Agripedia

काकडी या पिकाची योग्य नियोजन करून जर उत्पन्न घेतले तर शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत सुधारणा होऊ शकते.महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, जामनेर, यावल,पारोळा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात काकडीचे अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

Updated on 07 February, 2022 3:42 PM IST

काकडी या पिकाची योग्य नियोजन करून जर उत्पन्न घेतले तर शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत सुधारणा होऊ शकते.महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, जामनेर, यावल,पारोळा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात काकडीचे अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

 काकडीला उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मागणी असते. जर शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात योग्य नियोजन करून चांगले उत्पन्न घेतले तर शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.

 काकडी लागवडीचा कालावधी काकडी पिकाची लागवडवर्षाच्या  जून किंवा जुलै आणि जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात करणे महत्वाचे असते. लागवड करण्याआधी शेतीची चांगली मशागत करून योग्य प्रमाणात शेण खताचा पुरवठा करावा. जर माती परीक्षण केले असेल तर उत्तम. 50 किलो पालाश 50 किलो स्फुरद या रासायनिक खतांचा पुरवठा योग्य प्रमाणात करावा. नत्राचा पुरवठा एकाच वेळेस न करता दोन टप्प्यात विभागून द्यावा. रासायनिक खतांचा पुरवठा खुरपणी झाल्यानंतर साधारणत: 3 आठवड्यांनी पहिला डोस व 6 हप्त्यानंतर दुसरा डोस द्यावा.

जमीन व हवामान-काकडी पिकाच्या लागवडीसाठी मध्यम किंवा रेताड जास्त प्रमाणात उपयोगी आहे. जास्त खोल व  निचरा होणाऱ्या जमिनीतही लावणी करता येते. काकडी पिकाच्या उत्पादनात हवामान या घटकाचाफार प्रमाणात प्रभाव पडतो. साधारणपणे काकडी पिकासउष्ण हवामान लाभदायी असते. लागवडीच्या वेळी 11 अंश सेल्सिअस पेक्षा तापमान कमी नसावे जर तापमान यापेक्षा कमी असेल तर पिकाच्या उगवण शक्तीवर त्याचा परिणाम होतो काकडी पिकाच्या वाढीसाठी कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 24 अंश तापमान सेल्सियस तापमान योग्य असते.

 लागवड पद्धत- काकडी पिकाची लागवड सरी-वरंबा पद्धतीने केलेली चांगली असते. 1.5 ते 1 मी. चे आळेपाडून तीन फुटाची सरी पाडावी व त्यात 90 सेमी अंतरावर टोकण पद्धतीने लावणी करावी.

 पाण्याचे प्रमाण- जमिनीचा मगदूर पाहून व इतर वेळेस गरज ओळखून पाण्याचा योग्य तो पुरवठा करावा काकडी पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. जर उन्हाळ्यात उन्हाचे प्रमाण जास्त असेल तर पाण्याचा ताण आला तर वेल पिवळे पडतात. शक्यतो फुल धारणेच्या वेळी पाणी योग्य प्रमाणात देणे फार महत्त्वाचे आहे.पाण्याचा ताण देऊन एकदम जास्त प्रमाणात पाणी दिल्यासफळांना तडे पडू शकतात. काकडीत मादी फुलांची वाढ होणे उत्पादनवाढीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.

 त्याकरिता जिब्रेलिकॲसिड 10-25ppmपीपीएम किंवा बोरोन  3 पीपीएम च्या  फवारणे पिक 2-4पानावर असताना करावा त्यामुळे मादी फुलांची वाढ होण्यास मदत होते. अन्नद्रव्यांची कमतरता किंवा प्रमाणातील अधिकता काकडीच्या उत्पादन वाढीसाठी योग्य नाही.

काकडी वरील रोग- फळकुज आणि खोडकुज हा काकडी पिकावरील मुख्य रोग आहे. त्यासाठी मॅन्कोझेब किंवा क्लोरोथॅलॉनॉल25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पांढरी माशी,मावा, तुडतुडे यासारख्या रसशोषक किडीचा प्रतिबंध करणे फार महत्त्वाचे असते. त्यासाठी इमोलाक्लोफ्रीड (कॉन्फिडोर ) किंवा, उलाला ह्या कीटकनाशकाची फवारणी प्रति 15 लिटर पाण्यात आठ ते दहा मिली प्रमाणात करावी. जर एकात्मिक कीड व्यवस्थापन केले तर फायद्याचे ठरते. फळांची तोडणी शक्यता काकडी निघायला चालू झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी करावी कारण कोवळ्या फळांना बाजारात चांगली मागणी असते. पर्यायाने चांगला भाव मिळून अधिकचे उत्पन्न मिळते.

English Summary: can earn more profit through cucumber crop cultivation in short time
Published on: 07 February 2022, 03:42 IST