Agripedia

आता शेतकरी शेतीमध्ये उत्पन्न वाढावे यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर करतात. परंतु या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर हा पिकांसाठी, मातीच्या आरोग्यासाठी पर्यायाने पर्यावरणासाठी देखील घातक आहे. त्यामुळे आता बरेच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. सेंद्रिय शेतीमधील वापर करायचा एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे ह्युमिक ऍसिड. या लेखामध्ये आपण ह्युमिक ऍसिडचे फायदे आणि ते घरच्या घरी कसे बनवता येईल याबद्दल माहिती घेणार आहोत.

Updated on 05 October, 2021 10:30 AM IST

आता शेतकरी शेतीमध्ये उत्पन्न वाढावे यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर करतात. परंतु या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर हा पिकांसाठी, मातीच्या आरोग्यासाठी पर्यायाने पर्यावरणासाठी देखील घातक आहे. त्यामुळे आता बरेच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. सेंद्रिय शेतीमधील वापर करायचा एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे ह्युमिक ऍसिड. या लेखामध्ये आपण ह्युमिक ऍसिडचे फायदे आणि ते घरच्या घरी कसे बनवता येईल याबद्दल माहिती घेणार आहोत.

ह्युमिक ऍसिड म्हणजे काय?

 जनावरांची विष्ठा व मूत्र, पालापाचोळा आणि शेतातील इतर काडीकचरा कुजून त्याचे विघटन होऊन तयार झालेला पदार्थ म्हणजे ह्युमस. बाजारामध्ये वेगळ्या प्रकारचे हुमिक ऍसिड मिळतात. हे पोटॅशियम हुमेट च्या स्वरूपात असतात. यामध्ये ह्युमिक ऍसिड वरती कॉस्टिक पोट्याशची प्रक्रिया करून तयार होते. परंतु हे ह्युमिक ऍसिड आपण घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने बनवू शकतो. ते कसे बनवायचे हे पाहू.

 घरच्या घरी ह्युमिक ॲसिड कसे बनवायचे? ( एक एकर साठी )

 साहित्य जुन्या गोवऱ्या,गूळ दोन किलो, दीड ते दोन किलो दही, 100 लिटर पाणी

 कृती एका ड्रममध्ये किंवा मोठ्या भांड्यात पाणी घ्यावे. या पाण्यामध्ये  गोवऱ्या टाकायचे आहेत. त्यानंतर 100 लिटर पाण्यात गूळ टाकायचा आहे. हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. त्यानंतर त्या मिश्रणात दही घालायचे आहे. गोवऱ्या, दही आणि गुळ पिकाच्या पांढऱ्या मुलांसाठी उपयुक्त आहे. हे मिश्रण असेच पाच ते सहा दिवस झाकून ठेवायचे आहे आणि प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी हे मिश्रण आपल्याला आठवणीने ढवळायचे आहे. त्यानंतर सहाव्या दिवशी हे शंभर लिटर चे मिश्रण 200 लिटर च्या ड्रम मध्ये टाकायचे. त्यामध्ये 100 लिटर पाणी घालायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण गाळून ड्रीपद्वारे किंवा पाण्यातून आपल्या एक एकर पिकांना द्यावी.हे मिश्रण जास्तीत जास्त आठ दिवसांमध्ये शेतीसाठी वापरावे. त्यानंतर हे मिश्रण पिकांना घालू नये. तयार झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर हे मिश्रण वापरावे. हे मिश्रण फळबागा, भाजीपाला किंवा कोणत्याही पिकासाठी वापरू शकता. महिन्यातून दोन वेळा हे पिकांना देणे फायद्याचे आहे.

 पिकांना ह्युमिक ऍसिड चे फायदे

  • पांढऱ्या मुळांची वाढ जलदगतीने करण्यासाठी ह्युमिक सिडचा वापर फायद्याचा ठरतो.
  • मातीला तडा जाणे, पृष्ठभागावरून पाण्याचा बहाव कमी करते आणि मातीची धूप थांबवण्यात हुमिक ऍसिड महत्त्वाची भूमिका बजावते.
  • ह्युमिक ऍसिड मुळे मातीची पाणी साठवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे दुष्काळ याचा प्रतिकार करण्यास मदत होते.
  • ह्युमिक ऍसिड मुळे मातीचा रंग गडद होतो त्यामुळे सूर्याची ऊर्जा शोषणास मदत होते.
  • आम्लयुक्त व क्षारयुक्त मातीचा सामू मध्ये तटस्थता आणण्याचे काम ह्युमिक ऍसिड करते.
  • अन्नद्रव्य व पाणी शोषून घेण्याची क्षमता वाढते.
  • ह्युमिक ऍसिड अनेक जैविक प्रक्रियांमध्ये सेंद्रिय उत्प्रेरक म्हणून काम करते.
  • पिकांची नैसर्गिक रोग-किडींचा विरोधात लढण्याची क्षमता वाढवते.
  • मुळाची श्वसन प्रक्रिया सुधारते तसेच मुळांच्या वाढीस उत्तेजन देते व माझी निर्मिती वाढवते.
  • हरितद्रव्य यांची, साखरेची वा अमिनो आम्ला चा विकास चांगल्या पद्धतीने होतो.
  • वनस्पतीमधील जीवनसत्व आणि खनिज पदार्थ प्रमाण वाढते.
  • बियाण्याची उगवण क्षमतावाढते.
  • उत्पन्न वाढण्यास मदत होऊन भौतिक आणि पौष्टिक मूल्य सुधारण्यास मदत करते. (स्त्रोत- हॅलोकृषी)
English Summary: benifit of humic acid to crop and process of homemade
Published on: 05 October 2021, 10:30 IST