Agripedia

बोर्डो मिश्रणाची तीव्रता व आम्ल-विम्लांक किंवा सामू(पीएच) या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत.

Updated on 24 July, 2022 4:54 PM IST

बोर्डो मिश्रणाची तीव्रता व आम्ल-विम्लांक किंवा सामू(पीएच) या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. यावर यामिश्रणाची शक्ती अवलंबून असते. तयार झालेले बोर्डोमिश्रण फवारणीसाठी योग्य झाले किंवा नाही याची खात्रीकरून घ्यावी. तयार झालेले बोर्डो मिश्रण शक्‍य तितक्‍यालवकर फवारावे, ते जास्त वेळ ठेवू नये.मिश्रण तयारझाल्यानंतर १२ तासांच्या आतच वापरावी. (वरिल सर्वमाहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषिविद्यापीठा नी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविधभागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी याची खबरदारी घ्यावी)

१) आंब्यावरील करपा रोग नियंत्रण साठी ०.८%बोर्डो मिश्रण पावसाळा सुरू होण्यापूर्वी दोनफवारे आणि जून ते ऑगस्टपर्यंत ४ फवारण्याकराव्यात.२) केळीच्या पानांवरील ठिपके नियंत्रणासाठी०.८% बोर्डो मिश्रण जून ते ऑगस्टपर्यंत २-३वेळा फवारणी करावी.३) डाळिंबाच्या पानांवरील रोग नियंत्रणासाठी०.८% बोर्डो मिश्रण बहार धरल्यानंतर नवीनफुटीवर १-२ फवारण्या आणि फळांचा काढणीकरेपर्यंत ३-४ फवारण्या करावेत.४) पेरूच्या पानांवरील रोग नियंत्रणासाठी ०.८%बोर्डो मिश्रण बहार धरल्यानंतर नवीन फुटीवर१-२ फवारे तर देवी रोग नियंत्रणासाठी ०.८ ते१% बोर्डो मिश्रण फळे लिंबाच्या आकाराचीझाल्यानंतर पुढे २-३ फवारे करावे.

५) लिंबूवर्गीय संत्रा, मोसंबी व लिंबू यांच्यापानांवरील बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी १% बोर्डो मिश्रण बहरानंतर २-३ फवारे तरजिवाणूंमुळे होणारा देवी रोग नियंत्रणासाठी १% बोर्डो मिश्रण वापरावे .1% bordeaux mixture should be used to control goddess disease. शेंडामर नियंत्रणासाठी१% बोर्डो मिश्रण वर्षातून २-३ वेळा वापरावे.६) रंगपूर लिंबाच्या गादी वाफ्यावरील रोपासाठीअत्यंत कमी तीव्रतेचे (म्हणजे ०.४ ते ०.६ टक्का)तीव्रतेचे बोर्डो मिश्रण बुरशी रोगाच्यानियंत्रणासाठी चांगले परिणामकारक ठरलेलेआहे. गादीवाफ्यावरील रोपांचे वय चार ते पाचमहिने झाल्यावर ०.४ टक्का तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारावे. साधारणपणे दोन महिन्यांच्या अंतराने०.६ टक्का तीव्रतेचे व त्यानंतर परत दोनमहिन्यांनी ०.८ तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारावे.

७) रंगपूर व कागदी लिंबाच्या दुय्यम रोपवाटिकेतीलबदललेल्या रोपावर सप्टेंबर - ऑ क्‍टोबरमध्ये ०.४टक्का जानेवारी – फेब्रुवारी मध्ये ०.६ टक्का,मार्च - एप्रिलमध्ये ०.८ टक्का व जूनच्या दुसऱ्या आठवड्यात १ टक्का तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारावे. त्यामुळे जवळपास सर्व प्रकारचे बुरशीजन्य रोग आटोक्‍यात राहतात. त्याचप्रमाणेमातृवृक्षावर दर तीन महिन्यांच्या अंतराने ०.८टक्का तीव्रतेचे बोर्डो मिश्रण पावसाळा संपल्यावरसप्टेंबर - ऑक्‍टोबरमध्ये फवारावे. त्यानंतरफेब्रुवारीमध्ये ०.८ टक्का तीव्रतेचे बोर्डो मिश्रणफवारावे. या वेळी झाडावर नवीन पालवीआलेली असेल. एप्रिलमध्ये एक टक्का तीव्रतेचेबोर्डो मिश्रण फवारावे.

 

लेखक : - डॉ. अमोल विजय शितोळे (पी. एच. डी. कृषि) डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला.

माहिती संकलन - Mr.SATISH BHOSALE

Mob No:09762064141

Email: satish2157.bhosale@gmail.com

English Summary: Bordeaux mixture for fruit disease control usage
Published on: 24 July 2022, 04:54 IST