Agripedia

कोथिंबीर हे कमी कालावधीत व कमी उत्पादन करता देणारे फार महत्त्वपूर्ण पीक आहे. कोथिंबीरीची लागवड भारतातील बहुतेक सर्वच राज्यात व्यापारी तत्त्वावर केली जाते. कोथिंबीरीच्याो विशिष्टभ स्वादामुळे तिला वर्षभर सर्वत्र मागणी असते. या लेखात आपण कोथिंबीर च्या काही जाती विषयी माहिती येऊ

Updated on 28 September, 2021 7:57 PM IST

 कोथिंबीर हे कमी कालावधीत व कमी उत्पादन करता देणारे फार महत्त्वपूर्ण पीक आहे. कोथिंबीरीची लागवड भारतातील बहुतेक सर्वच राज्यात व्यापारी तत्त्वावर केली जाते. कोथिंबीरीच्‍या विशिष्‍ट स्वादामुळे  तिला वर्षभर सर्वत्र मागणी असते. या लेखात आपण कोथिंबीर च्या काही जाती विषयी माहिती येऊ

कोथींबीरीच्या काही उन्नत जाती

  • लाम.सी.एस.- चार ( साधना)

हे कोथिंबीरीचे जात उंच वाढणारी, भरपूर फांद्या असलेली आणि पाने असलेली झुडूप वजा वाढणारी आहे. या जातीची मुख्य काडी रंगीत असते.ही जात रोग आणि किडींचा प्रतिकारक आहे. बियाण्यासाठी चांगले असणाऱ्या या जातीचे हेक्‍टरी 1000 ते अकराशे किलो उत्पादन मिळते.

  • लाम.एस.एस.-6

ही जात झुडूप अवजा वाढणारे असून भरपूर फांद्या असतात. ही जात मध्यम उंचीची आहे. मुख्य काडी रंगीत असते. ही जात भूरी रोगास प्रतिकारक आहे.

  • व्ही.1 व व्ही-2

या कट्वान पद्धतीच्या जाती असून त्यांच्यापासून 3ते4 खोडवे  मिळत असल्यामुळे या जाती लोकप्रिय आहे.

  • को-1

हे तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलीली जात आहे. तेजात कोथिंबीर आणि धण्यासाठी चांगली आहे. या जातीचे 40 दिवसात हेक्‍टरी दहा टन कोथिंबिरीचे उत्पादन मिळते. तर बियाण्याचे एकशे दहा दिवसात 500 किलो उत्पादन मिळते.

  • पंतहरित्मा

पंतनगर येथे विकसित झालेल्या या वाणापासून सेक्टर 125 ते 140 क्विंटल उत्पादन मिळते. या जातीचे पाने मुलायम, सुवासिक, आकर्षक हिरव्या रंगाची व उंच वाढणारी, आठ ते नऊ फांद्या, बियाणे लहान आकाराचे, जांभळ्या रंगाचे,फाद्यांवर जांभळट छटा असतात.

प्रत्येक झाडावर 40 ते 50 फुलांचे गुच्छ असतात.स्टेम गोल या रोगास प्रतिकारक आहे. ही जात 155 ते 160 दिवसांत तयार होते. याशिवाय कोथिंबीरीचे आर सी आर -41, गुजरात 1, गुजरात 2 हे राजस्थान आणि गुजरात मध्ये घेतले जाणारे चांगले वाण आहेत.

 तसेच कोथिंबिरीचे 65 टी, 5365 एनपीजे, 16 व्ही,1 व्ही 2, डी 92, डी 94, के 45 या कोथिंबीरीच्‍या स्‍थानिक आणि सुधारित जाती आहेत.तसेच वैशाली, दापोली या जाती देखील उत्तम आहेत.

English Summary: benificial veriery of corriender crop
Published on: 28 September 2021, 07:57 IST