Agripedia

पिकांमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यास, बुरशींचा प्रादुर्भाव होऊन पाणीवहन करणाऱ्या नलिकेवर (xylem) विपरीत परिणाम होतो. पेशीभित्तिकांना पाणी व अन्नपुरवठा करणाऱ्या अवयवांची झीज होऊन मर रोगाची लक्षणे पिकांत दिसून येतात.

Updated on 28 October, 2021 7:23 PM IST

1] पेशी मजबूत ठेवणे 

 पेशी भित्तिका (सेल वॉल) मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम मदत करते. कॅल्शियममुळे पेशी भित्तिका मजबूत व जाड बनतात.

पेशीमध्ये पेक्टिन व पॉलिसॅकराइड आधारक तयार होण्यासाठी कॅल्शियमची जरुरी असते. 

या घटकांमुळे पेशींना मजबुती येते. पिकांच्या पेशी, उती व अवयवांची लवकर वाढ व मजबुती कॅल्शियममुळेच मिळते. 

2] फूल व फळधारणा 

 पिकांमध्ये फूल, फळधारणाक्षमता वाढविण्यासाठी कॅल्शियम मदत करते. 

3] पिकांची प्रत 

 पिकांची प्रत उत्तम राहण्यास व उत्पादन अधिक काळ टिकून राहण्यास कॅल्शियम मदत करते.

4]  उष्णतेपासून पिकांचे संरक्षण 

पिकांमध्ये सर्वांत महत्त्वाची वातावरणातील प्रकाश संश्‍लेशण क्रिया असते. 

वातावरणातील तापमान जर ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते. 

अति उष्णतेमुळे झाडांचे खोड लांब होते, तर पानांचा आकार लहान होतो. या सर्व घटकांशी लढा देण्यासाठी पिकांना कॅल्शियम गरजेचे असते.

कॅल्शियममुळे पिकामध्ये उष्माघातविरोधी प्रथिने तयार केली जातात. 

5]  रोगप्रतिकारक क्षमता 

कॅल्शियम पिकांमध्ये बुरशीजन्य व जिवाणुजन्य रोगाविरुद्ध रोगप्रतिकारक क्षमता वाढवते.

पिकांमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यास, बुरशींचा प्रादुर्भाव होऊन पाणीवहन करणाऱ्या नलिकेवर (xylem) विपरीत परिणाम होतो. 

पेशीभित्तिकांना पाणी व अन्नपुरवठा करणाऱ्या अवयवांची झीज होऊन मर रोगाची लक्षणे पिकांत दिसून येतात. 

भुईमूग पिकाला कॅल्शियमची योग्य मात्रा दिली असता शेंगकूज रोग उद्‍भवत नाही. तसेच शेंगा चांगल्या भरल्या जातात. 

कॅल्शियममुळे फळ पिके, भाजीपाला पिके यांचाही बुरशीजन्य व जिवाणुजन्य रोगांपासून बचाव होतो. 

पिथियम, रायझोक्टोनिया, फ्युजारियम, कोलोट्रोटिकम, बोट्राइटीस, ब्लाइट, स्लेटोटिनिया, हैलमिथेस्पारियम यासारख्या रोगापासून संरक्षण मिळण्यास मदत होते. 

 

6]  अन्नद्रव्याचे शोषण 

अन्नद्रव्ये शोषण करणाऱ्या प्रथिनांच्या कार्यात कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावते, त्यामुळे अन्नद्रव्यांचे मुळांद्वारा शोषण होऊन पिकांच्या प्रत्येक भागाला अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. 

कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम अमोनियम नायट्रेट पाण्यात सहज विरघळत असल्याने पाण्याद्वारा व ठिबक सिंचनाद्वारा दिल्यास फायदा होतो. 

7)  भूसूधारके 

 कॅल्शियमचा वापर भूसुधारकांमध्येही होतो. 

कॅल्शियमयुक्त खतांचा वापर जमिनीची आम्लता कमी करण्यासाठी आणि मातीची जडणघडण चांगली राखण्यासाठी केला जातो.

  संकलन - तुषार शिरगीरे

- कृषीकिंग

English Summary: Calcium under plant body role
Published on: 28 October 2021, 07:23 IST