माश्या व मच्छरांचा त्रास दुर झाल्याने गाय ५० % शांत होते. गाईच्या कातडीवर २१ दिवसांत तेज येते, केसांचे पुंजके निघण्याचा प्रश्न सुटतो. त्वचेशी निगडीत सर्व रोग दुर होण्यास मदत होते.
गाईला अंगाला खाज / गजकर्ण इत्यादी समस्येवर वेस्ट डिकंपोजर युक्त पाण्याने आंघोळ घातल्याने ते कमी होतात.
गोमातेच्या अंगावरील जखम वेस्ट डिकंपोजर द्रावण वापरल्याने लवकर वाळते /भरून येते.
गाई म्हैशीच्या गोठ्यास ५० % प्रमाणात वेस्ट डिकंपोजर घेऊन पाण्यात मिसळून धुतल्याने गोठ्यातील हानीकारक,जिवाणू-विषाणू नष्ट होतात.
गाई म्हैशींना देण्यात येणार्या कडबा, भुस्सा, भात गव्हाच्या पिंजारावर वेस्ट डिकंपोजर शिंपडून दिल्याने गाई चवीनं खाऊन तो चारा फस्त करतात, दावणीत एक खांडूक सुद्धा शिल्लक ठेवत नाहीत. वेस्ट डिकंपोजरमुळे चार्याचा नाश थांबतो, पुर्ण खाल्ला गेल्याने गुण वाढतो.
गाई म्हैशीला देण्यात येणार्या शेंगपेंडेत /गोळीपेंडेत पाणी कालवताना १०० मिली वेस्ट डिकंपोजर मिसळून द्यावे, पेंड पुर्ण रित्या पचून अधिक दुध देण्याची ताकत पेंडीत येते, गाय म्हैस जास्त फॅटयुक्त दर्जेदार निकोप दुध देते.
गाईला पाजण्यात येणार्या पाण्यात १०० मिली वेस्ट डिकंपोजर मिसळावे, गाईच्या शरीरातील हानीकारक विषाक्त घटक, पॅथोजीन्स, हानीकारक बॅक्टेरिया यांचा नाश होतो, रागीट स्वभावाची गाय शांत होते , गाईस गोचिड लागण्याचे प्रमाण कमी होते.गोमातेस पाण्यातून वेस्ट डिकंपोजर पाजल्याने गाईच्या वारंवार गळणारे नाक, डोळ्यातून घाण येणे बंद होते, अपचन ,पित्त या अडचणी दुर होतात. लाथ झाडणारी गाय शांत होते. पोटाशी निगडीत विकारांवर मात होते.
वेस्ट डिकंपोजर पाण्यातून दिल्याने गोमातेचे गोमय दुर्गंधीमुक्त , एकसमान व मुलायम होते.गाई म्हैशींच्या प्रजननाशी निगडीत समस्या सुटण्यात वेस्ट डिकंपोजर मोलाची भुमिका पार पाडते.
गोमय/शेण जे उकिरड्यावर टाकले जाते, त्यावर १०० लिटर वेस्ट डिकंपोजर फवारल्याने बारीक चहा पावडरीसारख शेणखत ४० दिवसांत तयार होते. हे शेणखत कार्बन डाय ओक्साईड शेणातून विघटन झाल्याने थंड होते, खड्डा पालटताना थंड लागते, पायात गरम वाफ नष्ट झाल्याने भाजत नाही. हे शेणखत पुर्वीच्या शेणखताच्या तुलनेने दुप्पट कार्यक्षम असते, जिथं दोन पाट्यांची गरज होती तिथे एक पाटी पुरते.
तरी सर्व पशुपालक शेतकरी व गोपालकांनी वरील प्रमाणे वेस्ट डिकंपोजरचा वापर करावा व ईश्वरसेवेचा आनंद घ्यावा.
वेस्ट डिकंपोजर नाममात्र २०० रू यास येते व आयुष्यभरासाठी पुरते. बाजारातील, एमेझोन /फ्लिपकार्टवरील भेसळयुक्त दुय्यम दर्जाचे घेण्याऐवजी आपणास गरज असेल तर माझ्याशी संपर्क करा मी आपण पुरविन.
महिती स्त्रोत - डाॅ.कृष्ण चंद्रा,माजी संचालक,नैसर्गिक शेती संशोधन केंद्र गाझियाबाद उत्तरप्रदेश भारत सरकार
शब्दांकन - अॅड.प्रदिप कृष्णदेव पाटोळे,
वेस्ट डिकंपोजर महाराष्ट्र राज्य उपभोक्ता शेतकरी समुह
संपर्क - ०९९८७२२१८७२
ईमेल- pradipkpatole@gmail.com
Published on: 04 January 2022, 06:46 IST