शेतकरी बंधूंनो दरवर्षी सप्टेंबर उलटून जातो तरीही शेतकऱ्यांना वरच बघायला लावणारा पाऊस यावर्षी चक्क सरासरीच्या ही पुढे गेला सुरुवातीला हवाहवासा वाटणाऱ्या पावसाने कांद्याचे रोप होत्याचे नव्हते केले मागील वर्षी देखील निसर्गाने साथ न दिल्यामुळे कांद्याच्या बियाण्यांचे उत्पादन कमी झाले.
यावर्षी दरवर्षीपेक्षा अर्ध सुद्धा बियाणे उपलब्ध नसल्याने विक्रेते सांगतात. यामुळे कांदा बियाण्याचे भाव गगनाला भिडले. सर्वसामान्य शेतकऱ्यांना दुबारा बियाणे घेणे शक्य नाही.
तसेच पुढील वर्षी देखील पुरेशा बियाण्यांची निर्मिती होण्याची आशा दिसत नाही.यावर पर्याय म्हणजे स्वतःच्या शेतात बियाणे तयार करणे. तयार बियाणे आपण स्वतःसाठी वापरून विक्रीदेखील करू शकतो.
शेतकरी दरवर्षी पारंपरिक पद्धतीने कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात. यामुळे सड होणे मर होणे यांसारखे अडथळे निर्माण होतात परिणामी यांचा फटका उत्पन्नावर बसतो व शेतकऱ्याला अपेक्षित आर्थिक लाभ होत नाही.
आजच्या भागात आपण जाणून घेऊयात आधुनिक पद्धतीने दर्जेदार कांदा बियाणे निर्मिती याबद्दल जाणून घेणार आहोत.
- बियाणे निर्मिती साठी कांदे निवड :-
- बियाण्यासाठी वापरण्यात येणारे कांदे काढल्यानंतर लगेच पात न कापता कोरड्या व स्वच्छ जागेत साठवावे. साठवणूक करताना आद्रता वाढणार नाही तसेच पाण्याचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.
- साठवणीमध्ये कांद्यावर हेक्साकॉनॉझोल पावडरचा वापर करावा. यामुळे कांद्याचे सड नियंत्रित केली जाऊ शकते.
- तसेच साठवणुकीमध्ये वरचेवर गंधकाची धुरी द्यावी.
- बियाणे निर्मिती साठी नेहमी गोल, मध्यम आकाराचे कांदे वापरावे. जोडाचे, व्यंग असलेले कांदे वापरू नयेत.
- बियाण्यासाठी वापरण्यात येणारे कांदे रोग, किड इ. पासून मुक्त हवे.
- लागवडीचे योग्य वेळ
ऑक्टोबर - नोव्हेंबर
- पूर्वमशागत :-
खरीप पिकाच्या काढणीनंतर लगेच जमिनीची खोल नांगरणी करावी. व शेत काही दिवस सुकू द्यावे. त्यानंतर दोन कुळवाच्या पाळ्या देऊन माती भुसभुशीत करून घ्यावी. दोन कुळवणी दरम्यानएकरी 8 ते 10 टन कुजलेले शेणखत घालावे. त्यानंतर उताराच्या आडव्या दिशेने दोन फुटी बेड बनवून घ्यावेत. तसेच दोन बेडमधील अंतर दोन फूट ठेवावे.
- बीज प्रक्रिया :-
- सर्वप्रथम साठवणूकीतले कांदे बाहेर काढून निवडून घ्यावेत.खराब झालेले कांदे लगेच बाहेर काढून फेकावेत.
- त्यानंतर कांदा आडव्या पद्धतीने अर्ध्यापेक्षा जास्त ठेवून कापावा.
- नंतर एका बादलीत पाणी घेऊन त्यात कॉपर ऑक्सिक्लोराईड +डायमेथोएट अथवा कार्बेन्डाझिम +डायमेथोएट मिसळावे. व कापलेले कांदे त्यात दोन मिनिटे बुडवून चांगले निथळून सावलीत सुकवावे. असे केल्याने मातीत गेल्यानंतर होणारा बुरशीचा प्रभाव रोखला जातो. व उतार देखील चांगला बघावयास मिळतो.
- लागवड पद्धती:-
- सर्वप्रथम तयार केलेल्या बेडवर 200 किलो 10 :26 : 26 हे खत मातीमध्ये मिसळून द्यावे.
- त्यानंतर बेडवर तिरप्या चाली मध्ये एक फूट अंतरावर एक कांदा टाकून मातीमध्ये गाडावा.
- त्यानंतर 12 ते 14 लिटर क्षमता असलेल्या ठिबक नळ्या प्रति बेड एक या प्रमाणात पसरवून पाणी चालू करावे.
- महत्वाच्या फवारण्या व आवळण्यात:-
- लागवडीनंतर आठ ते दहा दिवसांनी साप पावडर च्या ड्रिप मधून आवळणीकरावी.
- एक महिन्यानंतर ड्रिप मधून ह्युमिक ऍसिड सोडावे.
- लागवडीनंतर एक महिन्याने रोपे पिवळी पिवळी शकतात. यावेळेस डायमिथोएट + कार्बेन्डाझिम +सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची फवारणी करावी
- लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड +प्रोफेनोफोस + जिब्रेलिक एसिड यांची फवारणी द्यावी.
- लागवडीनंतर दोन महिन्यांच्या पुढे ड्रेस च्या सहाय्याने M-45ची आळवणी करावी.
- लक्षात ठेवा सर्व फवारण्या फुले उमलणे अगोदरच कराव्यात फुले उमलली यानंतर कोणतीही फवारणी देऊ नये.
- महत्वाचे मुद्दे :-
- लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनी एकरी पाच ते सहा पिवळे अथवा निळे चिकट सापळे लावावेत. यामुळे रस शोषणाऱ्या किडी मधील मावा,तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी इ.चे निर्मूलन केले जाते.
- फुले येण्यास सुरुवात झाल्यावर (20 ते 30 %फुले) गुळ पाणी फवारावे. तसेच शेतात ठिकाणी गूळ पाण्यात भिजवलेल्या पोत्याचे छोटे छोटे तुकडे बांबूला बांधून लावावेत. यामुळे मधमाशांचे प्रमाण देखील वाढते परिणामी उत्पन्नही वाढते.
- आंतरमशागत आणि खते व्यवस्थापन :-
- पिक निघेपर्यंत पीक तणमुक्त ठेवावे. तननिर्मूलनासाठी शक्यतो हात खुरपीचकरावी. मात्र तन हाताबाहेर गेल्यासओकझीफ्लूरोफेनहे तन नाशक फवारू शकता.
- लागवडीच्या वेळेस प्रति एकरी 200 किलो 10:26:26 बेडवर टाकावे.
- साधारण 50 ते 60 दिवसानंतर 100 किलो 24:24:0050 किलो युरिया प्रति एकरी टाकावा.
- खते टाकल्यानंतर मजुरांच्या सहाय्याने रोपांच्या मुळाचा बुडाला माती लावावी.
- पाणी व्यवस्थापन :-
ठिबकच्या साहाय्याने आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार मध्यमओलराहील इतपत पाणी द्यावे. काही दिवस मिळवून पाण्याचा ताण देखील द्यावा. मात्र फुले लागल्यानंतर पाणी प्रमाणात देणे आवश्यक आहे.जास्त पाणी झाल्यास बुरशीचा प्रादुर्भाव आढळतो. तसेच कमी पाण्यामध्ये तयार होणाऱ्या बियाण्यांचीउगवण क्षमता कमी असते.
- काढणी :-
साधारणपणे वानांच्या प्रकारानुसार 110 ते 130 दिवसात बीज परिपक्व होते. काढणी हे 3 ते 4 वेचणीमध्येकरावी. काढणी करताना फक्त पक्व झालेले फुल काढावेत. काढणीनंतर हलक्या उनात फुले सुकवून आपल्या क्षेत्राच्या आकारानुसार मशीनच्या सहाय्याने अथवा काठीने बडवून बियाणे मोकळे करावे. व उफवूनस्वच्छ आणि कोरड्या गोणी मध्ये भरून ठेवावे. गोणी मध्ये भरताना आत प्लास्टिक ची बॅग नक्कीच लावावी यामुळे साठवणुकी मध्ये किडींचा प्रादुर्भाव कमी केला जातो.
- उत्पन्न :-
कांदा बियाण्यांचे उत्पन्न हवामान आणि जमिनीनुसार बदलते, योग्य व्यवस्थापन व चांगली निगा राखल्यास वरील पद्धतीने एकरी 4 ते 6 क्विंटल बियाण्यांचे उत्पन्न घेतले जाऊ शकते.
Published on: 19 February 2022, 11:38 IST