Agripedia

गहू पीक हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. गव्हाच्या अनेक जाती आहेत. यामध्ये विशेष म्हणजे काळा गहू. सामान्य गव्हाच्या तुलनेत काळ्या गव्हाचे उत्पन्न भरपूर मिळते. एवढेच नाही तर बाजारात काळ्या गव्हाला मागणी देखील खूप जास्त आहे.

Updated on 22 November, 2022 3:13 PM IST

गहू पीक हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. गव्हाच्या अनेक जाती आहेत. यामध्ये विशेष म्हणजे काळा गहू. सामान्य गव्हाच्या तुलनेत काळ्या गव्हाचे उत्पन्न भरपूर मिळते. एवढेच नाही तर बाजारात काळ्या गव्हाला मागणी देखील खूप जास्त आहे.

काळ्या गव्हाच्या (Black wheat) किमती पाहिल्या तर सामान्य गव्हाच्या तुलनेत 4 पट जास्त भावाने विकला जात आहे. बाजारात १८ ते २० रुपये किलो दराने गहू, तर काळा गहू तब्बल ७० ते ८० रुपये किलो दराने विकला जातो.

यानुसार आपण पाहिले तर ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल (per quintal) दराने काळा गहू विकला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक औषधी गुणधर्म आहेत. कृषी शास्त्रज्ञांच्या मते, काळ्या गव्हात रंगद्रव्याचे प्रमाण १०० ते २०० पीपीएम असते, तर सामान्य गव्हात ते फक्त ५ ते १५ पीपीएम असते.

आहारात या 6 फळांचे सेवन करा; रक्ताच्या नसा साफ होतील, हार्ट अटॅकचा धोखाही टळेल

विशेष म्हणजे याशिवाय काळ्या गव्हात ६० टक्के लोहाचे प्रमाण जास्त असते. काळ्या गव्हाची लागवड देशाच्या काही भागातच केली जाते. त्यामुळे त्याची मागणी आणि किंमत खूप जास्त आहे. शेतकरी या रब्बी हंगामात काळ्या गव्हाची लागवड (cultivation) करून मोठी कमाई करू शकता.

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत FD पेक्षा जास्त परतावा; घ्या असा लाभ

या आजारांवर काळा गहू करतो मात

1) सामान्य गव्हाच्या तुलनेत काळा गहू पौष्टिक व औषधी (Nutritional and medicinal) गुणधर्मांनी समृद्ध असतो.
2) कर्करोग, हृदयविकार, लठ्ठपणा, साखर यासह इतर अनेक आजारांवर काळा गहू रामबाण उपाय आहे.
3) यासोबतच रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित होते.
4) यासह आतड्यांसंबंधी संक्रमण दूर करते.

महत्वाच्या बातम्या 
सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना फटका; गहू, पीठ, तांदूळ दरात मोठी वाढ
सर्वसामान्यांसाठी दिलासादायक! गॅस सिलिंडरची किंमत 'इतक्या' रुपयांनी स्वस्त
शेतकऱ्यांनो रद्दीच्या वापराने बियांची करा उगवण; जाणून घ्या 'या' नवीन तंत्रज्ञानाविषयी

English Summary: Black wheat costs 4 times more than common wheat
Published on: 03 October 2022, 02:55 IST