शेतीमध्ये सध्या तरुण वर्ग जास्त वळताना दिसत आहे. हे तरुण शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहेत. जर कुठलीही पीक घ्यायचे असेल तर त्यासाठी आधी जमिनीचा पीएच जाणून घ्यावा, यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे असते.जमिनीचा पीएच योग्य आहे की नाही, या सगळ्या गोष्टींची खातरजमा केल्यानंतर नंतर पीक लागवडीचा विचार केला तर शेतीतून नक्की चांगली कमाई होऊ शकते.
प्रत्येक वेळी आम्ही आमच्या लेखांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पिकांची माहिती देत असतो. आज आपण या लेखाच्या माध्यमातून वाटाणा पिकाविषयी माहिती घेऊ.
वाटाणा पिकाचा अल्पपरिचय
शेतकऱ्यांसाठी वाटाणा लागवड एक चांगला पर्याय आहे.कमी खर्चात चांगले उत्पादन मिळवून चांगला नफा मिळू शकतो.उत्तर भारतात पावसाळी हंगाम संपल्यानंतर वाटाण्याची लागवड केली जाते. अशा परिस्थितीत वाटाणा लागवडीची तयारी करण्याची ही योग्य वेळ आहे. पावसाळा आता संपलेला आहे.त्यामुळे शेतकरी या पिकांच्या लागवडीची तयारी करू शकतात. पावसाळ्यानंतर चा आणि हिवाळा सुरू होण्या आधीचा काळ वाटाणा लागवडीसाठी योग्य काळमानला जातो. लागवड करण्याच्या वेळी मध्ये पुरेसा ओलावा असतो आणि वाटाण्याची पीक अशा हवामानात चांगले येते. आपल्याला माहित आहेच कि वाटण्याला हॉटेल्समध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. वाटाणा हा विविध खाद्य पदार्थात वापरला जातो. त्यामुळे वाटाण्याची मागणी चांगली असते.
वाटाणा पिकासाठी खत व्यवस्थापन
वाटाण्याची लागवड करण्याअगोदर जमिनीची दोनदा नांगरट करणे फायद्याचे असते. नांगरणी केल्यानंतर कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत होईल अशा पद्धतीने मशागत करावी. ना गरजेच्या वेळेस शतात चांगली जुनी शेणखत घालावे. लागवडीनंतर सुमारे दोन महिन्यांनी वाटाण्याच्या झाडाला शेंगा दिसू लागतात आणि शेंगा लागल्यानंतर एक महिन्यांनी वाटण्यापासून शेतकऱ्यांना उत्पादन मिळूलागते.
वाटाणा पिकाची पेरणीची योग्य वेळ
वाटाणा पेरणी ऑक्टोबर मध्ये कधीही करता येते आणि काही भागात तर नोव्हेंबर महिन्यात ही वाटाणा लागवड करता येते. पण लक्षात ठेवा की शेतात ओलावा असावा आणि पाऊस पडणार नाही अशा वेळेस त्याची पेरणी करावी. पेरणीनंतर पाउस पडला तर माती कडकहोते आणि रोपे उगवण्यास अडचण येते.
त्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते.तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे शेतात पाणी साचले तर पेरलेले बियाणे सडू शकते. बियाणे अंकुरण्यासाठी सरासरी 22 अंश सेंटिग्रेड तापमान आवश्यक असते तसेच 10 ते 18 अंश सेल्सिअस तापमानवाटाण्याचा चांगल्या वाढीसाठी योग्य असल्याचे सांगितले जाते.
वाटाणा पिकासाठी पाणी व्यवस्थापन
या पिकाला विशेष अशी पाण्याची गरज नसते कारण वाटाण्याची लागवड हिवाळ्यात केली जाते व या कालावधीत जमिनीत पुरेसा ओलावा असतो. जर तुम्हाला पिकाला पाणी द्यायचे असेल तर फुले येण्याच्या वेळी आणि शेंगा तयार होण्याच्या वेळीपाणी द्यावे. पाणी देताना एक काळजी घ्यावी की शेतात पाणी साचणार नाही.
वाटाण्याच्या काही सुधारित जाती
वाटाण्याचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी बांधवा वाटाण्याच्या काही सुधारित जाती निवडू शकतात. कृषी तज्ज्ञांच्या मते, शेतकऱ्याने वाण निवडताना माती, हवामान आणि प्रदेश लक्षात घ्यावा. वाटाण्याच्या काही सुधारित जाती म्हणजे आर्केल, काशी शक्ती,पंत मटर 155,अर्लीबॅजर, आझाद मटर 1, काशी नंदिनी, पुसा प्रगती, जवाहर मटर 1,जवाहर मटार 3 आणि चार जातींची लागवड फायदेशीर ठरते.
Published on: 18 December 2021, 12:30 IST