Agripedia

विषय आहे कृषी यांत्रिकीकरण या मधे शेती साठी उपयुक्त यंत्र म्हणजे

Updated on 21 April, 2022 12:34 PM IST

विषय आहे कृषी यांत्रिकीकरण या मधे शेती साठी उपयुक्त यंत्र म्हणजे बि बि एफ टोकन यंत्र आहे आता प्रश्न पडला असेल कि हे बि.बी.एफ.(BBF) तंत्रज्ञान म्हणजे काय? शेती मधे यंत्राची भुमिका काय आहे हे संपूर्ण समजून घेऊया.साध्या भाषेत सांगायचे झाले तर बि बि एफ म्हणजे रूंद वरंबा सरी यांचा उपयोग सर्व पिकाच्या पेरणी साठी होता सोयाबीन, हरभरा,मुंग, तिळ,अजवायन या पर्यंत होता.मुख्यता सोयाबीन साठी महत्वाचा आहे सततच्या हवामान बदलामुळे पाऊस कमी होत आहे त्या मधे पावसाचे दिवस यामध्ये खूप मोठा बदल झालेला दिसून येत आहेत. निसर्गाच चक्र दिवसांनदीवस बदल होत आहे. कधी कधी कधी तर पिकाच्या वाढीच्या पक्वतेच्या काळात सरासरीपेक्षा ही कमी जास्त पाऊस पडतो. दोन पावसांमध्ये दीर्घ खंड पडणे, जमिनीतील ओलावा कमी होणे इ. कारणांमुळे पिकांच्या उत्पादनामध्ये घट येत असल्याने आढळून आले आहे.

आपल्या विदर्भात मुख्यतः शेती पावसावर अवलंबून आहे. कोरडवाहू शेतीअसून,जमीन मध्यम ते भारी प्रकारामध्ये मोडते. यंत्राद्वारे आपल्याकडील ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, जवस इ. पिकांची मळणी खूप चांगल्या प्रकारे करता येते. मळणी यंत्र खरेदी करत असाल तर त्याची रचना, त्याचा वापर कसा करावा याची माहिती असणे आवश्यक असते.

मळणी यंत्र वर्षभर वा सतत चालणारे यंत्र नाही ते हंगातील सुगीपुरतेच चालत असल्यामुळे त्याची निगा व देखभाल कशी राखावी याबाबतची सविस्तर माहिती प्रस्तुत मळणी यंत्राची रचना व देखभाल या लेखाद्वारे आपणास मिळणार आहे.आपल्या भागात खरीप हंगामामध्ये घेतल्या जाणार्‍या मुख्य पिकं म्हणजे सोयाबीन हे एक महत्वाचे शेंगवर्गीय पीक आहे. मध्यम ते भारी जमिनीत पीक चांगले येते. 

परंतु अलीकडील काळात पावसाचे कमी प्रमाण व वातावरण बदला मुळे पिकाच्या वाढीच्या अवस्थांमध्ये पाऊस केव्हा केव्हा दांडी मारतो व आवश्यकते वेळी जमिनीतील ओलावा कमी होऊन पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादनात हमखास घट येते किंवा संपूर्ण पीक वाया जाऊन हाती काहीच लागत नाही असे शेती मधे पाहायला मिळते.आपला खरीप हंगाम जून महिन्यात चालू होतो.मान्सून वार्‍यांपासून पावसाला चांगली सुरुवात झाली की व पाऊस योग्य झाला तर आपन सोयाबीन पिकाची पेरणी केली जाते. परंतु खुप वेळा असे होते की पिकं वाढीच्या वेळेस असताना पाऊस हा तिनं आठवडे ते महिनाभर लांबतो व दोन पावसांमध्ये मोठा खंड पडतो. अशा वेळी पिकाला पाण्याच्या ताणापासून वाचविण्यासाठी त्याच बरोबर सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या जमिनीत निचरा करण्यासाठी पडणार्या पावसाचा उपयोग घेण्यासाठी हैदराबाद मधील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेने विकसित केलेल यंत्र म्हणजे रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीचा उपयोग मुख्यतः सोयाबीन लागवडीसाठी उपयोग होतो.

हे ट्रॅक्‍टरवरचं पेरणी यंत्र असून शेती मधे रुंद वरंबे व सऱ्या पाडणे पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी करता येतात. यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे यंत्रावर सर्वच पिकांची पेरणी करता येते.दाते मधिल अंतर योग्य वेळी व गरजेनुसार कमी जास्त करता येते. तसेच सऱ्यांची रुंदीही कमी जास्त करता येते. उदा. वरंब्यावर सोयाबीन पिकाच्या योग्य अंतरावर ३ ओळी घेता येतात. लोखंडी फाळामध्ये तयार होणाऱ्या सऱ्यांची रुंदी आपल्या गरजेनुसार ठेवूं शकतो. हे यंत्र कोरडवाहू शेतीमध्ये एक नंबर उपयोगाचे आहे मुलस्थानी जलसंधारणाच्या दृष्टीने बीबीएफ पद्धत अतिशय उपयुक्त आहे. तसेच अधिक व सततच्या पावसामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने बीबीएफ पद्धत उपयोगी आहे. या पद्धतीमुळे सर्वसाधारणपणे २० टक्के उत्पादनात वाढ दिसून आली आहे.तसेच बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर केल्यास सोयाबीन पिकास मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश व हवा मिळाल्यामुळे पिकाची वाढ चांगली होते.पिकामध्ये आंतरमशागत करण्यास व ट्रॅक्‍टरचलित किंवा मनुष्य चलित यंत्राद्वारे कीटकनाशकाची व तणनाशकाची फवारणी करण्यास सोयीस्कर होते.पर्जन्यमान खंडाच्या कालावधीत पाण्याचा ताणाची तीव्रता कमी होते व जास्त पर्जन्यमान झाल्यास अतिरिक्त पाणी सरीद्वारे वाहून जाण्यास मदत होते.

जमिनीची सच्छिद्रता वाढून जमीन भुसभुशीत होते.सोयाबीनची पेरणी बीबीएफ पद्धतीने केल्यास बियाण्याची उगवण चांगली होते.सपाट पद्धतीच्या तुलनेत रुंद वरंबा सरी पध्दतीमुळे सोयाबीन उगवण दोन दिवस अगोदर तसेच जोमदार झाल्याचे प्रयोगात दिसुन आले आहे.पिकाच्या दोन ओळी व दोन रोपांमधील अंतर शिफारस केलेल्या अंतरानुसार कमी-जास्त करता येते. हेक्‍टरी आवश्‍यक झाडांची संख्या ठेवता येते.पिकास मुबलक हवा सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होऊन पीक किड रोगास बळी पडत नाही.आणी महत्वाचं म्हणजे हे ट्रॅक्टरचलित बीबीएफ पेरणी यंत्राच्या सहाय्याने सोयाबीन, मका, हरभरा, तूर, भुईमुग, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, कापूस इत्यादी पिकांची टोकण पध्दतीने वरंब्यावर पेरणी करता येते. प्रत्येक पिकांकरिता वेगवेगळ्या बिजांच्या चकत्या आहेत. त्या सहजपणे बदलता येतात.

आपन जर या पध्‍दतीचा अवलंब केल्‍याने जमिनीची धुप कमी प्रमाणात होऊन सेंद्रीय कर्बाची होणारी घट थांबल्‍याने जमिनीची जलधारण क्षमता वाढते.आपल्या काही अडचणी आल्यास कृषी विज्ञान केंद्र घातखेड यांच्या शी संपर्क साधावा तसेच मला सर्व शेतकरी यांना हेच सांगायचे आहे आपन या तंत्रज्ञानाचा उपयोग केला तर आपली सर्वच बाबतीत बचत होईल हे निश्चित आहे.

 

श्री राजेश राठोड सर विषय विशेषज्ञ (कृषी व अभियांत्रिकी), कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती 1

मों-7038408010

यांच्या मार्गदर्शनानुसार ही माहिती

माहिती संकलन

मिलिंद जि गोदे

English Summary: Benefits Pro agriculture of technology Shri Rajesh Rathore sir
Published on: 21 April 2022, 12:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)