Agripedia

हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. प्रामुख्याने ओलिताखालील अर्बन ऑक्टोरबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात केल्यास अधिक उत्पादन मिळते. काबुली हरभऱ्याची उशिरा पेरणी ही दहा नोव्हेंबरच्या आसपास करावी.हरभऱ्याच्याजास्त उत्पादनासाठी सुधारित वाणांची लागवड केली तर उत्पादन हमखास जास्तीचे मिळते.या लेखात आपण हरभराच्या काही सुधारित वानांची माहिती घेणार आहोत.

Updated on 24 September, 2021 2:27 PM IST

 हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. प्रामुख्याने ओलिताखालील अर्बन ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात केल्यास अधिक उत्पादन मिळते. काबुली हरभऱ्याची उशिरा पेरणी ही दहा नोव्हेंबरच्या आसपास करावी.हरभऱ्याच्याजास्त उत्पादनासाठी सुधारित वाणांची लागवड केली तर उत्पादन हमखास जास्तीचे मिळते.या लेखात आपण हरभराच्या काही सुधारित वानांची  माहिती घेणार आहोत.

हरभऱ्याचे सुधारित वाण

  • देशी हरभरा– हरभरा मुख्यत डाळी करता व बेसना करता वापरला जातो. या प्रकारामध्ये साधारणतः दाण्याचा रंग फिक्कट काथ्याते पिवळसर असतो. दाण्याचा आकार मध्यम असतो.
  • भारती( आयसीसीव्ही 10):

हाव आणि जिरायती तसेच बागायती परिस्थितीत चांगलायेतो. हा वाण मर रोग प्रतिबंधक असून 110 ते 115 दिवसांत काढणीस तयार होतो. जिरायती हेक्टर 14 ते 15 क्विंटल तर व ओलीता  मध्ये 30 ते 32 क्विंटल प्रति हेक्‍टर उत्पादन मिळते.

  • विजय( फुले जी -81-1-1):

जिरायती, ओलिताखाली तसेच उशिरा पेरणी करिता प्रसारित केला आहे. हा वाण मर रोगास प्रतिकारक्षम असून पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे. जिरायती शेतीत हेक्‍टरी 15 ते 20 क्विंटल व ओलीता खालील 35 ते 40 क्विंटल व उशिरा पेरणी केल्यास 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्‍टर उत्पादन क्षमता आहे.

  • जाकी 9218:

हा देशी हरभऱ्याचा आती टपोर दाण्याचा वाण आहे. हा वाण लवकर परिपक्व होणारा  म्हणजेच 105 ते 110 दिवसांत येणारा वाण आहे. तसेच हा मर रोगास प्रतिबंध आहे. सरासरी उत्पादन 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढे आहे. हा वाण शून्य मशागतीवर पेरणीसाठी उपयुक्त आहे. हा वाण विदर्भामध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला.

  • गुलाबी हरभरा:

गुलक 1- टपोरा दाण्याचा वाण मुळकुज व मर रोगास प्रतिकारक असून दाणे चांगले टपोरेगोल व गुळगुळीत असतात.फुटाणे तसेच डाळी तयार केल्यास त्यांचे प्रमाण डी आठ पेक्षा जास्त आहे.

  • हिरवा हरभरा –
    • दाण्याचा रंग वाळविल्यानंतर सुद्धा हिरवा राहतो. उसळ आणि पुलाव करण्यासाठी उत्कृष्ट आहे.
  • पीकेव्हीहरिता– हा वाण ओलिताखाली लागवडीसाठी योग्य. मर रोगास प्रतिकारक असून उत्पादन सरासरी 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्‍टर आहे.
English Summary: beneficial veriety gram crop benifit to farmer
Published on: 24 September 2021, 02:27 IST