सध्याच्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे की जगातील एक षष्ठांश लोक उपासमारीने त्रस्त आहेत. ही परिस्थिती पूर्णपणे अस्वीकार्य आहे. याव्यतिरिक्त FAQ 2004 द्वारे जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला विविध प्रकारच्या अन्नसुरक्षतेचा सामना करावा लागतो.
ही भूक उपलब्ध अन्नाच्या प्रमाणापेक्षा गुणवत्तेमुळे असते.शिवाय विकसनशील देशांची लोकसंख्या मुख्यतः हा त्यांच्या पोषणासाठी मुख्य पिकांवर अवलंबून असते.
आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कमकुवत स्त्रोत आहेत.Fe, Zn, Kआणि प्रथिने,जीवनसत्वे यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेचे थेट परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होतो.या कुपोषणामुळे मृत्यू दर आणि रोगग्रस्त वृत्ती वाढते. ज्याला बायफॉर्टीफिकेशन असे म्हणतात. बायो फोर्टिफाइड मुख्य पिके एक शाश्वत पर्याय आहे.
बायफोर्टीफिकेशन म्हणजे काय?
बायो फोर्टीफिकेशन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे कृषी प्रणाली, पारंपारिक वनस्पती प्रजनन किंवा आधुनिक जैवतंत्रज्ञानाचा द्वारे अन्न पिकांची पोषक गुणवत्ता सुधारली जाते.
त्याची आवश्यकता का आहे?
बायोफोर्टीफिकेशन हे सूक्ष्म पोषक कुपोषणाच्या जटील समस्येवर उपाय आहे.कुपोषणाची लढा देण्यासाठी आणि देशाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक सूक्ष्म अन्नद्रव्य सर्वात प्रभावी उपाय मानली जातात.
बायफोर्टीफिकेशन पीक वाढवण्याचे तंत्र
1- अग्रोनोमिक बायफोर्टीफिकेशन- पिकांच्या खाण्या योग्य भागांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी सूक्ष्म पोषक खतांची माती किंवा झाडावर फवारणी केली जाते.
2- पारंपारिक वनस्पती प्रजनन-यामध्ये पारंपारिक वनस्पती प्रजनन पद्धतीचा समावेश आहे.ज्यामुळे पिकाच्या इच्छित वैशिष्ट्यं साठी पुरेशी आनुवंशिक विविधता निर्माण केली आहे.जसे की कोणत्याही सूक्ष्म पोषक घटकांच्या उच्च जाती विकसित करणे.बायो फोर्टिफाइड पिकांच्या उत्पादनासाठी भारतातील एकमेव पद्धत वापरली जाते.
3- अनुवांशिक अभियांत्रिकी/ बदल(GMO)-वनस्पतीच्या जीनोम मध्ये इतर कोणत्याही जिवातील जनुके टाकून पोषक तत्वांचे प्रमाण वाढवणे.
बायोफोर्टीफिकेशन चे महत्व
1- बायो फोर्टिफाइड पिके लोहणे समृद्ध असतात आणि लोह स्थिती आणि आकलन शक्ती सुधारण्याची क्षमता असते.जे मानवाचे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करते.
2- दैनंदिन अन्न म्हणून वापरल्या जाणाऱ्या विविध पिकांमध्ये बायो फोर्टिफाइड वाण विकसित करण्यात आले आहेत. जेणेकरून पोषक तत्वांचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी इतरांना घेण्याची गरज भासणार नाही आणि समाजातील गरीब घटकापर्यंत पोहोचून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.
3- बायो फोर्टी फाईड पिके देखील कीड, रोग, उच्च तापमान आणि दुष्काळी परिस्थिती यांना अधिक लवचिक असतात आणि उच्च उत्पन्न देखील देतात.
4- बायो फोर्टिफाइड बियाणे विकसित करण्यासाठी सुरुवातीच्या गुंतवणुकी नंतर त्यांचे पुनरुत्पादन केले जाऊ शकते आणि त्याचे सूक्ष्म पोषक घटक कमी न करता वितरित केले जाऊ शकते यामुळे ते अतिशय किफायतशीर आणि टिकाऊ बनते.
5- जी एम ओ च्या तुलनेत पारंपारिक पद्धतीने विकसित केलेल्या बायो फोर्टिफाइड वाण हा चांगला पर्याय आहे. जे अंमलबजावणीतील अडथळे यांपासून मुक्त आहेत.
बायो फोर्टिफाइड वाण
मधुबन गाजर
1- जुनागड जिल्ह्यातील शेतकरी शास्त्रज्ञ श्रीवल्लभभाई वसारामभाई मारवानिया यांनी विकसित केलेली उच्च कॅरोटीन आणि लोह सामग्री असलेली बायोफोर्टिफाइड गाजर जात आहे.
2- या गाजर जातीची जुनागड मध्ये 200 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रात लागवड केली जाते आणि उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत बनवून परिसरातील 150 हून अधिक स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
3-गेल्या तीन वर्षात गुजरात,राजस्थान,महाराष्ट्र,पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये एक हजार एकर पेक्षा जास्त जमिनीवर विविध प्रकारे गाजराची लागवड केली जात आहे.
4- एक उच्च पौष्टिक गाजराची जात असून यामध्ये कॅरोटीन आणि लोह मोठ्या प्रमाणात असते जे सिलेक्शन मेथडने विकसित केले आहे.
5-गाजर चिप्स,ज्यूस आणि लोणचे यासारख्या विविध मूल्यवर्धित उत्पादनांसाठी ही जात वापरली जाते.
6- इतर गाजराच्या जातींच्या तुलनेत या जातीमध्ये मुळे(3.5 टन/ हेक्टर) आणि वनस्पती जैविक पदार्थ ( प्रति रोप पाच ग्रॅम)लक्षणीयरीत्या जास्त आहे.
7-2017 मध्ये नवी दिल्ली येथे फेस्टिवल ऑफ इनोव्हेशन दरम्यान भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.गाजर शेती मध्ये त्यांच्या आजीवन प्रयत्नांसाठीकेंद्र सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नक्की वाचा:Maize Variety: मक्याच्या सुधारित जाती आणि त्यांच्या विशेषता
Published on: 17 June 2022, 01:58 IST