जैवीक हा शब्द काही आपल्या साठी नवीन नाही
शेती मधुन निघणारं विषमुक्त उत्पादननाच जेवण सर्वांना चांगले वाटत पण जेव्हा जैविक शेती करतातनां नकारात्मक भूमिका असतात.मला हेच सांगायचे आहे की सेंद्रिय शेती असो कि जैविक शेती ही प्रामुख्याने 90%शेतकरी यांच मन या शेतीकडे वळत नसतं! शेतकर्यांना सेंद्रीय शेती करण्याची इच्छा असते, परंतु असे शेतकरी विविध पिकांवरील रोग आणि कीड याने त्रस्त असतात आणि त्यामुळेच ते रासायनिक शेती कडे वळतात. अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सेंद्रीय शेती मधील जैविक उपाय जाणून घेणे गरजेचे आहे.जैविक शेती बद्दल शेतकरी गोंधळलेल्या अवस्थेत आला.
पहिली दोनतीन वर्षे उत्पादन कमी येते. पुन्हा ते वाढत जाते असे सल्ले देत होती. मात्र, तेवढे थांबण्याची शेतकऱ्याची मानसिकता आणि औकात नाही. यामुळे शेतकरी पुन्हा रासायनिक शेतीकडे वळल्याचे वास्तव आहे.
त्यासाठी शेतीत आमूलाग्र बदल घडवून आणणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची अस्मिता जागृत करणे व जैविक शेती चे प्रबोधन करणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेती निसर्ग व आरोग्याच्या दृष्टीने चांगली आहे. आपण आजच्या उत्पादन फायद्यासाठी उद्याचं भविष्य धोक्यात तर घालत नाही ना?
आधुनिक तंत्रज्ञान ने उल्लेखनीय बदल झाले व त्याचबरोबर पर्यावरण आणि आरोग्याच्या दिशेनेही काही विपरित परिणाम झाले. रासायनिक खतांचा व कीटकनाशक,बुरशीनाशक अशा कितीतरी रसायनांचा वारेमाप वापर झाला. परिणामी काय तर जमिनीची प्रत आपल्या या कारणामुळे ढासळली. जमिनीतील साठवलेल सेंद्रिय कर्ब नष्ट झाले व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तर अतिशय हानिकारक परिणाम दिसुन आले हे काही नवीन नाही.
त्याच बरोबर शेतीतील जैवविविधता धोक्यात आली. त्यामुळे आज गरज निर्माण झाली आरोग्यपूरक, पर्यावरणपूरक शेती करण्याची म्हणजेच ‘सेंद्रिय शेती कींवा जैविक शेतीच्या कडे वळण्याची. जेव्हा आपन सेंद्रिय शेती करीत असताना काही तत्त्वे आपण जोपासली पाहिजे व मुख्य म्हणजे निसर्गाप्रती प्रेम व आवड असणे आवश्यक आहे. निसर्गाने आपल्याला हे सर्व दिलेले आहे, म्हणून आपणही निसर्गाचं काही देणं लागतं
जसे कंपोस्ट खत, शेणखत मित्रांनो सेंद्रिय शेतीच उद्दीष्ट काय आहे पर्यावरण संरक्षणात महत्वाची भूमिका बजावते.जसे मातीचा कस टिकविण्यास मदत होते.पारंपरिक शेती पध्द्तीचा वापर केला जातो.
जीवनमान उंचावण्यास मदत होते.कमीखर्चात खत तयार होत असल्याने आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.
सेंद्रिय शेती करावयाची असल्याने पाळीव प्राण्यांनाही पाळावे लागते.शेतीतील उरलेला पालापाचोळा व आजूबाजूस उगवलेल्या वनस्पतींचा खत तयार करण्यासाठी वापर केला जातो.
तेव्हा मित्रांनो जैविक शेतीचा अवलंब करा. घरच्याघरी सेंद्रिय खत तयार करा. पण हे करण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे सेंद्रिय खत आपल्या शेतात उपयोगी राहील हे माती परीक्षण करून जाणून घ्या ही काळाची गरज आहे.
विचार बदला जिवन बदलेल
मिलिंद जि गोदे
Mission agriculture soil information
milindgode111@gmail.com
Published on: 27 January 2022, 05:13 IST