Agripedia

आयुर्वेदामध्ये हळदीला फार महत्त्वाचे स्थान आहे. जगात 80 टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात,औषधांमध्ये, सौंदर्यप्रसाधनां मध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. सामाजिक कार्यक्रमातही हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या अशा महत्वपूर्ण हळदीच्या काही महत्त्वपूर्ण आणि सुधारित अशा जातींची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.

Updated on 07 November, 2021 1:44 PM IST

आयुर्वेदामध्ये हळदीला फार महत्त्वाचे स्थान आहे. जगात 80 टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात,औषधांमध्ये, सौंदर्यप्रसाधनांमध्ये  मोठ्या प्रमाणात केला जातो. सामाजिक कार्यक्रमातही हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या अशा महत्वपूर्ण हळदीच्या काही महत्त्वपूर्ण आणि सुधारित अशा जातींची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.

हळद पिकाच्या सुधारित आणि फायदेशीर जाती

  • सेलम- सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातया जातीची लागवड करण्यात येते या हळदीची पाने रुंद असून हळकुंडाची कातडी पातळ व गाभ्याचा रंग गर्द पिवळा असतो. कच्च्या हळदीचे उत्पादन 140 ते 160 क्विंटल प्रति एकर येते.वाळलेल्या हळकुंडाचे उत्पादन 25 ते 35 क्विंटल येते. या जातीची हळद पक्व होण्यास साडेआठ ते नऊ महिने लागतात.
  • कडप्पा किंवा टेकुरपेटा- या जातीची हळकुंडे लांब,जाड व प्रमाणबद्ध असतात हळकुंडाचा गाभा फिकट पिवळा असतो. पानांचाही रंग फिकट असतो.पाने रुंद व सपाट असतात. एकूण 10 ते 12 पाने असतात. या जातीस फुले क्वचित येतात. करपा रोगास ही जात कमी बळी पडते. या जातीचे कच्च्या हळदीचे एकरी दीडशे ते 160 क्विंटल  व वाळलेल्या हळदीचे 20 ते 25 क्विंटल उत्पादन मिळते.
  • राजापुरी-या जातीची पाने रुंद,फिखट हिरवी व सपाट असतात.एकूण 10 ते 18 पाने येतात.झाडास फुले क्वचित येतात. हळकुंड व उपहळकुंडआखूड,जाड व रसरशीत असतात.हळकुंडाची कातडी पातळ असून गाभ्याचा रंगपिवळा ते गर्द पिवळा असतो.ही जात करपा रोगास बळी पडते. हळद पक्व होण्यास आठ ते नऊ महिने लागतात.
  • वायगाव हळद- या जातीसआठते दहा पाने येतात. ती गर्द हिरवी व चकाकणारी असतात. ही जात सात ते आठ महिन्यात तयार होते. या जातीवर जवळजवळ नव्वद टक्के झाडांना फळे येतात. पानांचा तीव्र सुवास असतो. या जातीचा उतारा 20 ते 22 टक्के असतो.हळकुंड रताळ्या सारखी लांब व प्रमाणबद्ध असतात. या जातीच्या कच्च्या हळदीचे उत्पादन 75 ते 80 क्विंटल  आणि वाळलेल्या हळदीचे उत्पादन 12 ते 15 क्विंटल एकरी मिळते.हीजातकरपारोगासकमीबळीपडते.
  • कृष्णा- हळद संशोधन केंद्र डिग्रस येथून कडाप्पा जातीपासून निवड पद्धतीने कृष्णा ही जात शोधून काढली असून शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रसारित केलेली आहे.
  • या जातीचे सर्व गुणधर्म कडाप्पा जाती सारखेच असून वाळलेल्या हळदीचे उत्पन्न प्रति एकर तीस ते पस्तीस क्विंटल येते.ही जातकरपा रोगास कमी बळी पडते.
  • एसीसी -361- या जातीपासून ताज्या गाठीचे प्रति एकरी उत्पन्न 145 क्विंटल उत्पादन 198 दिवसात मिळते. वाळलेल्या हळकुंडाचा उतारा 18 टक्के आहे व कुरकुमीन चे प्रमाण 7.0 टक्के आहे.
  • प्रभा- ही जात भारतीय मसाले संशोधन संस्था कालिकत येथे निवड पद्धतीने शोधली आहे. या जातीचे 195 दिवसात एकरी दीडशे क्विंटल ताजा हळदीचे उत्पादन मिळते. या जातीच्या गाठीत 6.62 टक्के कुरकुमीन, 15%ओलिओरझीन,6.5 टक्के सुगंधी तेल आणि ताज्या गाठ्यापासून19.5टक्के वाळलेली हळकुंडे मिळतात.
English Summary: benificial veriety of turmuric crop cultivate for more production
Published on: 07 November 2021, 01:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)