Agripedia

भाजीपाला पिकांमध्ये त्यातल्या त्यात वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये कारले या पिकाला बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर खूप मागणी आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कारल्याला अनेक जणांची पसंती असते.

Updated on 10 July, 2022 10:29 AM IST

 भाजीपाला पिकांमध्ये त्यातल्या त्यात वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये कारले या पिकाला बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर खूप मागणी आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कारल्याला अनेक जणांची पसंती असते.

खायला जरी कडू असले तरी त्यातील पोषक घटक जसं की कर्बोदके, प्रथिने, खनिजे, अ आणि क जीवनसत्व यामुळे आवर्जून आहारामध्ये कारल्याची भाजी खाल्ली जाते.

आपल्या भारतातच नाही तर अमेरिका सारख्या तसेच चीन आणि दक्षिण आशिया खंडातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कारल्याची लागवड केली जाते. या लेखात आपण चांगले आर्थिक उत्पन्न देण्याची ताकद असलेल्या  कारले पिकाची लागवड पद्धत पाहू.

 कारले लागवड

1- जमीन- कारले लागवड करण्यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भुसभुशीत, मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी व या जमिनीचा सामू साडेपाच ते साडेसहा पर्यंत असावा. खारवट जमिनीमध्ये लागवड करू नये.

नक्की वाचा:जुलै महिन्यात पैसे देणारी पीके आणि त्यांचे व्यवस्थापन

2- हवामान- उष्ण व दमट हवामानातील पीक असून जास्त थंडी मानवत नाही. चांगली उगवन होण्यासाठी दहा अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते.

फुलधारणा आणि वाढीच्या कालावधीत 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असेल तर फुले आणि फळधारणायावर विपरीत परिणाम होतो.

3- लागवडीचा हंगाम - उन्हाळी हंगामासाठी जानेवारी ते मार्च, जास्त थंडी असेल तर फेब्रुवारी महिन्यात आणि खरीप हंगामामध्ये लागवड करायची तर जून ते जुलै

4- लागवड पद्धत- साधारणपणे टोकण पद्धतीने बियाणे लावले जाते. उबदार जमिनीमध्ये टोकण पद्धतीने लागवड केल्यास सहा ते सात दिवसात उगवण होते.

5- काही सुधारित जाती- डॉ.  बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कोकण तारा, केरळ कृषी विद्यापीठाच्या प्रीती आणि प्रिया, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी च्या फुले प्रियंका, फुले ग्रीन गोल्ड, फुले उज्वला व हिरकणी. हेक्‍टरी दीड ते दोन किलो बियाण्याची गरज असते.

6- व्यवस्थापन- या पिकाला कमी किंवा जास्त पाणी चालत नाही. जवाब पडदा कालावधी असतो तेव्हा दोन ते पाच दिवसात गरजेनुसार पाणी द्यावे.

नक्की वाचा:समृद्ध पिक: 'चवीला सुपर' आणि 'कमाईला डुपर' आहेत 'या' मक्याच्या तीन नवीन विकसित जाती, वाचा सविस्तर

7- खत व्यवस्थापन- चांगले कुजलेले शेणखत 20 टन प्रति हेक्टर व लागवड करताना 100 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रति हेक्‍टरी तसेच नत्राचा डोस दोन ते तीन वेळेस विभागून द्यावा. विद्राव्य खतांचा देखील वापर करावा.

8- वेलींना आधार- हे वेलवर्गीय पीक असल्याने आधार दिल्यास मुलींचे वाढ उत्तम होते व नवीन फुटींच्या वाढीला चालना मिळते व फळधारणा चांगली होते. तसेच मिळणारे उत्पादन हे दर्जेदार मिळते.

9- कारल्याचे काढणी- साधारणपणे 15 ते 20 दिवसांमध्ये फुल लागते व फळ काढण्यासाठी येतात.

लागवडीपासून 60 ते 75 दिवसांत किंवा फुले लागल्यानंतर फळे वेगाने विकसित होतात. बाजारपेठेत ज्या दर्जाच्या कारल्याला मागणी असते त्या निकषाप्रमाणे बारकाईने लक्ष ठेवून काढणी वेळेत करणे गरजेचे आहे. फळे चांगले चमकदार, हिरवे, झाड आणि लज्जतदार असावे.

दोन ते तीन दिवसांच्या अंतराने कात्री किंवा एखादा धारदार चाकू च्या साह्याने कापणी करावी. एकरी 15 ते 25 टनांपर्यंत उत्पादन मिळते.

नक्की वाचा:पिक लागवड:अवघ्या 4 महिन्यात कमवू शकता 2 लाख रुपये, 'या' पिकाची लागवड ठरेल टर्निंग पॉइंट

English Summary: bitter gourd cultivation is so profitable and give more income to farmer
Published on: 10 July 2022, 10:29 IST