Agripedia

शेतकरी मित्रांनो कुठलाही पिकाच्या वाढीसाठी आणि त्या पिकातून दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका असते ती शेतजमिनीची. वेगवेगळ्या शेतजमिनीत वेगवेगळ्या पिकांची लागवड करावी लागते शेतजमिनीला अनुसरून पिकाची लागवड केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. शेत जमीनीचे एकूण पाच प्रकार पडतात.

Updated on 24 March, 2022 9:05 PM IST

शेतकरी मित्रांनो कुठलाही पिकाच्या वाढीसाठी आणि त्या पिकातून दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका असते ती शेतजमिनीची. वेगवेगळ्या शेतजमिनीत वेगवेगळ्या पिकांची लागवड करावी लागते शेतजमिनीला अनुसरून पिकाची लागवड केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. शेत जमीनीचे एकूण पाच प्रकार पडतात.

भारतात काळी माती, वालुकामय माती, गाळाची माती म्हणजे चिकणमाती, लाल माती इ. प्रकारच्या शेत जमिनी आढळतात. खरं पाहता सर्व प्रकारच्या मातीचे आपापले वैशिष्ट्य असते. परंतु आज आपण काळी माती असलेली शेतजमीन तिची वैशिष्ट्ये आणि अशा शेतजमिनीत कोणत्या पिकांची लागवड शेतकरी बांधवांना फायदेशीर ठरू शकते याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या महत्त्वपूर्ण माहिती विषयी.

सर्वप्रथम काळ्या जमिनीचे वैशिष्ट्य जाणून घेऊया- काळीमाती असलेल्या शेतजमिनीत सर्वात जास्त पिकांची लागवड केली जाते. शेतकरी मित्रांनो काळ्या मातीत लोह, चुना, मॅग्नेशियम आणि अॅल्युमिनियम ही पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यामुळे काळी माती असलेली शेतजमीन पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. काळ्या जमिनीत लागवड केलेल्या पिकांपासून दर्जेदार उत्पादन मिळत असते. काळी माती असलेल्या जमिनीत नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशचे प्रमाण हे इतर प्रकारच्या मातीच्या तुलनेत जास्त नसते.

काळ्या जमिनीत या पिकांची लागवड करा - 

  1. शेतकरी मित्रांनो, काळी माती असलेल्या शेतजमिनीला दंगट जमीन म्हणुन ओळखतात. काळ्या जमिनीला कापसाची जमीन म्हणून देखील संबोधले जाते. कारण की, कापसाचे पीक काळ्या जमिनीत मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापसाच्या शेतीव्यतिरिक्त काळ्या मातीत भात पिकाची देखील मोठ्या प्रमाणात लागवड बघायला मिळते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे काळी माती पाणी धरून ठेवण्यास सक्षम असते. आणि भात पिकाला इतर पिकांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते.
  2. मसूर, हरभरा इत्यादी पिकांची लागवड देखील काळी माती असलेल्या शेतजमिनीत करण्याचा सल्ला दिला जातो.
  • 3. काळी माती असलेल्या शेतजमिनीत इतर अनेक पिकांची लागवड केली जाते. या पिकांमध्ये गहू, तृणधान्ये, तांदूळ, ज्वारी, ऊस, जवस, सूर्यफूल, भुईमूग, तंबाखू, बाजरी, लिंबूवर्गीय फळे, सर्व प्रकारची तेलबिया पिके आणि भाजीपाला पिके यांचा समावेश असतो.
  • 4. काळी माती असलेल्या शेतजमिनीत अनेक बागायती पिकांची लागवड केली जाते. बागायती पिकांमध्ये आंबा, सपोटा, पेरू आणि केळी इत्यादी पिकांची लागवड काळ्या जमिनीत केली जाते. डाळिंबाची लागवड मात्र काळ्या जमिनीत करू नये असा सल्ला दिला जातो. कारण की, काळी जमीन पाणी अधिक वेळ धरून ठेवते त्यामुळे डाळिंबाच्या पिकांवर रोगराई वाढण्याचा धोका निर्माण होतो.

संबंधित बातम्या:-

कृषी विभागाचा शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सल्ला! खरीप हंगामापूर्वी 'हे' काम करा; नाहीतर होणार नुकसान

'या' पद्धतीने झेंडु लागवड आपणांस बनवु शकते लखपती! वाचा याविषयी

English Summary: black soil is very good for these crops learn more about it
Published on: 24 March 2022, 09:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)