Agripedia

शेतकरी समाज शेतीतून हद्दपार होत आहे.

Updated on 08 May, 2022 11:33 AM IST

आज महाराष्ट्रात कोठेही एक एकर जमीन सरासरी 8 ते 10 लाख रुपये आहे ही संपत्ती आपल्या पुर्वजांनी आपल्याला दिली आहे.100 कोटींची वांगी विकणारे शेतकरी सुध्दा महाराष्ट्रात आहेत. अनेक शेतकरी बागायतदार आहेत ज्यांची कोटींची उलाढाल आहे. 

देशाचे सर्व अर्थचक्र शेतीभोवती फिरते नौकरी करणारा जोडधंदा म्हणून शेती खरेदी करुनच प्रगती साधतो आहे. त्यामुळे शेतीला महत्त्व फार आहे शेतकऱ्यांना विनंती आहे आपण पाच दहा लाख कर्ज काढून इतर व्यवसाय सुरू करण्यापेक्षा शेतीत पाणी व आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी 2 ते 3 लाख खर्च करुन जोमाने कामाला लागा यश आपल्या सोबत असेल.

एकमेव शेतीमुळे घरातील सगळ्यांना रोजगार मिळणारा व्यवसाय म्हणजे शेती आहे. स्वताच्या शेतीमध्ये काम करण्याने घरातील लोकांचे आरोग्य चांगले व निरोगी राहिल कुटुंबात दैनंदिन सहवास लाभेल प्रत्येक दिवस आनंदी रहाल स्वताच्या शेतातील आहारात लागणारी सर्व भाजी भाकर नैसर्गिकरीत्या तयार करून वापरता येईल.चांगले अन्न मिळवण्यासाठी पैसा घेऊन करोडपती फिरत आहेत पण खात्रीने अन्न कोणीच देऊ शकत नाही.पण ते शेतकऱ्यांना मिळते.

असे पैसे कमावणारे भरपुर पाहिले पण म्हातारपणी सर्व सोडून आपल्याला आयुष्य जगायचे आहे म्हणून गावाकडे शेताकडे वळतात पण वेळ निघून गेलेली असते त्यामुळे पाण्यावरच्या बुडबुड्या मागे धावण्या पेक्षा झऱ्याच्या रुपात असणाऱ्या शेतीमध्ये टिकून कष्ट करा.कारण हजारो वर्षांपासून याच शेतीवर आपले पुरवज जिवन जगत आले आहेत आणि आपणाला जीवन दिले आहे यापुढे देखील शेतीशिवाय पर्याय नाही.त्यामुळे शेतीविकुन एका पिढीचा विचार करण्यापेक्षा कष्ट करून शेतीच सोनं करा. अजुनही येणाऱ्या लाखो पिढ्या यावरच जगतील.

             एक शेतकरी पुत्र कृषीमित्र

                     बळीराम पवार 

English Summary: Beautiful thoughts of a farmer - importance of agriculture
Published on: 08 May 2022, 11:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)