Agripedia

कारले वेलवर्गीय पिकातील कमी कालावधीत अधिक उत्पन्न व नफा देणारे पीक आहे. कारल्याच्या औषधी गुणधर्मामुळे यास भारतीय तसेच परेदशी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. कारल्याच्या नियमित सेवनाने मधुमेह व हृदयविकारासारखे आजार आटोक्यात येतात.

Updated on 07 May, 2021 11:33 AM IST

कारले वेलवर्गीय पिकातील कमी कालावधीत अधिक उत्पन्न व नफा देणारे पीक आहे. कारल्याच्या औषधी गुणधर्मामुळे यास भारतीय तसेच परेदशी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. कारल्याच्या नियमित सेवनाने मधुमेह व हृदयविकारासारखे आजार आटोक्यात येतात. कारल्यात अनेक जीवनसत्व अ, आणि क प्रोटीन कार्बोहाड्रेट पोट्रशिअम, कॅल्शिअम, लोह, असते. इतके जीवनसत्त्व असणारे कारले हे पीक १०० ते १२० दिवसात पीक निघत असते. अशा या वेलवर्गीय पिकाची आपण माहिती घेणार आहोत, याची लागवड कशी करावी आणि व्यवस्थापन कसे करावे याची माहिती यात घेणार आहोत...

जमिनीची मशागत व नियोजन:_

चांगल्या वाढीसाठी १५ टन शेणखत किंवा एरंड पेंड ५०० किलो प्रती एकर जमीन तयार करताना द्या.खोल नांगरट व सपाट करा. १.५ ते २ मी. अंतराच्या ओळी तयार करा.

ट्राइकोडर्मा विरडी २५० ग्रॅम १० शेणखतासोबत

पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणा-या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणा-या मर रोगापासून पिकाचे रक्षण होऊ शकते

कारल्याच्या  जाती

▪️चांगल्या

उत्पादनासाठी निर्मल सीड्स, ६२१४,वेटुरेआ (महिको), झालर (डॉक्टर), एनएस ४५२ (नाम धारी), विवेक (सनग्रो), करण (पहुजा), बीही-१ (व्हीएनआर) ) या जातींची निवड करा..

पेरणी आणि लागवड पद्धती

चांगल्या वाढीसाठी लागवड जुन-जुलै मध्ये करावी. लागवडीचे अंतर १.५ X मी. किंवा २.० X ०.५ मी. ठेवावे. लागवडीसाठी ८०० ग्रॅम ते १ किलो बियाणे प्रती एकर लागते. उन्हाळी पिकाची लागवड जानेवारी-फेब्रुवारी मध्ये करावी. पीकवाढीच्या अवस्थेत सुरुवातीचे जास्त असलेले नको असलेले फुटवे काढत वेलास बांधणी करून आधार द्यावा. बाजारात उपलब्ध असलेले नायलॉन मंडपसाठी वापरावे.

जैविक खते

लागवडीपूर्वी १५ टन शेणखत किंवा ५०० किलो एरंड पेंड प्रती एकर द्या.

रासायनिक खते

चांगल्या उत्पादनासाठी व वाढीसाठी २० किलो नत्र (४३किलो युरिया)+२०  किलो फॉस्फरस (१२५ किलो एसएसपी) + २० किलो पोटॅशियम (३३ किलो एमओपी) प्रती एकर लागवडीच्यावेळी द्या.

चांगल्या उत्पादनासाठी व वाढीसाठी २० किलो नत्र (४३ किलो युरिया किंवा ९७ किलो अमोनियम सल्फेट) प्रती एकर लागवडीनंतर ३०-३५ दिवसांनी द्या.

 

पाण्यात विरघळणारी खते

फुलगळ रोखण्यासाठी, उत्पादनात १०% वाढ होण्यासाठी व चांगला आर्थिक परतावा मिळण्यासाठी पिक फुलोरा अवस्थेत असताना हुमिक एसिड ३मिली+ एएमपी (१२: ६१:००) ५ ग्रॅम/Ltr पाण्यातून फवारा. फुले, फळे येण्याच्या व पक्व होण्याच्या काळात, सॅलिसीलिक ऍसिड (ऍस्पिरिन टॅबलेट ३५०mg, ४-५ गोळ्या)/१५ Ltr पाण्यातून ३० दिवसाने १/२वेळा फवारा. चांगली फुलधारणा व उत्पादन मिळण्यासाठी ००: ५२: ३४ @१५०ग्रम/ १५ Ltr पाण्यातून फुलोरा अवस्थेत व फळे तयार होताना फवारा. चांगले उत्पादन व गुणवत्ता मिळण्यासाठी १३:०:४५ @ १००g/१० Ltr+हाइ बोरान (बायफॉलॉन) १ ml/Ltr पाण्यातून फळ धारणा अवस्थेत फवारा.

कीड नियंत्रण

फळमाशी

हे किटक फळातील गरामध्ये दिसून येतात व त्यामुळे फळगळ दिसून येते. वेळोवेळी बाधित फळे काढून नष्ट करा. पिकाच्या काढणीनंतर उन्हाळ्यात शेताची खोल नांगरट करा.

मुख्य पिकाबरोबर विलायती गवत,मुळा, कोथिंबीर या पिकांची लागवड एकाच शेतात करू नका. रासायनिक नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब १४.५ SC (सर्वदा/ अवांट) @ ml + स्प्रेडिंग एजेंट (सॅंडोविट/अप्सा80) @ ml १० Ltr पाण्यातून फवारा किंवा स्पिनोसॅड ४५SC (स्पिनटर, ट्रेसर) @ ७३५ml/१५Ltr किंवा फिप्रोनिल ५SC (रिजेन्ट,रॅबिड,फॅक्स) ३०ml /१५Ltr किंवा लॅंब्डा सायहॅलोथ्रिन (कराटे, सिल्वा प्लस, रीवा ५)७.५ ml/१५Ltr किंवा थियोडिकर्ब ७५ WP (लारविन, चेक)@ ४०gm/१५ Ltr ची फवारणी करा.

पांढरी माशी

पांढरी माशी पिकात मोझाईक व्हायरस पसरवते. प्रतिबंध करण्यासाठी २Ltr गोमुत्र+ २Ltr

 ताक/१५Ltr पाण्यात मिसळून ८-१० दिवसाच्या अंतराने दोनदा फवारा

पांढरी माशी दिसून येताच नियंत्रणासाठी डाइफेनथियौरॉन ५० WP (पेगासस,पजेरो) २० ग्रॅम किंवा स्पीरोमेसिफेन २४० एससी (ओबेरॉन) १८ मिली किंवा अॅफसिफेट

 ५०%+इमीडाक्लोप्रिड १.८ SC (लांसरगोल्ड) ५० gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) ६

 ml/१५ Ltr पाण्यातून फवारा.

अंकुर आणि मुळे खाणारी अळी

अळी पिकाचे मातीपासून मुळाचे व खोडाचे नुकसान करते प्रतिबंध करण्यासाठी कार्बोफ्युरान ३G (फुराडन/फुरान/कार्बोमाइन) १२ kg प्रती एकर सरीत टाका. उभ्या पिकातील नियंत्रणासाठी फिप्रॉनिल ५%SC (रेजेंट, सॅल्वो) ५००मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० EC (ट्रेकडेन, फोर्स, ताफबन) २ Ltr सिंचनाच्या पाण्यासोबत द्या किंवा फिप्रोनील + इमीडाक्लोप्रिड ८०WG (लेसेंटा) १५० ml  २५० Ltr पाण्यातून प्रती एकर भिजवणी करा.

पान पायांचा ढेकूण

▪️गर्द काळी जांभळी अळी अंकुर आणि फळातील रस सोशून घेते.अंकुर वळतात व फळांवर गर्द काळा वर्तुळाकार ठिपका दिसून फळे गळतात.तीव्रता कमी असल्यास केतकीचा अर्क ३५० ml/१५ Ltr पाण्यातून फवारा.तीव्रता जास्त असल्यास इमीडाक्लोप्रिड (कॉनफ़िडॉर, टाटामीडा) ३ml किंवा थायामेथोक्सॅम २५WG (अक्टारा, अनंत) ४gm १० Ltr पाण्यातून किंवा अॅासिफेट ५०%+इमीडाक्लोप्रिड १.८ SC (लांसरगोल्ड)  ५० gm किंवाफ्लोनीकॅमिड (उलाला) ६ ml/१५ Ltr पाण्यातून फवारा.

नाग अळी

नाग अळी पानांवर सफेद रंगाच्या रेषा ओढते.नियंत्रणासाठी

सूकेस्ट  २५ मिली /१५ Ltr पाण्यातून फवारा.

किंवा

 अबामेक्टिन १.९ EC(अॅ/ग्री-मेक,व्हर्टीमेक) ६ ml/१५ Ltr पाण्यातून किंवा डाइफेनथियौरॉन ५०WP (पेगासस,पजेरो) २० ग्रॅम किंवा स्पीरोमेसिफेन २४० SC (ओबेरॉन) १८मिली किंवा अॅनसिफेट ५० %+इमीडाक्लोप्रिड १.८ SC (लांसरगोल्ड) ५० gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) ६ ml/१५ Ltr पाण्यातून फवारा.

गाठी करणारे कीटक

हे किटक पिकातील मुळांवर गाठी तयार करतात. रासायनिक नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब १४.५ SC (सर्वदा/ अवांट) @ ml + स्प्रेडिंग एजेंट (सॅंडोविट/अप्सा80) @ ml १० Ltr पाण्यातून फवारा किंवा स्पिनोसॅड ४५ SC (स्पिनटर, ट्रेसर) @ ७३५ मिली/१५Ltr किंवा फिप्रोनिल ५SC (रिजेन्ट,रॅबिड,फॅक्स) ३०ml /१५Ltr किंवा लॅंब्डा सायहॅलोथ्रिन (कराटे, सिल्वा प्लस, रीवा 5) ७.५ मिली /१५ Ltr किंवा थियोडिकर्ब ७५WP (लारविन, चेक)@ ४०gm/१५Ltr ची फवारणी करा.

 

रोग नियंत्रण

डाऊनी

▪️डाऊनी (केवडा). पिवळसर, तांबूस होवून पाने सूकून जातात.

नियंत्रणासाठी  स्प्रे

स्पार्टन ३५ मिली+

प्लांट एनर्जी १०ml

लार्वाकिंग २५मिली/१५ Ltr पाण्यातून फवारा.

भूरी

या रोगामध्ये पानांवर पांढरी पावडर दिसून येते. प्रतिबंध करण्यासाठी *

पथोफाइटर २५ ग्रॅम +

सूकेस्ट २५ml+

साइट्रोमिन १०ml/१५ Ltr पाण्यातून फवारा.

आणि तीन दिवसानी गंधक पावडर १० किलो/एकर सकाळी पानांवर दव असताना द्या.

English Summary: bitter gourd cultivation and disease control
Published on: 16 April 2021, 01:54 IST