Agripedia

बिट हें थंड हवामानातील येणारे पीक असून याला रंग, चव व उत्पादन चांगल्या प्रकारे येते. याचा वापर दररोज च्या आहारात केला जातो. सॅलेड, सरबत, कोशिंबीर, चटणी, रक्त वाढीसाठी याची चांगले मदत होते.

Updated on 17 November, 2021 9:31 PM IST

सॅलेड, सरबत, कोशिंबीर, चटणी, रक्त वाढीसाठी याची चांगले मदत होते. भारतात पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, पश्चिम बंगाल व महाराष्ट्र या राज्यांमध्ये या पिकाची लागवड केली जाते. बाजारात याची चांगले मागणी आहे.

 

जमिनीचा प्रकार

बिटच्या लागवडीसाठी भुसभुशीत, पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य असते. तसेच भारी जमिनीत बीटाची लागवड केल्यास बीटाच्या मुळाचा आकार वाकडा होतो. या साठी जमिनीचा सामू हा ६ ते ७.५ असावा. तसेच ९ते १० सामू असणाऱ्या क्षारयुक्त जमिनीत बीटाची वाढ चांगले होते तसेच बीट ची महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवड केली जाते.

 

हवामान

बिट हें थंड हवामानातील पीक असून या काळातील हवामान पोषक असते बीटची रब्बी हंगामात ऑक्टोबर मध्ये बी पेरणी केली जाते परंतु महाराष्टामध्ये जून व जुलै मध्ये बियांची पेरणी केली जाते.

 

पिकाची जात

डेट्राईट डार्क रेड, क्रीम्सन ग्लोब, अर्ली वंडर

लागवड

एक हेक्टर साठी ७ ते १० किलो बियाणे लागते.बियाणां ची लागवड पेरून किंवा टोकण पद्धतीने करावी. एका ठिकाणी २ बिया टोकून लागवड करावी बीटासाठी ४५ सेमी अंतरावर सरीवर करावी आणि सरी वरंबा १५ ते २० से मीटर अंतरावर बियाणे लागवड करावी. बियाणे उगवून आले की विरळणी करून एका ठिकाणी १ च रोप ठेवावे. तसेच बी लागवड करण्या पूर्वी बियाणे राञभर भिजत ठेवावे म्हणजे बियाणे चांगले उगवते. बियाणे जमिनीत लागवड करण्यापूर्वी जमिनीत ओलावा असावा, बीट ची लागवड ३०-४५ बाय १५ ते २० सेमीटर अंतरावर वर करावी._

 

खत व्यवस्थापन

लागवडीच्या वेळी १५ ते २० गाड्या शेणखत टाकावे ६० ते ७० किलो नत्र,१०० ते १२० किलो स्फुरद आणि ६० ते ७० किलो पालाश हेक्टरी दयावे. नत्राची अर्धी मात्रा व स्फुरद आणि पालाशची पूर्ण मात्रा बियांची लागवड करताना दयावी व नत्राची उरलेली अर्धी मात्रा ही पेरणी नंतर ४ ते ६ आठवडयांनी द्यावी.

 

पाणी व्यवस्थापन

कंदाच्या चांगल्या वाढीसाठी पिकाला पाण्याचा भरपूर पुरवठा करावा.जमिनीत सतत ओलावा राहील याची काळजी घ्यावी. त्यामुळे उगवण चांगली होऊन पिकांची वाढ चांगली होते. पिक वाढीच्या काळात पाण्याची कमतरता पडू देऊ नये. रब्बी हंगामात पिकाला ८-१० दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.

 

रोग नियंत्रण

१) मावा :पानातील रस शोषण करतो त्यामुळे वेली निस्तेज होते पिकाची वाढ खुंटते._

उपाय :टाटा माणिक - ८ ते १० ग्राम १५ लिटर च्या पंप ला घेऊन फवारणी करावी. अथवा निमार्क २५- ३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२) तुडतुडे :पानातील रस शोषण करते.

२) तुडतुडे :पानातील रस शोषण करते.

उपाय :अरेवा ८ ते १० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी अथवा निमार्क २५ -३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

३) सफेद माशी :पानातील रस शोषण करते. उपाय- उलाला ८ ते १० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४) पाने खाणारी अळी व फळातील अळी :पाने खाते व फळाच्या आत मध्ये अळी तयार होते त्यामुळे फळ वाकडे होते.

उपाय :निमार्क २५ -३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व किडलेली फळे काढून टाकावी नंतर फवारणी करावी.

५) मर रोग :पाणी अतिजास्त दिलेल्या मुळे किंवा वातावरणातील बदलामुळे रोपाची मर होते.

उपाय :पिकाच्या आवश्यक्ते नुसार पाणी दयावे तसेच रोपाच्या बुडा जवळ बुरशीनाशका चे ड्रिचिंगी करावे किंवा फवारणी करणे.

 

उत्पादन

बिटाची काढणी ७० ते ७५ दिवसांनी करावी. बीटच्या कंदाची वाढ ३ ते ५ से मी झाली की हाताने उपटून करावी तसेच काढणी करताना मुळ्याना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. काढणी नंतर कंदाची प्रतवारी करावी तसेच कंद विक्रीला पाठवताना त्याची पाने काढून टाकावी व कंद स्वछ धुणे. पॅकिंग हें प्लास्टिक च्या पिशवीत केल्यास कंद जास्त काळ चांगले राहतात. तर ४ ते ६ जुड्या बांधून विक्रीस पाठवले जातात. याचे सरासरी उत्पादन हेक्टरी २० ते २५ टन इतकं मिळते.

संकलन - प्रविन सरवदे, कराड

English Summary: Beet planting technology.
Published on: 17 November 2021, 09:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)