Business Idea: तुम्हालाही नोकरीचा कंटाळा आला असेल, तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम बिझनेस आयडिया (Business Idea) घेऊन आलो आहोत. मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आजचे तरुण शिक्षण पूर्ण करून आता बंपर कमाई करण्यासाठी शेतीकडे (Farming) वळत आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही देखील शेती करत असाल तर मिरचीची लागवड (Chilli Farming) करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
याचे कारण म्हणजे याला नेहमीच मागणी असते. चवीला तिखट असली तरी त्यातून मिळणारी कमाई तुमच्या आयुष्यात गोडवा आणू शकते. साधारणपणे मिरचीच्या लागवडीपासून 9-10 महिन्यांत 12 लाख रुपयांपर्यंत नफा मिळत असल्याचा दावा केला जातो.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मिरचीची शेती भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या राज्यात देखील अनेक ठिकाणी मिरचीची शेती केली जाते. मिरचीची शेती शेतकऱ्यांना (Farmer) लाखो रुपये उत्पन्न (Farmer Income) कमवून देत असल्याने अलीकडे मिरचीच्या शेतीकडे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात वळले आहेत.
किती येतो खर्च
भारतात हिरव्या आणि लाल मिरचीची लागवड केली जाते. प्रत्येक हंगामात येथे मिरचीची लागवड केली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका हेक्टरमध्ये सुमारे 7 ते 8 किलो बियाणे लागतात. तुम्हाला हे बियाणे 20 ते 25 हजारांना मिळतील, तर जर तुम्ही हायब्रीड मगधीरा बियाण्यांबद्दल विचार करत असाल तर हे बियाणे तुम्हाला 35 ते 40 हजारात मिळेल.
याशिवाय पेरणीपूर्वी शेतात पालापाचोळा, खत टाकावे लागेल. त्याच बरोबर सिंचन, खते, कीटकनाशके, मार्केटिंग इत्यादींचा खर्चही होईल, एकूण एक हेक्टरसाठी तुम्हाला अडीच ते तीन लाख रुपये लागतील.
तुम्ही किती कमावणार?
मगधीरा हायब्रीड मिरचीचे उत्पादन एक हेक्टरमध्ये 250 ते 300 क्विंटल पर्यंत असते. मिरचीच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, बाजारात वेगवेगळ्या वेळी ती 30 ते 80 रुपये प्रति किलो असते. सरासरी 50 रुपये प्रति किलो मिरची घेतल्यास, 300 क्विंटल मिरचीची किंमत 15 लाख रुपये बनते, म्हणजे 12 लाख रुपयांचा नफा आणि तोही केवळ 9 ते 10 महिन्यांत. निश्चितच मिरचीची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा व्यवहार ठरणार आहे. मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांनी मिरचीची लागवड करताना नेहमी सुधारित जातींची निवड करावी असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देत असतात.
Published on: 03 July 2022, 04:46 IST