Agripedia

टोमॅटो हे भाजीपालापिकापैकी एक महत्वाचे पिक आहे,क्वचितच असे एखाद स्वयंपाकघर असेल जिथे टोमॅटो नसणार. टोमॅटोचा वापर हा अनेक भाज्यांमध्ये केला जातो तसेच टोमॅटो हा सलाद मध्ये पण खाल्ला जातो. तसेच टोमॅटो हे आरोग्यासाठी खुपच लाभकारी आहे म्हणुन टोमॅटोची मागणी ही बाजारात कायम बनलेली असते. असे असले तरी केवळ काही राज्यांमध्येच टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. याच कारणामुळे त्याला इतर भागात चांगली किंमत मिळते.

Updated on 26 September, 2021 12:12 PM IST

टोमॅटो हे भाजीपालापिकापैकी एक महत्वाचे पिक आहे,क्वचितच असे एखाद स्वयंपाकघर असेल जिथे टोमॅटो नसणार. टोमॅटोचा वापर हा अनेक भाज्यांमध्ये केला जातो तसेच टोमॅटो हा सलाद मध्ये पण खाल्ला जातो. तसेच टोमॅटो हे आरोग्यासाठी खुपच लाभकारी आहे म्हणुन टोमॅटोची मागणी ही बाजारात कायम बनलेली असते. असे असले तरी केवळ काही राज्यांमध्येच टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. याच कारणामुळे त्याला इतर भागात चांगली किंमत मिळते.

जर तुम्ही देखील टोमॅटोची लागवड करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला आज टोमॅटोच्या अशा एका जातीबद्दल सांगणार आहोत, ज्यावर ना लवकर रोग येतो ना त्यावर कीटकांचा हल्ला होतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या जातीच्या टोमॅटोच्या एका झाडापासून तुम्ही जवळपास 18 किलो पर्यंत उत्पादन घेऊ शकता. चला तर मग वेळ न दवडता जाणुन घेऊया ह्या टोमॅटोच्या जातीविषयी जे की तुम्हाला नक्कीच मालामाल बनवून जाईल.

 ही टोमॅटोची वाण 2010 मध्ये भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था, बंगळुरू यांनी तयार केली. ह्या जातींचे प्रारंभिक उत्पादन हेक्टरी 75 ते 80 टन इतके होते. ही टोमॅटोची संकरित वाण आहे आणि ह्या जातींचे टोमॅटो गोल आणि आकाराणे मोठे असतात. ह्या जातीच्या प्रत्येक पिकलेल्या गडद लाल टोमॅटोचे वजन सुमारे 90 ते 100 ग्रॅम इतके असते.

असे सांगितले जात की, ही जात प्रक्रियेसाठी योग्य आहे

इतर जातीच्या तुलनेत ह्या जातीची टोमॅटो मजबूत असल्याने, ते दूरवरच्या बाजारपेठेत नेण्यासाठी योग्य आहेत. तसेच, ह्या जातींचे टोमॅटो प्रक्रियेसाठी पूर्णपणे अनुकूल मानले जातात. टोमॅटोच्या ह्या जातींचे नाव आहे अर्क रक्षक टोमॅटोच्या अर्का रक्षक जातीचे यश पाहता, अनेक देशांमधून ह्या जातीच्या बियाण्यांना मागणी येत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी, अर्का रक्षक या संकरित F-1 जातीचे बियाणे मोठ्या प्रमाणावर तयार केले जात आहे.

 अर्का रक्षक ही भारतातील पहिली तिहेरी रोग प्रतिरोधक वाण आहे. त्रिगुणिता म्हणजे तीन रोगांपासून संरक्षण, ते तीन रोग म्हणजे, लीफ कर्ल व्हायरस, बॅक्टेरियल ब्लाइट आणि अर्ली ब्लाइट.  ह्याच्या F-1 संकरित प्रजातीतील एक झाड जवळपास 18 किलो पर्यंत टोमॅटोचे उत्पादन देऊ शकते. या जातीमध्ये रोगांशी लढण्याची क्षमता असते आणि किडिंचा पण सामना करू शकतात.

 

 का केली गेली ही जात विकसित

खरे बघायला गेले तर, टोमॅटो लागवडीत तीन अडचणी खुप समस्या उत्पन्न करतात. लीफ कर्ल व्हायरस, बॅक्टेरियल ब्लाइट आणि अर्ली ब्लाइट, हे तीन रोग आहेत त्या तीन समस्या. केवळ ब्लाईट रोगाने पिकाचे 70 ते 100 टक्के नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत, आपल्या शास्त्रज्ञांनी ही विशेष वाण तयार केली, ज्यात रोगांशी लढण्याची क्षमता आहे आणि कीटकांचाही ती सामना करू शकते.

म्हणुन ह्या जातीची लागवड करून शेतकरी बांधव नक्कीच चांगला नफा कमवू शकतात.

English Summary: benecial veriety of tommato crop
Published on: 26 September 2021, 12:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)