भारत एक कृषीप्रधान देश आहे, देशाची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासन नेहमीच कार्यरत असते. देशातील वेगवेगळ्या कृषी क्षेत्रातील संस्था यासाठी नेहमीच प्रयत्नरत असतात. देशातील अग्रगण्य कृषी विद्यापीठांत पैकी एक पंजाब कृषी विद्यापीठाने देखील एक नाविन्यपूर्ण शोध शेतकऱ्यांसाठी लावला आहे.
पंजाब कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या अनुषंगाने गाजराच्या एका नवीन जातीचा शोध लावला आहे. विद्यापीठाने काळ्या गाजराच्या जातीचा शोध लावला आहे, विद्यापीठाने पीसीबी 5 ही काळ्या गाजराची जात विकसित केली आहे. विद्यापीठाने या गाजराच्या जातीला पंजाब ब्लॅक ब्युटी असे नामकरण केले आहे. या जातीची लागवड देशातील अनेक भागात केली जात असल्याचे सांगितले जात आहे.
पंजाब विद्यापीठाने विकसित केलेले हे गाजर औषधी गुणधर्मांनी युक्त असल्याचा दावा केला गेला आहे. या गाजरात असलेले औषधी गुणधर्म मानवी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याचे सांगितले जातं आहे. या काळ्या गाजरात अनेक एंटीऑक्सीडेंट उपलब्ध आहेत. यामध्ये उपलब्ध असलेले अँटिऑक्सिडंट रक्त शुद्ध करण्यासाठी कारगर असल्याचे सांगितले जाते. एवढेच नाही तर हे काळे गाजर मानवी शरीरात आढळणारे ॲनिमिया, बद्धकोष्ठता इत्यादी गंभीर आजार दूर करण्यास मदत करते. या काळ्या गाजराच्या सेवनाने पोटासंबंधी विकार दूर होतात, असा दावा वनस्पती विभागाने केला आहे.
काळ्या गाजरात असणारे पौष्टिक गुणधर्म मानवी आरोग्यास फायदेशीर आहेत. या गाजराची लागवड शेतकऱ्यांसाठी देखील एक वरदान सिद्ध होऊ शकते. या पंजाब ब्लॅक ब्यूटी जातीच्या गाजराची लागवड केल्यावर अवघ्या 90 दिवसात ही गाजराची जात काढणीसाठी तयार होते. अल्प कालावधीत काढणीसाठी येत असल्याने, या गाजराची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले जात आहे.
शेतकरी मित्रांनो जर आपण या जातीच्या गाजराची एक एकर क्षेत्रात लागवड केली तर आपणास या पासून सुमारे दोनशे क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते. या जातीच्या गाजरापासून दर्जेदार उत्पादन मिळते तसेच या जातीच्या गाजरांना बाजारपेठेत चांगला दरही मिळतो त्यामुळे या जातीच्या गाजराची लागवड शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर ठरू शकते.
Published on: 14 February 2022, 12:28 IST