पिकांसाठी उपयुक्त आहे निळे हरित शैवाल आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू
पिकांच्या वाढीसाठी नत्र व स्फुरद या मुख्य पोषणद्रव्य आवश्यक असतात. या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी निसर्गात कार्यरत असणाऱ्या जीवाणूंचा वापर करणे शक्य आहे. वातावरणामध्ये 78 टक्के नायट्रोजन असून तो पिकांना वापरणे शक्य होत नाही. जमिनीतील काही जिवाणू या नत्राचे रूपांतर पिकांना उपलब्ध करून देतात.जिवाणूंचे तसे बरेच प्रकार आहेत. या लेखात आपण निळे हरित शैवाल आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू बद्दल माहिती घेणार आहोत.
निळ्या-हिरव्या शैवालचेफायदे
- हवेत असणाऱ्या नत्राचे स्थिरीकरण करून जवळजवळ 25 ते 30 किलो नत्र प्रति हेक्टर एका हंगामात मिळते. रासायनिक खतांच्या नत्र मात्रेमध्ये हेक्टरी 25 ते 30 किलो बचत होते.
- जमिनीतील अद्राव्य स्वरूपातील स्फुरदभात पिकासाठी काही प्रमाणात उपलब्ध होते.
- जमिनीत सेंद्रिय पदार्थ वाढून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
अझोला –
एक पान वनस्पती असून तिच्या पेशीत नेचे वर्गीय ऍनाबेनाअझोली हे निळे हिरवे शेवाळ सहजीवी पद्धतीने वाढते. ही वनस्पती प्रकाश संश्लेषण याच्या मदतीने अन्न तयार करते. त्याचप्रकारे सहिवाल हवेतील नत्र स्थिर अझोला त् साठविते. अझोला मुळे प्रति हेक्टरी 20 ते 40 किलोपर्यंत नत्र मिळते.
स्फुरद विरघळणारे जिवाणू
काही जिवाणू हे मातीतील घट्ट स्वरूपातील स्फुरदाचे विघटन करून त्याचे पाण्यात विद्राव्य स्वरूपात रूपांतर करतात. जमिनीमध्ये असलेल्या स्फुरदाची पिकांना उपलब्धता करून देतात. परिणामी स्फुरदयुक्त रासायनिक खतांची बचत होते. तसेच उत्पादनामध्ये 15 ते 20 टक्क्यांनी वाढ होते.स्फुरद मुळे कर्ब युक्त पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया वेगाने होते. तसेच पिकांच्या मुळांची वाढ ही जोमदार होते. पीके फास्फोरिक ॲसिड च्या रूपाने स्फुरद घेतात.
तसेच काही जिवाणू हे सायट्रिक आम्ल, फुमारिकआमल, लॅक्टिक आम्ल,फास्फेट च्या द्रवात रूपांतर करून पिकास उपलब्ध करून देतात.
जैविक खते वापरण्याचे फायदे
- बियाण्याची उगवण लवकर व चांगल्या पद्धतीने होते.
- पिकांची वाढ जोमदार होते
- पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- जिवाणू खतांचा वापर केल्यास पीक उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते.
- जिवाणू खतांच्या वापरामुळे जमिनीवर कोणत्याही प्रकारचे वाईट परिणाम होत नाहीत.
- नत्राचे प्रमाण योग्य ठेवून पोत सुधारतो व नंतरच्या पिकास याचा फायदा होतो.
- रासायनिक खतांच्या वापरामध्ये 15 ते 25 टक्के बचत होते.
- जिवाणू खते हे कमी खर्चिक, प्रदूषण मुक्त व वापरण्यास अत्यंत सोपे असतात.
Published on: 09 September 2021, 12:22 IST