चवळी ही शेंगवर्गातील भाजी असून महाराष्ट्रात सर्व भागातून त्याची लागवड केली जाते. भाजीपाल्याचे पीक म्हणून चवळीचीलागवड मोठ्या शहरांच्या आसपास आणि ग्रामीण भागात मर्यादित स्वरूपात होते. कडधान्य म्हणून सुद्धा चवळीची लागवड होते. या लेखात आपण चळवळीच्या काही प्रमुख जाती पाहणार आहोत.
चवळीच्या प्रमुख उत्पादन जाती
- पुसाफाल्गुनी:
ही जात झुडूप वजा वाढणारे असून उन्हाळी हंगामासाठी अतिशय चांगली आहे.शेंगा गडद हिरव्या रंगाच्या असून दहा ते बारा सेंटीमीटर पर्यंत लांब असतात. या जातीला दोन बहर येतात. लागवडीपासून 60 दिवसात शेंगांचे काढणी सुरू होते. हेक्टरी 90 ते 110 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
- पुसाकोमल:
ही जात करपा रोगास प्रतिकारक असून याचे रोपटे झुडूप वजा व मध्यम उंचीचे असते. 90 दिवसांत पीक तयार होते.फॅक्टरी 90 ते 100 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
- पूसा दो फसली:
ही जात झुडूपा सारखी वाढते या जातीची लागवड उन्हाळी आणि पावसाळी या दोन्ही हंगामात करता येते. शेंगा सुमारे 18 सेंटिमीटर लांब असून शेंगांची काढणी लागवडीपासून 67 ते 70 दिवसात सुरू होते. या जातीपासून हेक्टरी उत्पादन 100 क्विंटलपर्यंत मिळते.
- पुसा बरसाती:
ही जात लवकर येणारी असून कमीत कमी 45 दिवसात तयार होते.पावसाळी किंवा खरीप हंगामासाठी उपयुक्त असे जात आहे. शेंगांची लांबी 15 ते 25 सेंटिमीटर असते. या जातीचे दोन किंवा तीन बहार येतात. या जातीच्या हिरव्या चवळीचे उत्पादन 85 ते 90 क्विंटल प्रति हेक्टर येते.
- असिम:
ही जात 80 ते 85 दिवस मुदतीचे असून खरीप हंगामासाठी अतिशय फायदेशीर आहे. पहिली तोडणी 45 दिवसात मिळते. एकूण आठ ते दहा तोडण्या 35 ते 40 दिवसात संपतात. या जातीच्या शेंगा फिक्कट हिरव्या मांसल आणि रसरशीत 15 ते 18 सेंटिमीटर लांब असतात. बी पांढऱ्या रंगाचे असून फुले पांढरी असतात. हिरव्या शेंगा ची हेक्टरी उत्पादन खरीप हंगामात 75 क्विंटल तर उन्हाळ्यात 60 क्विंटल प्रति हेक्टरी मिळते.
- ऋतुराज:
झुडूप वजा वाढणारी ही जात असून पेरणीनंतर उन्हाळ्यात चाळीस दिवसांनी आणि खरिपात 30 दिवसांनी फुलावर येते. फुले जांभळी असून शेंगा 22 ते 24 सेंटिमीटर लांब कोवळ्या असतात. खरीप हंगामात पहिली तोडणी 40 ते 45 दिवसांनी मिळते. त्यानंतर दहा ते बारा तोडणे होतात.हिरव्या शेंगा आणि बी या दोन्हींसाठी ही जात उपयोगी असून प्रतिहेक्टरी शेंगांचे दहा टन पर्यंत उत्पादन मिळते. खरीप हंगामात पीक 60 ते 65 दिवसात आणि उन्हाळी हंगामात 75 ते 80 दिवसात तयार होते..
Published on: 28 September 2021, 12:40 IST