Agripedia

वनस्पतीमध्ये कुठलाही अन्नघटक स्वतंत्रपणे काम करीत नाही. गरजेप्रमाणे स्फुरद आणि पालाश, सिलिकॉन व पालाश आणि तिघे एकत्र शिवाय त्यांच्यासोबत इतर सूक्ष्म अन्नद्रव्य अशी एकत्रितपणे पिकाच्या शरीरात त्यांचे काम चालतात. अशाच एका उपयुक्त पिकांसाठी महत्वाचा पोषक घटक पोटॅश ची माहिती व त्याचा पिकांसाठी होणारा उपयोग याची माहिती आपण या लेखात घेऊ.

Updated on 03 November, 2021 9:37 AM IST

 वनस्पतीमध्ये कुठलाही अन्नघटक स्वतंत्रपणे काम करीत नाही. गरजेप्रमाणे स्फुरद आणि पालाश, सिलिकॉन व पालाश आणि तिघे एकत्र शिवाय त्यांच्यासोबत इतर सूक्ष्म अन्नद्रव्य अशी एकत्रितपणे पिकाच्या शरीरात त्यांचे काम चालतात. अशाच एका उपयुक्त पिकांसाठी महत्वाचा पोषक घटक पोटॅश ची माहिती व त्याचा पिकांसाठी होणारा उपयोग याची माहिती आपण या लेखात घेऊ.

पोट्याश चे महत्व

स्फुरदहा उत्पन्न ठरवणारे घटक आहे. तर पोट्याश हा शेती उत्पादनाची गुणवत्ता ठरविणारा घटक आहे. उत्पादनाची चव, रंग, तजेलदारपणा व टिकाऊ क्षमता हे गुण मुख्यता पोटॅशच्या उपलब्धतेवर ठरतात. म्हणजे स्फुरद व सिलिकॉन हे दोघही इमारतीच्या पायाच्या दगडाप्रमाणे काम करतात तर पोट्याश हा कळस चढवितो.पालाश व सिलिकॉन यांची कामे विशेषतः तान नियोजनाच्या कामात सारखे आहेत. सिलिकॉन कायम अप्रत्यक्षपणे कामे करतो तर पालाश प्रत्यक्ष पिकाच्या वाढीतील महत्त्वाचा घटक आहे.वातावरण बदलामुळे पिकांवर येणारे जैविक व अजैविक ताण यांना सामोरे जाताना पिकाची अन्नघटकांची गरज बाहेरून खते देऊन मोठ्या प्रमाणावर भागविली जात आहे. पण अतिरिक्त नत्र तर पालाश व स्फुरदाची कमतरता यामुळे जवळजवळ सर्व पिकांची उत्पादने व त्यांची गुणवत्ता सतत घटते आहे. सर्व ताणांना तोंड देण्यात सिलिका व पालाशची उपलब्धता निर्णायक ठरणार आहे.

पोटॅशच्या उपलब्धतेमुळे पीक सहन करते ताण

  • दुष्काळाचा ताण- दुष्काळी परिस्थितीत पानामागे असणारी पर्णरंध्रे बंद राहणे व पाणी उडून जाण्याचे प्रमाण कमी होऊन पिकाच्या शरीरात जास्त काळ पाणी टिकणे मध्ये पोट्याश मदत करते.शास्त्रज्ञांच्या मते पोटॅशच्या कमतरतेमुळे दुष्काळी परिस्थितीत पानात इथीलिनचीजास्त निर्मिती होते. त्यामुळे स्टोमेटा पेशी वर होणाऱ्या अबसीसिक ऍसिडच्या क्रियेत अडथळा येतो. त्याचे बंद होणे टाळले जाते. याचा प्रतिकूल परिणाम कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेणे यावर व पर्यायाने प्रकाशसंश्‍लेषण वर होतो. त्यामुळे रिएक्टिव ऑक्सीजन स्पेसिज ची निर्मिती वाढते. क्लोरोफिल व पेशी आवरण यांचे विघटन सुरू होते व कालांतराने पान मरते.
  • पेशी आवरणाचे स्थिरता, मुळांची वाढ, पानांचा आकार तसेच पिकाचे एकूण वजन दुष्काळी परिस्थितीतही वाढविण्यासाठी पोटॅश ची  गरज असते. त्याचा अनुकूल परिणाम पाणी शोषून घेणे, पिकात टिकवून ठेवणे यावर होतो.
  • क्षारांचा ताण- पालाशची कमतरता असेल तर क्षाराचा ताण सहन करायची पिकाची शक्ती कमी होते. कारण या ताणाच्या काळात पिकामध्ये नत्र व प्रकाश संश्लेषण आत कार्बन-डाय-ऑक्‍साईड शोषून घेण्यात अडथळे निर्माण होतात. पिकांची वाढ, उत्पादन क्षमता तसेच पीक जिवंत राहण्याची क्षमता यावर प्रतिकूल परिणाम होतो.
English Summary: benifit of potash fertilizer in crop and drought condition
Published on: 03 November 2021, 09:37 IST