जळगाव- यंदा कपाशीला मिळालेला १३ हजारांचा विक्रमी भाव पाहता येत्या खरीप हंगामात कपाशीच्या क्षेत्रात वीस टक्के वाढ होणार आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. साडेपाच लाखांपेक्षा अधिक हेक्टरवर कपाशीचा पेरा होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, बागायती कापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली असली तरी बाजारपेठेत बी. टी. बियाणे २५ मेनंतरच विक्रेत्यांकडे दाखल होतील.
जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याची विक्री होईल.
यंदा बी. टी. २, रासायनिक खतांचे दर वाढणार असल्याचे अगोदरच जाहीर करण्यात आले आहे. खतांची एनवेळी टंचाई भासू नये, म्हणून यूरिया व डीईपी खतांचा स्टॉक करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत.साडेपाच लाख हेक्टरवर कपाशी गत वर्षी खरीप हंगामात कपाशीला साडेआठ ते तेरा हजारांदरम्यान दर प्रतिक्विंटल मिळाला आहे. यामुळे शेतकरी यंदा कपाशीच्या लागवडीकडे वळतील. परिणामतः कपाशीच्या लागवडीत वीस ते पंचवीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
खतांचे दर वाढतील : जिल्ह्यात गत खरीप हंगामात दोन लाख ५० हजार टन खते लागली होती. आता एक लाख दोन हजार टन साठा शिल्लक आहे. तर जिल्ह्याला तीन लाख ३९ हजार टन खतांचे आवतन मिळणार आहे. रशिया- युक्रेन युद्धामुळे खतांच्या दरवाढीवर परिणाम होणार आहे. यामुळे अगोदरच शेतकऱ्यांनी खते विकत घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी खतांची खरेदी केली आहे. तरीही टंचाई जाणवू नये म्हणून यूरिया खतांचा ७७६० टन, डीईपीचा १७६० टन बफर स्टॉक करण्याचे आदेश कृषी विभागाला आहेत.
खरीप हंगाम आढावा बैठक १ ते १५ मे दरम्यान घेण्याबाबत पत्र कृषी विभागाला नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यानुसार आढावा बैठक घेण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले.
भविष्यातील पेरणीचे संभाव्य क्षेत्र असे : कापूस- पाच लाख ५० हजार हेक्टर, मका- ७० हजार, ज्वारी- ३५ हजार, उडीद, मूग, तूर मिळून ६० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होईल.
जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याची विक्री होईल. यंदा बी. टी. २, रासायनिक खतांचे दर वाढणार असल्याचे अगोदरच जाहीर करण्यात आले आहे.
Published on: 13 April 2022, 04:44 IST