Agripedia

वांगे हे भाजीपाला वर्गातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे. वांगे हे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या संपूर्ण करू शकते. परंतु वांगा या भाजीपाला पिकावर जास्त प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळेपर्यायाने शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान होते. वांग्यावर येणारे प्रमुख रोग म्हणजे मर आणि करपा हे होय. या लेखात आपण वांग्यावरील मर आणि करपा रोगांबद्दल माहिती घेणार आहोतव त्यावरील उपाय याबद्दल जाणून घेणार आहोत. मर रोग बऱ्याचदा वांगे लागवड केल्यानंतर वांग्याची झाडे मरू लागतात. त्यामुळे बऱ्याचदा काय करावे हे समजत नाही बरेचसे पीक वाया जाते. ह्या रोगा मागील प्रमुख कारणे म्हणजे हा रोग फुज्यारियेम सोलणी, रायझोक्टोनिया व व्हर्टिसिलियम या बुरशी मुळे होतो. या बुरशीमुळे पिकातील पाणी पिवळी पडतात पानांवरिल शिरां वर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापले असता आतील पेशी काळपट दिसतात. झाडाची वाढ खुंटते आणि शेवटी झाड मरते.

Updated on 13 June, 2021 12:32 PM IST

  वांगे हे भाजीपाला वर्गातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे. वांगे हे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या संपूर्ण करू शकते. परंतु वांगा या भाजीपाला पिकावर जास्त प्रमाणात  रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळेपर्यायाने शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान होते. वांग्यावर येणारे प्रमुख रोग म्हणजे मर आणि करपा हे होय. या लेखात आपण वांग्यावरील मर आणि  करपा रोगांबद्दल माहिती घेणार आहोतव त्यावरील उपाय याबद्दल जाणून घेणार आहोत.

            मर रोग

 बऱ्याचदा वांगे लागवड केल्यानंतर वांग्याची झाडे मरू लागतात. त्यामुळे बऱ्याचदा काय करावे हे समजत नाही  बरेचसे पीक वाया जाते. ह्या  रोगा  मागील प्रमुख कारणे म्हणजे हा रोग फुज्यारियेम सोलणी, रायझोक्टोनिया व व्हर्टिसिलियम या बुरशी मुळे होतो. या बुरशीमुळे पिकातील पाणी पिवळी पडतात पानांवरिल शिरां वर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापले असता आतील पेशी काळपट दिसतात. झाडाची वाढ खुंटते आणि शेवटी झाड मरते.

    उपाय

 सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वांग्या वरील मर रोगाच्या नियंत्रणासाठी पिकांची फेरपालट करावी. जसे की टोमॅटो, मिरची, वांगी या पिकानंतर परत वांगी न घेता  ज्वारी, बाजरी, मका इत्यादी पिके घ्यावीत. उन्हाळ्यामध्ये नांगरट करत असताना ति खोल करावी.

  • वांगी पिकावर जर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला तर या रोगाच्या रासायनिक नियंत्रणासाठी दहा लिटर पाण्यात 30 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड तसेच 20 मिली क्लोरोपायरीफॉस मिसळून प्रत्येक झाडाच्या बुंध्याजवळ पंपाचे नोझल काढून एक ते दोन कप याप्रमाणे हे द्रावण सोडावे व नंतर पिकाला हलके पाणी द्यावे.
  • तसेच वांगी लागवडीपूर्वी थायरम किंवा कॅप्टन तीन ग्रॅम किंवा एक ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा याची बीजप्रक्रिया करावी.
  • लागवडीपूर्वी जमिनीत प्रति हेक्‍टरी पाच किलो ट्रायकोडर्मा शेणखतावर भर सरीतून जमिनीत मिसळावे.

 

पर्णगुच्छ ( बोकड्या )

 पर्णगुच्छ म्हणजे ज्याला आपण बोकड्या किंवा झाडे बोकडली असे म्हणतात. हा रोग प्रामुख्याने मायको प्लाजमा या अतीसूक्ष्म विषाणूमुळे होतो. या रोगामुळे झाडाची आणि पानांची वाढ खुंटते. झाडाची पाने लहान बोकडल्यासारखी किंवा पर्णगुच्छ यासारखे दिसतात. या विषाणूचा प्रसार हा फुलकिडे व तुडतुडे या द्वारे होतो.

 उपाय

  • या रोगाची प्रथम अवस्थेतच रोगट झाडेउपटून ती नष्ट करावीत. रोपांच्या पुनर्लागवडीनंतर नऊ ते दहा दिवसांनी दाणेदार फोरेट हेक्‍टरी दहा किलो प्रमाणे प्रत्येक झाडास खताबरोबर बांगडी पद्धतीने द्यावे.
  • लागवडीपूर्वी गादीवाफ्यावर कार्बोफ्युरॉन 35 ते 40 ग्रॅम किंवा फोरेट 10 ते 20 ग्रॅम प्रति दहा चौरस मीटर या प्रमाणात मिसळावे.
  • रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींपासून संरक्षणासाठी पिवळ्या आणि निळ्या चिकट ट्रॅप चा  वापर करावा.
  • इमिडाक्लोप्रिड 10 मिली किंवा कार्बोसल्फान 20 मिली तसेच ट्रायकोडर्मा पावडर 50 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात रोपांची मुळे पाच ते दहा मिनिटे बुडवून लावावीत.
  • लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांनी डायमिथोएट किंवा कुठलाही साधारण कीटकनाशकाची फुलकिडे व तुडतुडे यांसाठी  फवारणी घ्यावी.

 

 

भुरी रोग

 भुरी रोग हा इरिसीपी पॉलीगोणी आणि लेव्हलूला टावरी का या बुरशीमुळे होतो पानाच्या दोन्ही बाजूस पांढऱ्या रंगाच्या पीठा सारख्या दिसणाऱ्या बुरशीची वाढ होते.

 

   उपाय

 या रोगाची लक्षणे दिसताच पाण्यात विरघळणारे गंधक 25 ग्रॅम किंवा दिनोकॅप किंवा कार्बेन्डाझिम 10 मिली अथवा ट्राय डीमेंफॉन प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

 

English Summary: brinjal management
Published on: 13 June 2021, 12:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)