येतात

Updated on 14 July, 2022 5:08 PM IST

अधुन मधून वाटर सोलुबल च्या भेसळी बाबत बातम्या येतात व शेतकऱ्यांच्या मनात फसवलेजात असल्याची खंत सुरु होते; पण याला जबबाबदार तर आपणच आहोत!!मित्रहो 10 -20 वर्षापुर्वी वाटर सोलुबल खते अगदी नव्हतीच म्हटले तरि चुकिचे ठरणार नाही!!मग तेव्हा उत्पन्न निघत नव्हते का? बागा पिकत नव्हत्या का?ड्रिप इरिगेशन आले व त्यासोबत वाटर सोलुबल चे तंत्र ही आले !! ज्या इस्राईल मधून हे तंत्र आले ते कंप्यूटर कण्ट्रोल फर्टिगेशन करतात.फ़िल्टर चे प्रेशर गेज वर्षातून कधीतरी पहणारे आम्ही केव्हा कंप्यूटर ऑटोमोशंन समजनार.आमच्याकडे असते ते केवळ आंधळे अनुकरण!पीपीएम मध्ये खते देतात आम्ही किलो मध्ये देतो.एखाद्या तंत्राची एक बाजू पाहून आम्ही एवढे वेडे होतो की त्याची दूसरी बाजू आम्हाला दुष्परिणाम दिसल्याशिवय लक्षातच येत नाही!मित्रहो वाटर सोलुबल आपण ज्या अशास्रीय मोघम पनाने वपरतो त्यामुळे आपण अनेक समस्यान्न तोंड देत आहोत ! जादा पीपीएम मुळे PH वाढतो EC वाढतो ', झाड़े रेगुलर फर्टिगशन वर डिपेंडेंट बनतात, म्हणजे ख़त देने बंद केले की झाड़ लगेच कमजोर होते एकाच जागेवर खते मिळाल्यामुळे मातीत मुळांची वाढ खुंटते !! मुळांचा अन्न शोधन्याची प्रक्रिया थांबून जाते!! नेमाटोड , स्ट्रेस मध्ये वाढ होते व रोगाला पोषक वातावरण मिळते.

एक पर्याय आहे तो म्हणजे दानेदार खते बेसल मध्ये वापरणे भिजवून नीवली करुण ड्रिप मधून सोडने.पण जे नेहमी तक्रार करत असतो, खते अपटेक होत नाही त्याचे कारन रासायनिक ख़त असो किंवा सेंद्रिय ख़त ते कच्चे असेल तर अजिबात लागु होणार नाही ते मातीत फिक्स होते व उलट जमींन ख़राब करूँन बुरश्या व रोगन्ना आमंत्रण देतेसेद्रिय खते (शेनखत व इतर ) कुजवले की लागु होतात व् रासायनिक खतांमध्ये ह्यूमस मिसळला की त्यांचे चिलेशन होते व असे मिनरल्स मुलांद्वारे झाड़कडे पाठवले जातात या प्रक्रियेत ह्यूमस चा रोल अत्यंत महत्वपूर्ण आहे.जसे कितीही भूक लागली तरी आपण कच्चा तांदुल खावु शकत नाही , शिजलेला भात पाहिजे.अगदी तसेच वनस्पतिचे आहे , तिला शिजलेले ख़त म्हणजे ह्यूमस मध्ये चिलेट झालेले ख़त हवे!!आपल्या आजोबांच्या काळात जमिनित ह्यूमस 3-4% होता तेव्हा एका एकरला एक रासायनिक खताची बैग टाकली तरी 100 % लागु व्हायची!एका बँग मध्ये एकरी 400 गोनी कांदा पिकायचा , एक 10:26 :26 ची बैग टाकली की 100 क्रेट टोमेटोचा एक तोडा व्हायच्चा!3 ते 4 % असलेला ह्यूमस आता 0.4 % एवढा नापिकतेच्या पातळीवर आला आहे !! त्यामुळे खते लागु होत नाही व कितीही गोन्या खते टाकली तरी रिजल्ट मिळत नाही. रोगराई मात्र वाढत जाते, कारण कच्चे ख़त न झाडाला चालते न मातिला!

जस जसा मातीत ला ह्यूमस कमी होत गेला तस तसा खतांचा परिणाम कमी होत गेला, त्यामुळे तात्काळ लागु होणारे वाटर सोलुबल एक पर्याय म्हणून समोर आले पण मित्रहो आता तेहि अपटेक करण्यास मातीतिल सुपिकता समर्थ रहिलेली नाही? म्हणून आता काम करायचे ते ह्यूमस वर यामागे शुद्ध सायन्स आहे, ठोकताळा नाही!अनुभव व सर्वेक्षण असे सांगतात की वाटर सोलुबल पेक्षा दानेदार ची निवली फलबगांसाठी अधिक सुरक्षित आहे.कारणे अनेक आहेत त्यावर नंतर चर्चा करू .खर्च कमी व फायदा जास्त हाही एक फायदाच् आहे शेतकरी ड्रिपमधुन सोडण्यासाठी खालीलप्रमाणे र्याय निवड करू शकता.12:61:0 ऐवजी 18:46:0 13:40:13 ऐवजी 12:32:1619:19:19 ऐवजी 19:19:190:52:34 ऐवजी 10:26:26मैग्नेशियम (चिलेटेड) ऐवजी मैग्नेशियम सल्फेटफेरस (चिलेटेड) ऐवजी फेरस सल्फेटकैल्शियम (चिलेटेड) ऐवजी कैल्शियम नाइट्रेट किंवा क्लोराइड!!प्रमाण :-एकरी दानेदार ख़त 7 - 10 किलो + पानी 30 लीटर 2 तास एकत्र भिजवून नंतर 100 लीटर पाण्यात आदल्या दिवशी रात्रि एकत्र भिजवावे व दुसऱ्या दिवशी ड्रिप मधून निवली गाळून सोडवीहा डोस दर 10 दिवसांनी देने!ज शेतकरी वाटर सोलुबल च वापरु इच्छित आहेत त्यांनी शक्यतो प्रत्येक दोन दिवसांनी द्यायला हवे!! तसे साइंस च्या संशोधनप्रमाने ते

दररोज द्यायला हवे पण आपल्याकडे इस्राइल सारखे कंप्यूटेराईज्ड ऑटोमोशन नाही ! आपण खते त्यांचे आणली व् पद्धत आपल्या सोयीची वापरतो ?वाटर सोलुबल हे ( इंस्टेंट ) लगेच लागु होण्यासाठी बनलेले आहे त्यामुळे ते नियमित थोड़े थोड़े द्यायला हवे !! शेतकरी मित्रहो ज्याप्रमाणे 4-5 दिवस उपवासी राहुन् त्या सर्व पोळ्या एकाच दिवशी खावु शकत नाही ?होय नाअगदी त्याचप्रमाने झाडाला दररोज 1 किलो ख़त द्यायला पाहिजे ते चार पांच दिवसांनी 4 किलो कसे चालेल?असो.जमिनीला रासायनीक खत दिल्यामुळे उत्पन्न जास्त होते ह्या एकाच गोष्टीमुळे सर्व शेतकरी खताचा वापर करतात.जमीन खत खात नाही.उलट खतामुळे जमिनीच्या वरच्या थरात असलेले जिवाणू मरतात.खालील थरातील जिवाणू मेलेले जिवाणू खातात.ऊर्जा निर्माण झाली की पीक होते.वारंवार रासायनिक खते दिल्यामुळे आपल्या शेतात असलेल्या जिवाणूंची संख्या कमी झाली आहे.ह्याच कारणामुळे आज पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही.म्हणून शेतकरी बंधूंना नम्र विनंती आपण रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक खत व शेंदिय कार्बन वाढवणारी औषध वापर करा.ज्या प्रमाणे आपल्याला ईश्वराने हात, पाय,तोंड दिले तसे जमिनीला नाही.जमीन खत खात नाही. वारंवार रासायनिक खते दिल्यामुळे आपल्या जमिनी नापीक होत आहेत.सर्व शेतकरी बंधूंना पुन्हा एकदा विनंती वरील लेखामध्ये सांगितल्या प्रमाणे जमिनीचा पोत सुधारून शेती करा .

English Summary: Can granular fertilizers be an alternative to water soluble? What are its advantages and disadvantages?
Published on: 14 July 2022, 05:08 IST