Agripedia

Business Idea: भारतातील शेतकरी (Farmer) आता पारंपरिक शेतीच्या (Farming) पलीकडे जाऊन वैज्ञानिक पद्धती आणि आधुनिक ट्रेंडचा वापर करून शेतीतून (Agriculture) भरपूर नफा (Farmer Income) कमावत आहेत. फुलांची शेती (Floriculture) हे आधुनिक आणि नाविन्यपूर्ण शेतीचे उदाहरण आहे.

Updated on 18 July, 2022 11:30 PM IST

Business Idea: भारतातील शेतकरी (Farmer) आता पारंपरिक शेतीच्या (Farming) पलीकडे जाऊन वैज्ञानिक पद्धती आणि आधुनिक ट्रेंडचा वापर करून शेतीतून (Agriculture) भरपूर नफा (Farmer Income) कमावत आहेत. फुलांची शेती (Floriculture) हे आधुनिक आणि नाविन्यपूर्ण शेतीचे उदाहरण आहे.

फुलशेतीमध्ये सुरुवातीला थोडी गुंतवणूक केली जाते, परंतु एक वेळच्या मेहनतीनंतर शेतकरी अनेक वर्षे नफा कमावतो. म्हणजेच पारंपारिक शेतीच्या तुलनेत बघायला गेले तर फुलशेतीमध्ये फायदेशीर व्यवहार आहे. चला तर मग मित्रांनो आज आम्ही तुमच्याशी रजनीगंधा फुलाची लागवड आणि त्यातून होणारा नफा याबद्दल बोलणार आहोत.

रजनीगंधा लागवडीमुळे शेतकरी श्रीमंत होऊ शकतो. कारण बाजारात रजनीगंधाच्या फुलाला चांगली मागणी आहे. स्त्रियांच्या केसांना लावल्या जाणाऱ्या गजरामध्ये भारतात अनेक ठिकाणी रजनीगंधाचा वापर केला जातो. याशिवाय लग्न समारंभात आणि इतर कोणत्याही समारंभात वापरल्या जाणाऱ्या पुष्पगुच्छांमध्येही रजनीगंधा वापरतात.

रजनीगंधा फुलाचे ताजेपणा बरेच दिवस टिकतो

फुलशेतीमध्ये अनेक विदेशी फुलांच्या लागवडीबाबत शेतकरीही उत्सुक आहे, मात्र कमी खर्चात शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवून देण्यासाठी रजनीगंधाची लागवड केली आहे. रजनीगंधा फुलांची लागवड शेतकऱ्यांना भुरळ घालत आहे.

रजनीगंधा लागवडीकडेही शेतकऱ्यांचा ओढा आहे, कारण बाजारात त्याची मागणी कायम असल्याने शेतकऱ्यांना फुले विकण्यासाठी फारशी धडपड करावी लागत नाही. रजनीगंधा तोडल्यानंतर अनेक दिवस खराब होत नाही, त्यामुळे शेतकरीला नुकसान होण्याची भीती कमी असते.

रजनीगंधा फुलाची या राज्यात होते लागवड

सध्या पश्चिम बंगाल, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी रजनीगंधाची लागवड करतात. महाराष्ट्रात रजनीगंधाची लागवड केली जाते आणि आता दक्षिण भारतात कर्नाटक आणि तामिळनाडूचे शेतकरीही रजनीगंधाच्या फुलांची लागवड करत आहेत.

डोंगराळ भागात जून महिन्यात तुरीची लागवड सुरू होते, तर सपाट भागात सप्टेंबरपासून तुरीची लागवड सुरू होते. हवा आणि पुरेसा सूर्यप्रकाश असलेली जागा या फुलाच्या लागवडीसाठी अति उत्तम मानली जाते. रजनीगंधाफुलांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांना फारशी मेहनत करावी लागत नाही.

5 लाखांचा वार्षिक नफा

एक एकर 90 ते 100 क्विंटल फुले येतात आणि एक एकर शेतजमिनीतुन सुमारे 1-2 लाख रुपये खर्च होतो, आणि  बाजारभावाचा विचार करता रजनीगंधा पिकातून एका वर्षात 5 ते 6 लाख रुपयांचा नफा मिळू शकतो. रजनीगंधाची फुले 4-5 महिन्यांत तयार होतात.

English Summary: business idea rajanigandha farming information read
Published on: 18 July 2022, 11:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)