Agripedia

मिरची लागवड महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी केली जाते.मिरचीच्या विविध उत्पादनक्षम आणि चांगल्या जाती आहेत. त्यातीलच एक म्हणजे बर्ड्स आय चिली ही होय.या मिरचीला थाई मिरची देखील म्हणतात. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे या मिरचीची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता नसते.

Updated on 21 January, 2022 1:59 PM IST

मिरची लागवड महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी केली जाते.मिरचीच्या विविध उत्पादनक्षम आणि चांगल्या जाती आहेत. त्यातीलच एक म्हणजे बर्ड्स आय चिली ही होय.या मिरचीला थाईमिरची देखील म्हणतात. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे या मिरचीची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता नसते.

तसेच कोणत्याही प्रकारच्या शास्त्रोक्त खतांची किंवा देखभालीची सुद्धा पाहिजे तेवढे आवश्यकता नसते.या लेखात आपण या मिरचीच्या लागवड पद्धती विषयी माहितीघेऊ.

या मिरचीच्या लागवडीसाठी मातीची आवश्यकता….

  • या मिरचीला कडक माती लागत नाही ते वेग वेगळ्या मातीत चांगले वाढते.
  • बर्ड आय चिली एक वनस्पती आहे जी दुष्काळ आणि पाणी साचलेल्या दोन्ही परिस्थितीला संवेदनशील आहे
  • त्याकरिता पीएच पातळी सहा ते सात पर्यंत असावी लागते.
  • ही मिरची बाजारपेठेत विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
  • या जातीची मिरची कोणत्याही हवामानात पिकविता येते.यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने तिला खूप मागणी आहे.

बर्ड आय चिली कशी वाढवायची?

  • मिरचीच्या इतर जातींपेक्षा ही प्रतिकारशक्ती च्या बाबतीत चांगली आहे.
  • शेणखत किंवा कंपोस्ट खत म्हणून जमिनीत किंवा वाळलेल्या पिशवीत टाकून तिची लागवड सुरू करता येते.
  • उन्हाळ्यात पाण्याची आवश्यकता असते..
  • तुम्ही तुमच्या शेतात आंतरपीक शेती म्हणूनही हिची लागवड करू शकतात.
  • या जातीच्या मिरचीवर सहसाकीटकांचा प्रादुर्भाव होत नाही.
  • या मिरचीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही मिरची स्वतः एक उत्कृष्ट जैविक कीटकनाशक आहे.प्राचीन काळापासून शेतकरी कीटकांपासून बचाव करण्यासाठी मिरची असलेले द्रावण वापरत आहेत.

बियाण्यापासून मिरची लागवड

 मिरचीउबदारहंगामातील पीक असून मिरचीला लागवडीपासून ते काढणीपर्यंत दोन ते तीन महिने लागतात.  त्याचे उत्पादक सामान्यतः नियंत्रित परिस्थितीत 0.5-1 सेंटी मीटर खोल बियाणे पेरतात आणि नंतर ते शेतात त्यांच्या अंतिम ठिकाणी लावले जाऊ शकतात.जर तुम्हाला बियाण्यांपासून मिरची वाढविण्याची योजना असेल तर तुम्हाला काही तथ्य माहीत असणे आवश्यक आहे.

 बर्ड आय मिरचीच्या बियांना उगवण  होण्यासाठी किमान 18 अंश सेल्सिअस मातीचे तापमान आवश्यक आहे. यासोबतच बियाणे अंकुर होण्यासाठी इष्टतम पातळीवर ओलावा असणे आवश्यक आहे.

 रोपांपासून मिरची लागवड

 शेतकरी विक्रेत्यांकडून रोपे विकत घेऊ शकतात किंवा स्वतः बियाण्यापासून उगवलेली रोपांची लागवड करू  शकतात. पुनर लागवडीची योग्य वेळ म्हणजे जेव्हा त्यांना पाच ते सहा पाणेयेतात आणि ते पंधरा ते तीस सेंटिमीटर पर्यंत त्यांची उंची होते.तेव्हा त्यांची निश्चित स्थळी लागवड केली जाते.

बर्डसआय चिलीचे आरोग्यदायी फायदे

  • ही मिरची औषधी वनस्पतीपैकी एक आहे.या मिरचीतील कॅपसेसीन पचन प्रक्रिया सुलभ करते.ही मिरची उच्च कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करू शकते.
  • या मिरचीमध्ये अ,क आणि ई जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.त्यात कॅल्शियम,लोह,पोटेशियम आणि फॉस्फरस देखील भरपूर असते.
  • शरीरामधील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी या मिरचीचा वापर केला जाऊ शकतो.
  • बर्ड आई चिली चा वापर हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील चांगला आहे. यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • या मिरची मध्ये वेदनाशामक म्हणून काम करण्याची विशेष क्षमता देखील आहे.
  • सांधेदुखी सारखे आजारांवर तीचांगली आहे.(संदर्भःहॅलोकृषी)
English Summary: bird eye chilli is very benificial and profitable for farmer
Published on: 21 January 2022, 01:59 IST