Agripedia

सध्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिकांची लागवड शेतकरी करतात. परंपरागत पिकांना तिलांजली देऊन वेगवेगळी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा सध्या कल दिसून येतो.

Updated on 16 March, 2022 7:18 AM IST

सध्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिकांची लागवड शेतकरी करतात. परंपरागत पिकांना तिलांजली देऊन वेगवेगळी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा सध्या कल दिसून येतो.

आता मिरची म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर हिरवी आणि लाल या दोन प्रकारचे मिरची पटकन येतात. परंतु या मिरचीच्या प्रकारांमध्ये काळी मिरची हा देखील तेवढाच उपयुक्त आणि फायदेशीर असलेला मिरचीचा प्रकार आहे.जर आपण काळ्या मिरचीच्या मागणीचा विचार केला तर या मिरचीला देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील खूप मागणी आहे. त्यामुळे काळ्यामिरचीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला फायदा तर मिळतच परंतु या मिरची लागवडीसाठी व एकंदरीत नियोजनासाठी येणारा खर्च देखील आटोक्यात असल्यामुळे अगदी कमी वेळात ही चांगला नफा देऊ शकते. काळा मिरची चा उपयोग हा गरम मसाले तयार करण्यासाठी होतो. या मिरचीचे बाजारातील भाव हे कायम वाढीव असतात. जर भारतातील काळ मिरचीचा उत्पादनाचा विचार केला तर केरळ राज्यामध्ये या मिरचीचे उत्पादन जास्त घेतले जाते. म्हणजे देशातील एकूण उत्पादनाच्या 98 टक्के उत्पादन हे केरळ राज्यात घेतली जाते.

फळबागांमध्ये लागवड केली तर फायद्याची ठरेल

 या मिरचीच्या चांगल्या उत्पादनासाठी तीव्र सूर्यप्रकाश आणि आर्द्रता योग्य असेल असे वातावरण पोषक ठरते.फळबागांमध्ये फळांची झाडे मोठी असतील अशा ठिकाणी काळ्यामिरचीची लागवड करता येते. एकंदरीत लागणाऱ्या हवामानाचा विचार केला तर 10 ते 40 अंश तापमान आणि 60 ते 70 टक्के आर्द्रता आवश्‍यक असते. परंतु अशा वातावरणाचा विचार केला तर असे वातावरण किनारपट्टीलगतच्या भागात असते. म्हणून नेमक्या याच कारणामुळे केरळ राज्यात हे मिरचीचे उत्पादन आणि लागवड क्षेत्र जास्त आहे. ज्या जमिनी त्या मिरची लागवड करायचे असेल त्या जमिनीचा सामू हा साडे चार ते सहाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे जेणे करून चांगले उत्पादन येते.

या मिरचीची  वैशिष्ट्य म्हणजे मिरपूड ची झाडे वेली सारखे वाढत असल्याने आधारासाठी व चांगली वाढ होण्यासाठी उंच झाडांची गरज असते म्हणून फळबागांमध्ये या मिरचीची लागवड केली जाते. ही मिरची लागवड करताना अगोदर रोपे तयार केली जातात व नंतर त्या रोपांची पुनर्लागवड केली जाते. लागवड करताना ती फळझाडांच्या मुळाजवळ लावली जाते. जेणेकरून ती वाढतांना त्या झाडाच्या आधाराने वाढते त्यामुळे उत्पादन जास्त होते.

 लागवड करताना अशी घ्या काळजी

 या मिरचीचे रोपे तयार करण्यासाठी जुन्या वेलीवरून मिरचीची छाटणी करून छाटणी केलेल्या मिरचीला माती आणि खत आणि भरलेल्या पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये ठेवावी लागते. ही सगळी प्रक्रिया केल्यानंतर 50 ते 60 दिवसांत रोपे लागवडीस योग्य होतात. लागवड केल्यानंतर सुरुवातीला दोन वेळा सिंचनाची गरज भासते. त्यानंतर आठवड्यातून एकदा जरी पाणी दिले तरी चालते. 

तसेच दर पंधरा ते वीस दिवसांनी निंदणी करून मिरची तणमुक्त ठेवणे गरजेचे आहे. तसेच या मिरचीची रोपे झाडावर चढू लागली की छाटणीच्या काम करावे लागते. या मिरचीच्या वेलांची वाढ झाल्यानंतर हिरवे गुच्छ दिसायला लागतात व या गुच्छामध्ये जास्त फळ दिसले की नोव्हेंबरमध्ये तोडणी करता येते. जर या मिरचीचे नियोजन व्यवस्थित केले तर एका रोपाला दीड किलो  काळी मिरची मिळते.

English Summary: black chilli cultivatin can give turning point to farmer life that give only more production in 3 month
Published on: 16 March 2022, 07:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)