Agripedia

ब्राउन प्लांट हॉपर हा भातपिकाचा एक मोठा शत्रू आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हल्ले होतात, ते झाडांच्या देठापासून आणि पानांमधून रस चोखतात. जाणुन घ्या शेतकरी मित्रांनो याचा नायनाट कसा करायचा ते. भातशेती (Paddy Cultivation) करणाऱ्या शेतकऱ्यांनी सावध होण्याची वेळ आली आहे. या हंगामात भात पिकाचा नाश करणाऱ्या ब्राऊन प्लांट हॉपरचा हल्ला सुरू होऊ शकतो.

Updated on 31 August, 2021 6:49 PM IST

ब्राउन प्लांट हॉपर हा भातपिकाचा एक मोठा शत्रू आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हल्ले होतात, ते झाडांच्या देठापासून आणि पानांमधून रस चोखतात. जाणुन घ्या शेतकरी मित्रांनो याचा नायनाट कसा करायचा ते.

 

 

 

 

भातशेती (Paddy Cultivation) करणाऱ्या शेतकऱ्यांनी सावध होण्याची वेळ आली आहे.  या हंगामात भात पिकाचा नाश करणाऱ्या ब्राऊन प्लांट हॉपरचा हल्ला सुरू होऊ शकतो. 

ही कीड भाताच्या पानांचा रस शोषून पिकाचे मोठे नुकसान करते. त्यामुळे शेतकऱ्याने शेताच्या आत जाऊन रोपाच्या खालच्या भागाच्या ठिकाणी डास सदृश किडीची तपासणी करावी. कीड आढळल्यास त्याचे निराकरण करा नाहीतर सर्व मेहनत जलमय होईल.

कृषी शास्त्रज्ञांच्या मते सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात किडीचा जास्त प्रभाव असतो. या किडीचे जीवनचक्र 20 ते 25 दिवस असते. या किडीमुळे भाताच्या पानांच्या वरच्या पृष्ठभागावर काळी बुरशी तयार होते.

 ज्यामुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया थांबते. यामुळे झाडे कमी अन्न बनवतात आणि त्यांची वाढ थांबते.हे किडे हलके तपकिरी रंगाचे असतात.

 

 

 

 

 

 

ब्राउन प्लांट हॉपरने प्रभावित पिकाला हॉपर बर्न म्हणतात.

 कृषी शास्त्रज्ञ सांगतात की ब्राउन प्लांट हॉपर कीटक झाडांच्या देठापासून आणि पानांमधून रस चोखतात. जास्त रस चोखल्यामुळे, पानांच्या वरच्या पृष्ठभागावर काळा साचा वाढतो. प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया थांबते आणि यामुळे झाडांना कमी अन्न मिळते. या किडीमुळे प्रभावित झालेल्या पिकाला हॉपर बर्न म्हणतात.

 

या वर्षी महाराष्ट्र आणि पूर्वांचलच्या काही जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस झाला आहे. अशा परिस्थितीत भातपीकांची शेती पाण्याने भरलेले असते, यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला तर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतील. भारतात सुमारे 43 दशलक्ष हेक्टरमध्ये भात लागवड केली जाते.

 

 

 

 

 

नेमकं ह्या रोगावर निदान तरी काय?

कृषी शास्त्रज्ञ म्हणतात की डासांसारखे दिसणारे किड पिकावर आहे कि नाही हे पाहण्यासाठी पिकाच्या देठावर बारीक लक्ष ठेवा. दोन -चार असले तरी काही फरक पडत नाही, परंतु जर जास्त असतील तर प्रथम पाणी कोरडे करा आणि युरियाचा वापर कमी करा.  पाण्याच्या निचऱ्याचे योग्य व्यवस्थापन असेल तर ते चांगले होईल. जर यावर नियंत्रण नसेल तर पेनिसिलियम फिलिपेन्सिस किंवा मेटारिझियम फवारणी करा.

English Summary: brown plant hopper control technic in rice farming
Published on: 31 August 2021, 06:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)