Agripedia

कॅमोमाइलमध्ये अनेक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे सर्व प्रकारच्या रोगांच्या निदानात महत्वपूर्ण आहे. कॅमोमाइलचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि ते वृद्धत्वविरोधी कार्य करते. हृदयरोगापासून कर्करोगापर्यंतचे आजार बरे करण्यासाठी हे उपयुक्त आहे.

Updated on 31 August, 2021 6:56 PM IST

कॅमोमाइलमध्ये अनेक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे सर्व प्रकारच्या रोगांच्या निदानात महत्वपूर्ण आहे.  कॅमोमाइलचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि ते वृद्धत्वविरोधी कार्य करते. हृदयरोगापासून कर्करोगापर्यंतचे आजार बरे करण्यासाठी हे उपयुक्त आहे.

कॅमोमाइलमध्ये अनेक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे सर्व प्रकारच्या रोगांच्या निदानात महत्वपूर्ण आहे.  कॅमोमाइलचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि ते वृद्धत्वविरोधी कार्य करते. हृदयरोगापासून कर्करोगापर्यंतचे आजार बरे करण्यासाठी हे उपयुक्त आहे.

Benifits of Chamomile In Marathi

भारतात औषधी वनस्पतींची लागवड करण्याची प्रथा वाढत आहे. शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करायला सुरवात केली आहे. त्या अनुषंगाने शेतकरी विविध प्रकारच्या वनस्पतींची लागवड करत आहे. अशीच एक औषधी वनस्पती म्हणजे कॅमोमाइल. याची लागवड प्रामुख्याने तेलासाठी केली जाते. हे औषधांपासून कॉस्मेटिक वस्तू आणि इतर प्रत्येक सुगंधित  गोष्टीच्या उत्पादनांसाठी वापरले जाते. एक एकर जमिनीत कॅमोमाइलची लागवड केल्यास त्याच्या फुलांपासून सुमारे 6 ते 8 लिटर तेल मिळते. अशाप्रकारे शेतकरी बांधवांना एक एकर लागवडीतून सरासरी 2.5 लाख ते 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. शेतकरी कॅमोमाइल ने बनलेला चहा आणि बियाणे विकून देखील कमवू शकतात. 12 हजार रुपये खर्च करून 1 एकर शेतात कॅमोमाइलची लागवड करता येते.

कॅमोमाइलमध्ये अनेक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे शरीराला होणाऱ्या सर्व रोगांपासून एक ढालप्रमाणे काम करतात. कॅमोमाइलचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि ते वृद्धत्वविरोधी कार्य करते. हृदयरोगापासून कर्करोगापर्यंतचे आजार बरे करण्यासाठी हे उपयुक्त आहे.

 

 

 

 

 

 

जाणुन घेऊया कॅमोमाईल पिकाबद्दल (Information About Chamomile Crop)

कॅमोमाईलचे दोन प्रमुख प्रकार आहेत. पहिला वल्लारी आणि दुसरा जर्मन. आपल्या देशात कॅमोमाईलची लागवड नुकतीच सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वत्र बियाणे उपलब्ध नाही.  शेतकरी बांधव जोधपूर स्थित काजरी या सरकारी संस्थेकडून कॅमोमाइल बियाणे घेऊ शकतात. याशिवाय, कॅमोमाइल बियाणे लखनऊ स्थित CIMAP, NBRI, RRL-Jorhat आणि देशातील विविध कृषी विद्यापीठांमधून मिळू शकतात.

 

 

डोंगराळ भागात शेतकऱ्यांनी एकदा लागवड केल्यानंतर 10-12 वेळा फुलांची तोडणी होऊ शकते. तर मैदानी प्रदेशात फक्त 6-8 वेळा फुलांची तोडणी होऊ शकते. एका बिघा शेतात एका वेळी सुमारे 30 किलो कॅमोमाइल फुलाचे उत्पादन मिळू शकते.

 

 

 

फुलाची काढणी केल्यानंतर ते बंद खोलीत वाळवले जाते. यासाठी तुम्ही चटई, कागद आणि टॉवेल वापरू शकता. वाळायला जिथे फुल ठेवणार तिथे ओलावा नसावा. याचा उपयोग चहापासून तेलापर्यंत होतो. याच्या फुलापासूनच पावडर बनवली जाते आणि ती चहा म्हणून वापरली जाते.

कॅमोमाईलची शेतीसाठी कंपनी सोबत करार करता येतो. हो शेतकरी मित्रांनो याचा वापर हा औषध बनवण्यासाठीच नहीं तर अनेक कॉस्मेटिक उत्पादनात देखील याचा वापर होतो.

कॅमोमाईल शेतीसाठी शेतकरी बांधव कंपनी सोबत करार करून बक्कळ कमाई करू शकतात.

 

 

 

English Summary: camomile farming bright future of farmer
Published on: 31 August 2021, 06:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)